|  
 मित्रांनो..  इथे  V n C  वर भरपूर चर्चा वाचायला मिळते...  कोकणातल्या पुण्यापासून ते सुखाच्या व्याखेपर्यंत.... तसेच..    KP  कार्यक्रमापासून ते सासर माहेर  balance  कसा करायचा इथपर्यंत..  तसेच प्रासंगीक चर्चा तर फ़ारच आक्रमकपणे होतात..    आणि हो.. त्या असतातही बरेचदा वस्तुस्थितीला धरून..   तरी पण मला असे वाटते..    आपण सगळेच आजू बाजूची परिस्थिती, समस्या, दंगे, स्फ़ोट आणि एकूणच आपल्या देशाच्या  ( अंधारलेल्या  )  सद्यस्थीतीबद्दल खूपच पोटतिडकीने लिहितो...  तरीपण.. आपल्या अखील भारतवर्षाच्या सार्थ अभिमान वाटाव्यात  ( आजच्या जगातही )  अश्या काहि गोष्टी आहेतच की....  त्या गोष्टींवर चर्चा घडावी ह उद्देश्य आहे ह्या दोर्याचा..    कृपया  :  मी देशातील काय  miss  करतो  /  करते..... ह्या पेक्षा.. मला माझा देश कुठकुठल्या कारणांमुळे फ़ार मोठा, प्रगल्भ वाटतो अशी चर्चा अपेक्षीत आहे   
 
  |  
Maudee
 
 |  |  
 |  | Thursday, May 04, 2006 - 5:11 am:    |  
 
 
 |   
  |   
 होय,  मला माझ्या देशाबद्दल अभिमान वाटतो जेव्हा  १.  tsunami  झाल्यावर भारताच्या कानाकोपर्यातून मदतीचे ओघ येतात.  २. आबा  dance baar   बन्दीसाठी प्रयत्न करतात.  ३. आपलि न्यायसन्स्था  marine drive  वरच्या त्या पोलीसाला सजा सुनावते...तेही वर्षाच्या आत.  ४.  cricket  बरोबरच इतर ख़ेळातही आपले ख़ेळाडू  participate  करतात,जिन्कातात....आणि सर्व भारतीय त्यान्चे तितक्याच आनन्दाने कोउतुक करतात 
 
  |  
Shonoo
 
 |  |  
 |  | Thursday, May 04, 2006 - 12:20 pm:    |  
 
 
 |   
  |   
 आपल्यापैकी बर्याच जणांना बर्याच वेळा भारताची ऐतिहासिक शान वर्णन करणारी मेल आली असणार. आपण शून्याच शोध लावला खगोलशास्त्रात प्रगती केली इत्यादी.  अलिकडेच मला परत एकदा अशीच मेल आली. त्या सुमारास मी   Dave Barry  च एक पुस्तक वाचत होते. तर मला सहज वाटलं की आधुनिक काळात भारताचे जगाला काय    challenges  असतील?  तर मला सुचलेले हे काही मुद्दे    १. जगातील सर्वात महागड्या आणि  advanced exhaust system  वर मात करणार्या फोडण्या आणि चुरचुरीत तळण प्रकार  २. कितिही महागड्या  non Stick  तव्याचे थोड्याच कालावधीत 'कल्याण' करणारे डोसे, धिरडी इत्यादी  ३.मूळ कपड्यांवर कधीही न टिकणारे पण दुसर्या कपड्यांवरून कधीही न जाणारे रंग  ४. कुठल्याही डिश वाॅशर ला दाद न देणारे इडली पात्र आणि त्याला लागलेले इडलीचे पीठ  ५. कुठल्याही  certification  परिक्षांच्या तयारीचा आणि प्रश्नावल्या तयार करण्याचा झपाटा    मंडळी दिवे घ्या हो   
 
  |  
Dakshina
 
 |  |  
 |  | Monday, May 08, 2006 - 11:47 am:    |  
 
 
 |   
  |   
 म्हणूनच कोणी एका संस्कृत सुभाषितकाराने म्हणले आहे..    "जननी जन्मभुमिश्च...स्वर्गादपि गरियसी.."    म्हणजे, जन्मभुमीतली झोपडी ही स्वर्गापेक्षा कधीही सुंदरच... 
 
