Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2006

Hitguj » Views and Comments » General » H. I. V. - AIDS - एक वाढती समस्या... » Archive through April 04, 2006 « Previous Next »

Dakshina
Monday, April 03, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण रोज कोणत्या ना कोणत्यातरी विषयावर चर्चा करत असतो. शॉपिंग, स्किन केअर... वगैरे. पण काही गंभीर विषयांचा विचार आपण केलाच नाही.
आज आपल्यापैकी बहुतेक लोकांना HIV बद्दल थोडीथोडकी माहीती T.V. च्या माध्यमातून मिळते.
किती लोक HIV बद्दल जागरूक आहेत? आपल्याला त्याच्याबद्दल शस्त्रोक्त माहीती आहे का? HIV पसरण्याची मुख्यं कारणं, Prevention , बर्‍याचदा आपल्याला काही खुळचट emails येतात.. उदा. एका छोट्या मुलाने पाणिपुरी खाल्ली आणि त्याला घशाचं Infection झालं, Doctors नी HIV ditect केला... दुसरं उदा. म्हणजे एका मुलीला Movie Theatre मधे खुर्चीवर बसताना काहीतरी Prick झालां आणि त्याला चिठ्ठी होती 'Welcom to the world of HIV etc...etc...

आपण ते सगळं नजरेआड करतो.. ते Emails delete करून टाकतो... पण आपण खरंच या विषयाच्या वेगवेगळ्या कांगोर्‍यांविषयी विचार केलाय का?


Meemarathi
Monday, April 03, 2006 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kharokharach....HIV AIDS cha naav suddha aikla tar angavar bheetech kata ubha rahato....

Tya divshi me " My Brother Nikhil " pahila..Picture chya end la khup vite vattha pan tya picture madhye tyala AIDS kasa hoto hyache mul karanach dakhavale navhte.

kharokharach AIDS zalyavar manoos mrutyu la bolavoon sudhaa mrutyu javal yet nahi.. manoos khangoon khangoon marto.

I really feel bad for those ppl.

Maanus
Monday, April 03, 2006 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राच्या वडलांचे गुजराथ मधे hospital आहे. बापरे तिथल्या काही लोकांचे मी फोटो पाहीलेले... :-( फारच हाल होतात. ते बघुनच हे असले काही कुणालाच होवु नये असे वाटते.

मधे दादा कोडंके यांचे ' काशी ग काशी ' गाणे ऐकले. पहील्यांदा गाण्याचा अर्थ कळाला नाही. पण एक दोन वेळा ऐकल्यावर कळाले. येनकेन प्रकाराने त्यांनी ह्या गाण्यातुन लोकशिक्षणाचा चांगला कार्यक्रम आखला होता. सध्याच्या ' प्यार हुवा... ' वैगेरे जहीरातींपेक्षा हे गाणे हजार पटीने जनजागृती साठी चांगले आहे. सांगायचा मुद्दा ज्या जहीराती संपुर्ण family बरोबर बघु शकत नाही, तसल्या जहीराती का बनवतात हे लोक. मी काशी ग काशी पाहीले नाही, पण ऐकण्यावरुन तरी काही वागव वाटत नाही.

मधे एकदा हे पण वाचनात आले होते की HIV विषाणू हा आफ्रिकेत चाललेल्या काही शोधांमधे तयार झाला. it did not exist before 1700 or so..., dont know the truth


Manuswini
Monday, April 03, 2006 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा एथे Exactly काय discuss करणे expected आहे?

hiv काय प्रकार आहे? रोगाची कारणे का किती जनजगृती आहे ह्या रोगाबद्दल?
का रोगास आळा कसा बसेल?

काहेच कळले नाही
खुप गहन विषय आहे हा?


Dakshina
Tuesday, April 04, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी,
माझी मैत्रिण सध्या HIV Positive लोकांबरोबर काम करते. या B.B. वर त्याबद्दल आणि तू मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर Serious चर्चा व्हावी असं मला वाटतं पुर्ण Site वर याविषयी कोणी लिहिलेलं मला आढळलं नाही. पण हा एक खरोखर गंभीर विषय आहे.

हा कशामुळे होतो, कोणत्या Class मधल्या लोकांना जास्त होतो, याविषयीचे गैरसमज... या सर्वंच गोष्टींबद्दल चर्चा व्हावी असं मला वाटतं.

इथे सगळ्यांनी Positive लोकांबद्दल सहानुभुती दाखवली... हे मान्य.. पण आपण हा विचार केलाय का की रस्त्यात आपण खूप लोकांना बघतो... ज्यांच्या चेहर्‍यावरून, यष्टीवरून आपल्याला कळणार पण नाही की ते Posite आहेत.
आपल्या रोजच्या आयुष्यात आपणही खूप खबरदारी घेतली पाहिजे...

थोडक्यात मला Personally असं वाटतं की हा विषय महत्वाचा आहे, आणि त्याबद्दल प्रत्येक माणूस हा जागृत असला पाहीजे. आपल्याला HIV बद्दल काही महत्वपुर्ण माहीती असेल जी इतरांशी Share करावी असं वाटत असेल तर तसं करावं.

आणि शेवटी Admin आणि इतर मायबोलीकरांना ते महत्वाचं नसेल वाटत तर हा B.B. बंद करायला हरकत नाही.


Shyamli
Tuesday, April 04, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा तुझी तळमळ बघुन कौतुक वाटतय मला....
good
ईथे काही लोक एकत्र येउन जर त्यातुन असे एखादे
समाज कार्य घडत असेल.... हातभार लागत असेल तर
नक्कीच चांगली गोष्ट आहे.....

फक्त हा विशय जरा bold आहे यावर सहजासहजी बोलायला कोणि तयार होइल का शंकाच आहे....



Maudee
Tuesday, April 04, 2006 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे यावर फ़क्त चर्चा करुन काय समाजकार्य होणार आहे?? राग नसावा...मला खरेच समजले नाही म्हणून विचारते आहे


Dakshina
Tuesday, April 04, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचा अनुभव आलाय मला Already मी इतर साहीत्यच्या B.B. वर पार्टनर या पुस्तकाचा review लिहीला तर लोकांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. लोक मुद्दाम डोळेझाक करतात की त्यांना हे अमान्य आहे हे समजत नाही.

आपण मिळून काही समाज कार्य करू शकतो का..? ही गोष्टं खूप पुढची आहे. पण निदान आपण यातून कसे वाचू शकतो.. किंवा जर कोणाला याबद्दल काही मार्गदर्शन हवे असेल तर देऊ शकतो का? किंवा घेऊ शकतो का?

विषय गंभीर आहे यात शंकाच नाही पण काही लोकांसाठी तो जीवघेणा आहे. आपल्यासाठी नाही कारण आपण त्याची शिकार झालेलो नाही पण होऊ नये म्हणून काय करतो? आज Hospitals मधे ज्या Nurses, ward boys काम करतात त्यांना या रोगाची लागण होऊ शकते.. हे आपल्याला माहीती आहे का... सरकारी दवाखाने येणार्‍या रोग्याच्या आरोग्याबाबत किती जागृत असतात? Dressings, injections नीट आणि निर्जंतूक वापरतात का? म्हणजे ते आपल्या आयुष्याशी खेळतातच ना?


Maanus
Tuesday, April 04, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HIV Stands for Human immunodeficiency virus

Dictionary meaning immunodeficiency
failure of the immune system to protect the body adequately from infection, due to the absence or insufficiency of some component process or substance.

AIDS stands for Acquired Immune Deficiency Syndrome

Maximum people with HVI+ are in Africa, check this diagram
http://en.wikipedia.org/wiki/Image:HIV_Epidem.png

This is how HIV virus looks like
http://en.wikipedia.org/wiki/Image:Aids_virus.jpg

And this is life-cycle of virus, resulting into death of person
http://en.wikipedia.org/wiki/Image:Hiv-timecourse.png

Read in-detail about virus on
http://en.wikipedia.org/wiki/Hiv

About AIDS on
http://en.wikipedia.org/wiki/Aids


दक्षिणा किंवा ईतर पुणेकर

तुला ह्यावर काही काम करायची ईच्छा असेल तर एक काम कर. दर रविवारी संध्याकाळी ५ ते ७ दरम्यान IMDR मधे Rotract ची meeting असते. एखाद्या रविवारी ती meeting attend कर, काही invitation लागत नाही. each rotract club has president, contact him and tell him your intentions. I am sure he/she will be more than happy to help you. मला rotract सोडुन ३ एक वर्ष झाली त्यामुळे सध्या तिथे कोण असते माहीत नाही.

also this branch of rotract conducts a program called as Harmony every year, it is very much popular in almost all collages in Pune. You can arrange a play in this program to build awareness about HIV, which is attended by many collage students.


Dakshina
Tuesday, April 04, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या B.B. चा उद्देश हा समाजकार्य हा नक्किच नाहीए. पण आपल्यापैकी कितीजण त्याबद्दल माहीती घेतात?

मी पण हा विषय खूप गांभिर्याने घेतला नव्हता, पण आलिकडे मैत्रिण सांगते ते अनुभव, काही साहीत्य.. जे वाचलं त्यामुळे हा रोग किती पसरत चाललय त्याची कल्पना आली. तो कधीही आणि कोणत्याही प्रकारे आपल्यापर्यंत पण पोहोचू शकतो.

