Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
What I miss

Hitguj » My city » Maharashtra (West) » Pune » What I miss « Previous Next »

What you miss now ?
Are you abroad and miss that dish from special hotel ?
Or you miss the playground which is now concrete jungle ?
And we all have some special people whom we miss. Who knows, you may find them here...

Ajjuka
Wednesday, May 30, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या... आता बोळाचा दचकलेला चेहरा...
तिथले वाडे पाडून रस्ता रूऽऽऽऽऽद झालाय!!


Kandapohe
Wednesday, May 30, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पारापर्यंत रस्ता असला भसकन मोठा झालाय>>> तीच गोष्ट भाउमहाराजाच्या बोळाची... >>>
अज्जुका अगदी अगदी. भाऊमहाराजाची रुंदी लक्ष्मी रोड एवढी झाली आहे आसे एक मित्र मला जपानमधे सांगत होता. माझा विश्वास बसला नाही पण प्रत्यक्ष जेव्हा बघितला तेव्हा वेडा झालो. अर्थात रस्ते मोठे केले ही चांगली गोष्ट आहे पण त्याचा पार्कींग करता उपयोग होत आहे ही दुःखाची बाब.

BTW शिवाजी मंदीर समोरील हनुमानाचे मंदीर व त्यामागील तेल डेपो असाच अचानक उडवला.



Limbutimbu
Thursday, May 31, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाऊमहाराज बोळ रुन्द झाला???? छ्याऽऽ! अरे काहीतरी पुर्वीच्या रचना जपायला हव्या होत्या ना! एनिवे, कालायतस्मै नमः! हेच खर
भाऊमहाराज बोळाशी निगडीत असन्ख्य आठवणी हेत! आता तो पुन्हा चुकुन माकुन बघायला मिळालाच तर कुठल्या तरी फोटोत कदाचित!


Farend
Thursday, May 31, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निदान फोटो जपायला हवे होते. महापालिकेत असतीलही कदाचित. आपल्या घराजवळच्या गोष्टी आपल्या लहानपणी कशा दिसत होत्या ते आत्ता फक्त अंधुक आठवते. बाल शिक्षण मंदिराच्या फूटपाथ वरून 'नटराज' वरची एक कॅडबरी सारखी दिसणारी दुहेरी रेघ अजूनही आठवते. पूर्वी गुडलक चौकातही कोणाचा तरी पुतळा (बहुधा गवळण) आणि कारंजे होते ना? तसेच तो अर्ध भुयारी मार्ग होण्याच्या आधीचा सरळ रस्ता. तसेच NCC ground पासून गणेश खिंड रस्त्यापर्यंत एकही दुकान नसतानाचा सेनापती बापट रस्ता.

नटराज, आर्यन, मिनर्व्हा, डेक्कन, एम्पायर यांचे फोटो (आणि श्रीकृष्ण मधे चार चौघात फोटो बघता येतील असे चित्रपट लागत होते तेव्हाचे :-) ) सकाळ, केसरी कडे नक्की असतील. बाकी आता जयहिंद, एक्सेलसियर, अरूण, जयश्री, गुंजन, सोनमर्ग आहेत की नाही कोणास ठाऊक?


Kandapohe
Thursday, May 31, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फरेंड खरच रे! नटराजचे वाटोळे केले तेव्हा काय दुःख झाले होते.

जयहिंद, एक्सेलसियर, अरूण, जयश्री, गुंजन, सोनमर्ग आहेत की नाही >>>
आहेत :-)

Meenu
Friday, June 01, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळमधे काही दिवसापुर्वी ५० च्या दशकातला कर्वे रस्त्याचा फोटो आला होता .. कसला सुंदर दिसत होता तो .. दुतर्फा जंगल वाटावं इतकी झाडी .. आणि हो बैलगाडीही .. प्रत्यक्षात तो बघायला मिळाला नाही त्याचं खुपच वाईट वाटलं तेव्हा ..

Chhatrapati
Sunday, June 10, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१५ वर्षापूर्वीपर्यंत प्रभातरोड आणि भांडारकररोडवर फक्त घरे (बंगले) होते. आता लोकांनी ते विकून तिथे आपार्टमेंट्स बांधून कोट्यवधी रुपये मिळवले. तो विषय वेगळा !

बाल शिक्षण मंदिर ही इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे ! तिथून PYC वरून पुढे जाऊन प्रभातरोडवर जाताना १५ वी गल्ली लागायची. या भागात एका विशिष्ट प्रकारची झाडे होती. त्या झाडाला एक गम्मतशीर फळ लागायचे. आम्ही त्याला ’टण्णूचे झाड’ असे म्हणायचो. एक गोलाकार टेनिसच्या चेंडूसारखा दिसणारे फळ आणि त्याला साधारण फूटभर देठ असायचे. उन्हाळ्यात ही फळे झाडावरून खाली रस्त्यावर पडायची, आणि ती वेचायला मुलांची धावपळ व्हायची. टण्णूच्या फळावर दाट मऊ तुरे असायचे !

आजकाल पुण्याला गेल्यावर मला हे टण्णू दिसले नाहीत. बहुतेक ती झाडे तिथून काढून टाकली असावीत.



Zakasrao
Monday, June 11, 2007 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छत्रपती त्यावर दिनेशदा नी एक लेख लिहिला आहे रंगबेरंगी मधे.

Chhatrapati
Tuesday, June 12, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, मी रंगीबेरंगीमध्ये जाऊन आलो, आणि दिनेशदांचा फोल्डरपण सापडला, पण नेमका कुठेय लेख ?

तसदीबद्दल क्षमस्व.


Zakasrao
Wednesday, June 13, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छत्रपती तो लिन्क अर्चिव झाला आहे. त्यामुळे तो
/hitguj/messages/58489/126551.html?1180628514
या लिन्कवर पहा. त्यात त्यानी एक फ़ोटो टाकलाय. त्याची विशेष माहिती नाहि त्या लेखामधे पण फ़ोटो पहायला मिळेल. तिथे अनेक लेख आहेत त्यातच आहे.

Aditih
Thursday, June 14, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच सकाळला बातमी वाचली.. ह्रदयनाथ मंगेशकर आणि कवी ग्रेस यांचा एकत्रित कार्यक्रम आहे पुण्यात. कवी ग्रेस प्रथमच रसिकांशी खुला संवाद साधणार आहेत. पुण्यात असते तर नक्की टपकले असते या कार्यक्रमाला...हे सगळं खरंच miss करते मी UK मधे राहुन.

Maanus
Monday, March 03, 2008 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरवलेली अलका....

इथे वाचा

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators