|
अगं सुप्रिया, या उपासचे लग्न आहे का? मी मायबोलीवर तशी नविनच आहे पण तू त्याला पूर्वीपासून ओळ्खतेस असे वाटते. चल त्याला या बोर्डवरच केळवण करु. बघ मेनू कसा वाटतो ते? कुटुम्बसखीकडला बटाटा वडा वेलणकरकडली मिसळ, थालीपीठ किव्वा सान्डूकडली उपासाची मिसळ प्रकाश कडले पियुष फुटाणेबाई कडला पान्ढरा पेढा पणशीकरन्ची आम्बा वडी आणि शेवटी साहित्य संघात नाटक. काय उपास, कशी वटली कल्पना? एन्जॉय! अभिनंदन!!!
|
Supriyaj
| |
| Friday, June 15, 2007 - 6:35 pm: |
| 
|
अश्विनी, मेनु झकास आहे. मात्र मी सांडुकडे मिसळ नाही खाल्ली.. बाकी सर्व चवी चांगल्याच परिचयाच्या आहेत. अगदी मराठमोळ्या. उपास, एवढं मराठी झेपतं का रे बाबा तुला? नाहीतर श्रीराम कडे पावभाजी किंवा गोविंदाश्रम,सुखसागर चालेल का? मला अजुन modern आणि कुलकर्णी (सुप्रसिद्ध बटाटाभजी आणि डाळींबी उसळ, बटाटा भाजी) आठवते.
|
Gobu
| |
| Friday, June 15, 2007 - 6:54 pm: |
| 
|
क्काय! उपास लग्न करतोय?
याच्याशी लग्नाला तयार झाले तरी कोण?  मित्रा, दिवे! दिवे!! असो, उपास अरे कार्ड पाठव ह नक्की!
|
Upas
| |
| Saturday, June 16, 2007 - 3:48 am: |
| 
|
सुप्रिया ओळखते म्हणजे काय चांगलीच ओळखून आहे.. अश्विनी, सुप्रिया thanks.. , कल्पना वाटली छान.. कशी वटतेय ते पहायचं.. आणि साहित्य संघात नाटकं लागतात का अजून.. ही भारी वाटली कल्पना! :-) गोबू पाठवणार नक्की.. :-)
|
अश्विनी, सुप्रिया वविला या की हा मेनु घेउन... तिथेच केळवण करु उपासचे!
|
Trupsr
| |
| Saturday, June 16, 2007 - 12:05 pm: |
| 
|
नमस्कार मी त्रुप्ति....मला हि गिरगाव कर व्हायला आवडेल...कारण शाळ कालेज सर्वच गिरगावात त्यामुळे गिरगाव माझ्य जास्तच जवळचे... आशा आहे तुमच्या गिरगावात मला जागा मिळेल...
|
Upas
| |
| Saturday, June 16, 2007 - 11:32 pm: |
| 
|
स्वागत तुझं तृप्ती.. ह्या बीबी ला जाग येतेय बरं वाटतय.. अर्थात ह्याच श्रेय अश्विनीलाच.. :-) >>गिरगावकर व्हायला आवडेल.. पुल म्हणतात तस हा प्रश्न जन्मदात्याने आणि पुढे जाऊन मी म्हणेन मुलींच्या ( काही वेळी मुलांच्या ) बाबतीत अजून एक chance मिळाल्यानेच सोडवता येईल नाही का.. :-p भ्रमा, अरे मला वाटत सगळे मनाने गिरगावात आहेत फक्त शरीराने इतस्तत : विखुरलेत globe वर 
|
Trupsr
| |
| Tuesday, June 19, 2007 - 9:58 am: |
| 
|
आभारी आहे मी उपास आपली आणि बोला सर्व कुशल मनगल ना?
|
Upas
| |
| Tuesday, June 19, 2007 - 10:21 am: |
| 
|
काल पेपरात वाचलं, मांगलवाडीतलं वेदकांचं सोन्या चांदीचं दुकान फोडलं म्हणे.. कठीण आहे.. 
|
मी असं ऐकलं की त्यान्च्याकडे सेफ (तिजोरी) मध्ये मौल्यवान वस्तु ठेवल्या नव्हत्या, बाहेरच होत्या. खरं का?
|
गिरगावकर, तुमच्यापैकि कुणी वविसाठी नाव दिलेले दिसत नाहिये. चला की वर्षा विहाराला!
|
Upas
| |
| Tuesday, July 24, 2007 - 5:46 pm: |
| 
|
मग काय झालं पुढे केळवणाचं.. :-)
|
Ashwini_k
| |
| Wednesday, July 25, 2007 - 5:23 am: |
| 
|
उपास, मुंबईत किंवा ठाण्यात असशील तर केळवण नक्की! (तू माझ्या माहेरचा माणूस!) तुला 'मदत पाहिजे' वर 'पाचपाखाडीतील जागा' वर कालच लिंक दिली आहे ती पाहिलीस का? तुझे जागेचे काम झाले का? अश्विनी
|
Supriyaj
| |
| Wednesday, July 25, 2007 - 3:21 pm: |
| 
|
अश्विनी, ठाण्यात कुठे राहतेस?? मी ठाण्याची आहे.. उपाश्या, नावाला जगतोस हो अगदी, जिथे जाशील तिथे नुस्त्या खाण्याच्या चौकशा तुला!! बाकी बोल, कसं काय सुरु आहे आयुष्य?
|
Upas
| |
| Wednesday, July 25, 2007 - 4:23 pm: |
| 
|
Thanks अश्विनी.. अगं मी वरदाला तिथे काहीतरी सांगत होतो.. मी सध्या तरी बघत नाही ठाण्यात.. मुंबईत किंवा ठाण्यात आलो की नक्की सांगेन.. सुप्रिया एकदम झक्कास.. पण आयुष्य कसं काय सुरु आहे असा गहन प्रश्न विचारून तू केळवणाच्या विषयाला फाटा दिलास हो छान पैकी.. :-p
|
Arun
| |
| Thursday, July 26, 2007 - 3:41 am: |
| 
|
उपाशा : कधी येतो आहेस देशात ????????? एक दिवस पुण्यातील केळवणासाठी पण राखून ठेव हो ...................
|
सुप्रिया, अगं मी उथळसरला. तू कुठे? उपास, ठाण्यातही भाव काय भयानक वाढले आहेत! पाच वर्षांत दुप्पटच्या वर! हि वरदा कोण?
|
Upas
| |
| Friday, July 27, 2007 - 2:24 pm: |
| 
|
हाय... अगं ठाणा बीबीवर तिने विचारला होता हा प्रश्न..
|
Supriyaj
| |
| Friday, July 27, 2007 - 5:58 pm: |
| 
|
उथळसर फार महिती नाही मला... कारण मी thane downtown मधे राहते. सहयोग मंदीरच्या जवळ. उपास , 'आयुष्य कसं सुरु आहे? ' या प्रश्नाला नीट उत्तर नाही दिलस.
|
नमस्कर मि इथे नविन आहे...
|
Upas
| |
| Monday, December 17, 2007 - 3:07 pm: |
| 
|
सुस्वागतम, सुस्वागतम! गिरगावात आपले सहर्ष स्वागत.. कोणत्या टॉवर मधे आपण? कारण हल्ली वाड्या चाल्ल्या टॉवर आले! :-)
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|