त्यातूनच ह्या रोगाचं Direct relation हे अशा गोष्टीशी लावलेलं आहे की लोक उद्या सुई टोचल्यामुळे जरी AIDS झाला तरी सांगायला घाबरतील.




Dakshina
Tuesday, April 04, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस,
दिलेल्या माहीतीबद्दल धन्यवाद... पण तुम्हाला असं नाही एका वाटत का, की कोणत्याही क्षेत्रात
काम करण्या आगोदर आपल्याला त्यातली माहीती हवी.


Lopamudraa
Tuesday, April 04, 2006 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी आकडेवारी प्रसिध्द झाली आहे त्यावरुन आज सगळ्यात जास्त AIDS रुग्ण भारतात आहेत. फ़ार गंभीर आहे हा विषय पण चर्चा काय कारायची?

Dakshina
Tuesday, April 04, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा....

चर्चा करायची म्हणजे आपापल्याला असलेली माहीती, असतील तर काही अनुभव Share करयचे. काही गैरसमज असतील तर ते दूर करायचे.


Maudee
Tuesday, April 04, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,
मला इथे लिहिण्यासरखी एक गोष्ट सुचते आहे....
माझे एक coligue आहेत त्यान्च्या कुठलीतरी दूरच्या आत्याला HIV positive होता..... he is not a punekar मी पुण्याची म्हणून त्यानी मला विचारले कि if there is any good hospital in poona for this reason,tell me.... mumbaila जाणे त्याना शक्य नव्हते....
but unfortunately i cud not tell him माझे सगळे contacts वापरून मी चॉकशी केली.... but I cud not help him
जर कोणाला माहीती असेल तर ते सान्गू शकतात का?..... ofcourse she is no more now ....पण if anybody else need it...it can be useful


Gajanandesai
Tuesday, April 04, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजकाल इमेल्स् मधून वगैरे अफवा येत असतात की रेल्वेच्या तिकिटाच्या रांगेत उभे असताना अचानक कोणीतरी येते आणि HIV युक्त रक्त भरलेले इंजेक्शन टोचून जाते. किंवा वर म्हटल्याप्रमाणे चित्रपटगृहाच्या खुर्चीत अशा सुया ठेवलेल्या असतात जेणेकरून त्यावर बसणार्‍या व्यक्तिला ती टोचावी. या प्रकारांबाबत आमच्या एका प्रोफेसरांनी सांगितले होते की, पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या अफवा असतात. त्यात काडीचे तथ्य नसते. दुसरे म्हणजे असे रक्त शरीरातून काढून इंजेक्शन भरून ते टोचेपर्यंत HIV चे व्हायरस मानवी शरीराबाहेर जिवंत राहणे शक्य नाही.

याबाबत जाणकार अजून सांगतीलच.


Dakshina
Tuesday, April 04, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माऊडी,

अजुनही जर त्यांना योग्य Hospital मिळालं नसेल तर 'प्रयास' य संस्थेचं नाव सांग. पुण्यात २ प्रयास आहेत. HIV साठी काम करणारं प्रयास हे Deccan Corner ला आहे. त्यांचा Ph. No. 25441230 आहे. सोप्यात सोपी खूण म्हणजे संभाजी पूलावर जी मशिद आहे त्याच्या मागच्या Building मधे ही संस्था आहे.

खरंतर AIDS वर काहीच इलाज नाहीये. ज्यांना इलाजासाठी पैसे खर्च करणं अशक्य आहे, अशा परीस्थितीतल्या लोकांना इथे कमी पैशात औषधं उपलब्धं आहेत.

ही संस्था संजिवनी कुलकर्णी आणि विनय कुलकर्णी चालवतात.


Dakshina
Tuesday, April 04, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन देसाई,

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. अशा सुया टोचून कोणालाही एडस होत नाही. मी माझ्या पहील्या Post मध्ये एक छोट्या मुलाचं उदा. दिलय. तो Email तर सगळ्यात मुर्ख होता.. म्हणे की त्या मुलाला घशाचं भयंकर Infection झालं तर Doctor नी एडस Detect केला. आणि विचारलं की १ / २ दिवसात बाहेर काही खाल्लं होतं का? नेमका तो पाणिपुरी वाला Positive होता.. तर म्हणे कांदा कापताना त्याल कापलं आणि ते रक्त त्या मुलाच्या पोटात जाऊन त्याला एडस झाला.... बाप रे!!!

अशा अफ़वांवर विश्वास ठेवू नये. त्यात आपलंच हित आहे.