  |  
Maudee
 
 |  |  
 |  | Monday, May 08, 2006 - 12:14 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मागे एक  fwded  मेल आली होती....    एक सिंह भारतात्ल्या एका गरिब  zoo  मध्ये होता....त्याला तिथला कन्टाळा आला....त्याच्या नशिबाने तिथे  US  मधला एक माणूसाल....त्याला एक  lion  पाहीजे असतो....तो आप्ल्या या गोष्टीतल्या सिंहाची निवड करतो..आपला सिंह खुश...  तिथे जातो....पहील्या दिवशी त्याला केळी देतात खायला...सिंहाला वाटते कदाचित हे लोक आपली काळजी घेन्याच्या द्रुष्टीने अस करत आहेत....  दुसर्या दिवशी,तिसर्या दिवशीही तेच...ॅहोउथ्या दिवशी पण तेच...शेवटी त्या माणूस अला तो विचारतो कि का रे बाबा तुला माहित नाही का की मी जन्गलचा राजा आहे....केळी खात नाही...  तो माणूस उत्तर देतो....तु जन्गलचा राजा आहेस हे मला महित आहे...पण तू इथे माकडाच्या  visa  वर आला आहेस....त्यामुळे तुला केळी....     moral - परदेशात माकड होऊन रहाण्यापेक्षा देशात सिंह होऊन रहाणे चान्गले 
 
  |  
P_para2
 
 |  |  
 |  | Sunday, August 06, 2006 - 1:19 pm:    |  
 
 
 |   
  |   
 नमस्कार  राम राम मंडळी,  जननी, जन्म्भुमि, या विषयावर चचार करा. पण माहि वाली आपणा सरवायले येथी दोन्ही कर जोडुन ईनंती आहे की खोटं नाटं काहिबी तानुन देऊ नका.  दक्षीणा ताई तुम्हाले जर संपुर्ण माहिती नासन थ क्रुपया लेहू नका बा आमाले लईच वाइट वाटते  मायभुमी बद्दल लिवाच आन ते बी आसं आर्धवट माहीती च्या आधारावर...................     
 
  |  
Yedaa
 
 |  |  
 |  | Tuesday, August 29, 2006 - 2:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
 अच्छा, जननी म्हणजे झोपडी होय!  मला नव्हतं बुवा माहिती...... 
 
  |  
A_sayalee
 
 |  |  
 |  | Tuesday, August 29, 2006 - 6:21 pm:    |  
 
 
 |   
  |   
  P_para2 , अहो तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते किमान कुठल्यातरी  dialect  मधे न लिहिता सर्वश्रुत मराठी भाषेत लिहा, म्हणजे काहितरि बोध होईल! 
 
  |  
Zelam
 
 |  |  
 |  | Tuesday, August 29, 2006 - 6:31 pm:    |  
 
 
 |   
  |   
 जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि  मला वाटतं याचा अर्थ आहे की जननी (अर्थातच आई) आणि जन्मभूमी ह्या स्वर्गापेक्षाही महान आहेत.  जन्मभूमीतील झोपडी इथे अपेक्षित नाही असं मला वाटतं  CBDG . 
 
  |  
P_para2
 
 |  |  
 |  | Monday, September 11, 2006 - 11:17 am:    |  
 
 
 |   
  |   
 राम राम मंडळी                  Yedaa jee                तुम्हाले साक्षात्कार झाला ना? जननी म्हणजे काय ते कळले? आम्ही बी तुम्हा सारखे पावन झालो होतो बघा "जननी" म्हणजे काय ते माहित झाले तवा. .......  कठीण आहे राजेहो आपल्या देशाचं भविष्य.........    अगदी बरोब्बर आहे तुम्ही लिहीला आहे तो अर्थ   " zelam " सदर वाक्य हे एरै गेरै नथ्थु खैर्या चे नसुन प्रत्यक्ष प्रभु श्री रामाने त्यांचे बंधु लक्ष्मणा ला समजावुन सांगताना उच्चारले आहे. श्री वाल्मिकी रामायणात हा उतारा आहे.  रावणाचा वध झाल्यावर जेव्हा श्री राम लंकेत प्रवेश करतात आणि तिथले वैभव बघुन लक्ष्मण म्हणतो की आपण आता अयोध्ये ला न जाता इथेच राहु, त्यावेळी श्री राम त्याला म्हनतात "अरे बाबा ही लंका तुला सोन्याने मढलेली (अपि स्वर्ण मयी लंका) स्वर्गा सारखी सुंदर दीसत असली तरी, आपली आइ व जन्मभुमी हि स्वर्गा पेक्षा ही सुंदर आहे असते."   "A_sayalee"   मी खेड्यात राहनारा असुन जी माझी बोली भाषा आहे ती लीहीणे सोपे जात असल्यामुळे '" व्हराडी-मराठीत" लिहीले आहे. आपणास समजण्यास त्रास होतो आहे, त्या बद्दल क्षमस्व  
 
  |  
 
 | 
| मायबोली | 
  |  
 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
 
 
 
 |