Maudee
Tuesday, April 04, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks दक्षिणा, पण माझ्या पोस्टमध्ये मी म्हटल्याप्रमाणे she is no more

Storvi
Tuesday, April 04, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

actually, I've been thinking about this a lot for a while now, and trying to research too. From estimates, India may soon overtake Africa in terms on infection. It is a serious problem. What I would like to know is, "is there anything we can do to help this situation, other than just paying charitable organizations working in this area?" Please let me know if anyone can guide. I would greatly appreciate it.
Thanks


Lalu
Tuesday, April 04, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Actually, भारतात इन्फेक्शन चा रेट कमी झाल्याचं हल्लीच वाचलं.
http://www.cbsnews.com/stories/2006/03/30/health/main1457296.shtml

दक्षिणा, तुला जी माहिती द्यायची आहे ती लिहीत रहा. बाकी कोणी लिहिले नाही किंवा प्रतिक्रिया दिली नाही याचा अर्थ डोळेझाक करतात किंवा कोणाला interest नाही असं नाही. अपुरी किंवा माहितीच नसल्याने, काय लिहायचे ते न कळल्याने कोणी लिहीत नसेल.

Maanus
Tuesday, April 04, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करण्याजोगी एक एकदम सोपी गोष्ट आहे.

मधे गावी गेलेलो तेव्हा काही अपरीहार्य कारणांमुळे गावातल्या न्हाव्याकडे जावे लागले. जो न्हावी आजपर्यंत लोखंडी वस्तारा आणि त्याला धार करायला चामडी पट्टा वापरायचा, तो ब्लेड वापरायला लागलेला. ते बघुन थोडे हायसे वाटले. थोडी अजुन चौकशी केल्यावर कळाले की सरकारने नविन कायदा केलाय, ब्लेड वापरायचे आणि एकदा वापरलेले ब्लेड परत दुसर्‍याला नाही वापरायचे.

माझ्या मते अजुनही खुप न्हावी असे असतील जो हा नियम पाळत नसनार, especially जे रस्त्यावर छत्रीखाली आपला व्यवसाय करतात. क्षुल्लक ब्लेड चे पैसे वाचवण्यापायी हे लोक खुप रोग पसरवतात. अशा ठिकाणी जावुन मोफत ब्लेड ची पाकीटे दिली तर फक्त HIV च नाही अजुन १० रोगांना थोड्या प्रमाणात तरी आळा बसेल.


Manuswini
Tuesday, April 04, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचलेल्या माहीतीनुसार dentist , hospitals can be source of infections, means if they are not using sterile equipments.

earlier it was said that only blood could be cause but i read even saliva could be cause of infection
more later..


Gajanandesai
Tuesday, April 04, 2006 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात चांगली गोष्ट म्हणजे शाळा-कॉलेजांमधून अभ्यासक्रमात या भयंकर आजाराविषयी topics समाविष्ट केले आहेत. रक्त चाचणी करण्यासाठी मोफत शिबीरं भरवली जातात. तिथे चाचणीकरता तुम्हाला कसलीही वैयक्तिक माहिती द्यायची गरज नसते. शाळा कॉलेजांमधून त्यावर compulsory व्याख्यानं ठेवली जातात. दूरध्वनीवर चोवीस तास हेल्पलाईन उपलब्ध असते... याशिवाय रेल्वे, रस्ते यांच्या कडेच्या भिंतींवर उद्बोधक घोषणा लिहिलेल्या असतात. आणि मला वाटते यामुळे या रोगाविषयी लोकांमध्ये जागृती व्हायला मोलाची भर पडते. म्हणजे अगदी खोलात नसली तरी हा आजार कशामुळे होतो, कशामुळे टाळता येतो, याचे काय परिणाम भोगायला लागतात, यावर अजून औषध उपलब्ध नाही, आणि नजीकच्या भविष्यात उपलब्ध होण्याची शक्यता नाही.. एवढी माहिती त्यांना मिळते. रुग्णालयांमधून कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी इतर चाचण्यांबरोबरच HIV चाचणी देखील बंधनकारक आहे.

Suyog
Wednesday, April 05, 2006 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My brother nikhil हा सिनेमा बघावा

Dineshvs
Wednesday, April 05, 2006 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, या बाबतीत गैरसमजच जास्त आहेत हे खरय. खुपदा जो HIV पोझिटिव्ह आहे, तो बाहेरख्याली आहे असे आपण गृहित धरतो, पण खुपदा त्याला वा तिला तो आजार, अप्रामाणिक जोडीदाराकडुन मिळालेला असतो.
मुळात एड्स हा काहि आजार नाही, फक्त प्रतिकार शक्ती क्षीण झाल्याने बाकिचे आजार, खास करुन टिबी होतो व त्यामुळे मृत्यु येतो.
त्यामुळे योग्य आहार, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे व ईतर काळजी घेतल्यास, आयुष्य थोडे वाढवता येते.
हॉस्पिटलमधे सर्व ती काळजी घेतातच, कारण पेशंट बरोबर त्यानाहि धोका असतो.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators