Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चकल्या

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » चकल्या « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 27, 200535 10-27-05  2:48 pm
Archive through September 01, 200620 09-01-06  5:16 pm
Archive through September 24, 200620 09-24-06  6:04 pm
Archive through October 17, 200620 10-17-06  9:10 pm
Archive through November 17, 200620 11-17-06  3:30 pm

Manuswini
Saturday, November 18, 2006 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prajaktaa, thanks nice तुझ्या चकल्या छान झाल्या.

मझ्या चकल्या कालच संपल्या


Sakhi_d
Tuesday, October 30, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, पारंपारीक भाजणी कशी करावी त्याची कृती देणार का?

Rajasee
Tuesday, October 30, 2007 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bharatat sour cream aivaji kaay vaaparu, arch?

Dineshvs
Tuesday, October 30, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पारंपारिक भाजणीचे प्रमाण.
थालीपिठाच्या भाजणीपेक्षा, चकलीची भाजणी थोडी कमी भाजायची असते.

प्रकार १,
चार वाट्या तांदुळ, दोन वाट्या चणाडाळ, अर्धी वाटी धणे आणि दोन चमचे जिरे.

प्रकार २
सहा वाट्या तांदुळ, दोन वाट्या चणा डाळ, दिड वाटी उडीद डाळ, पाऊण वाटी मूगडाळ, दोन मोठे चमचे जिरे, आणि तेवढेच धणे.

प्रकार ३
चार वाट्या तांदुळ, दिड वाटी उडीद डाळ, एक वाटी हरभरा डाळ, एक वाटी मूगडाळ, एक वाटी पोहे, अर्धी वाटी जिरे,

प्रकार ४
दोन वाट्या ज्वारी, दोन वाट्या चणाडाळ, दिड वाटी उडीदडाळ, एक वाटी मूगडाळ

सगळे धुवुन वाळवुन भाजुन एकत्र दळुन आणायचे. चकलीचे पिठ भिजवताना त्यात आवडीप्रमाणे तिखट, मीठ व तीळ घालायचे.
पिठात गरम तेल व उकळते पाणी घालुन पिठ भिजवायचे. मग थंड पाण्याचा हात लावुन मळुन घ्यायचे.
आधी तेल तापवुन घ्यायचे आणि मग आच मध्यम करुन चकली तळायची.


Sakhi_d
Tuesday, October 30, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanx दिनेशदा, करुन सांगते कशी झाली ते.... :-)

Dineshvs
Tuesday, October 30, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, शुभेच्छा आहेतच.
बिनभाजणीच्या चकल्याही आहेत इथे.


Sakhi_d
Tuesday, October 30, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो पण मला भाजणीच्या जास्त आवडतात.... :-)

आर्चची रेसिपी पण छान आहे पण ते sour cream ऐवजी काय घालता येईल??


Manuswini
Tuesday, October 30, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी,
बटर नाही तर तूप घाल वितळवून,
दिनेशदा नी सांगीतले आहे ना वरती प्रकार त्यात आणखी चवीष्ट अशी चकली हवी असेल तर (पण काळी दिसेल जरा म्हणजे dark brown after frying ) तर कणीक घाल ४ चमचे प्रकार नं २, ३ ४ मध्ये.
खुपच चवीष्ट लागते चकली.


Manuswini
Tuesday, October 30, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही माझी रेसीपी नाही,

राजसी ने विचारले म्हणून, तू कर नी नक्की मला सांग तेव्हढ्याच माझ्या कॅलरीस वाचतील.

from net, Baked Chaklis


Preparation Time : Preparation Time : 10 mins.
Cooking Time : Baking Time : 15 mins.
Serves / Makes : BAKED CHAKLIS

Ingredients
/2 cup rice flour (chawal ka atta)
1 teaspoon oil
1 tablespoon low fat curds
a pinch asafoetida (hing)
salt to taste

Other ingredients

oil for greasing

Method

1. Combine the rice flour, oil, asafoetida and salt in a bowl and mix well.

2. Add the curds and a little water and knead into a soft dough.

3. Put the mixture into a chakli press and press out round whirls of the dough onto a greased baking tray, working closely from the centre to the outside to the whirl (approximately 50 mm. (2") diameter). You will get about 12 chaklis.

4. Bake these chaklis in a pre-heated oven at 160°C (320°F) for 10 to 15 minutes. When one side of the chakli turns golden brown in colour, gently flip over the chakli using a flat spoon and bake till they are light brown in colour.

5. Store in an air-tight container.


Wel123
Thursday, November 01, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aarch tuza chaklya khup chan zala thanks

Swa_26
Thursday, November 01, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण नेहमी ज्या भाजणीच्या चकल्या करतो त्या बेक करुन कशा होतात??
कोणी try केलंय का?


Dineshvs
Thursday, November 01, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेकिंग केल्यावर कधीकधी चकली वातड होते.
खरे तर व्यवस्थित तळली तर चकली तेलकट होत नाही. तळण्याची क्रिया पुर्ण झाल्यावर बहुतेक सगळे तेल पदार्थाबाहेर पडते.
मग तो पदार्थ निथळुन घेतला आणि कागदाने त्याचे तेल टिपुन घेतले तर त्यात फार तेल उरत नाही.
पदार्थातले अतिरिक्त तेक काढण्यासाठी बाजारात एक मशिन वापरतात. त्यात पदार्थ गोलाकार फ़िरवुन म्हणजे आपण कपडे धुतल्यानंतर ड्रायरला फ़िरवतो तसे, करुन तेल बाहेर काढतात.



Anjut
Thursday, November 01, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा त्या यन्त्राचे नाव आणि मिळण्याचे ठिकाण सांगाल का धन्यवाद


Swa_26
Thursday, November 01, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स दिनेशदा...
आमच्या चकल्या चवीला छान होतात, पण नंतर खुप तेलकट वाटतात, म्हणुन विचारले..


Tanya
Thursday, November 01, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा... चकल्यांची भाजणी दळायला देताना, बारीक दळायला सांगायची की जाडसर???

Dineshvs
Friday, November 02, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, चकल्या डब्यात भरताना, आधी खाली कागद ठेवायचा. तसेच दोन तीन चकल्यांचा थर झाला कि परत कागद ठेवायचा. कागद शक्यतो कोरा असावा. वर्तमानपत्राची शाई, पोटात जाणे चांगले नाही. हा कागद ओलावा आणि तेल शोषतो व चकल्या कुरकुरीत राहतात. डब्याचे झाकण घट्ट लावायचे.

तनया, पिठ बारिक दळायचे. तसेच आधी तेल व गरं पाणी घालुन भिजवले तरी सोर्‍यात घालण्यापुर्वी गार पाण्याचा हात लावुन परत मळुन घ्यायचे. पाणी जास्त होवुन पिठ मऊ भिजले कि काटा येत नाही. पन्हळी सलग येतात. पण पिठ अगदीच घट्ट झाले तर चकल्या वातड होतात. त्यामुळे सुवर्णमध्य गाठायचा. चपातीपेक्षा थोडे घट्ट आणि पुरीपेक्षा थोडे सैल भिजवायचे.
या भाजणीतील धान्ये भाजल्याने त्यात अजिबात पाण्याचा अंश रहात नाही. म्हणुन चकलीचे पिठ आधी घट्ट भिजवुन थोडा वेळ मुरु द्यावे, आणि मग परत मळुन चकल्या करायला घ्याव्यात.


Tanya
Friday, November 02, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा... thanks for quick reply! कोणतीही कृती, tips किती मस्त, सोपी करुन सांगता. :-)

मी कुठेतरी वाचल्याच अंधुकस आठवत होतं, की उकड काढुन भाजणीच्या चकल्या करायच्या असतील तर भाज़णी जाडसर दळावी. म्हणुन confused होते.


Amayach
Thursday, November 08, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रुपया लवकर मदत करा! माझ्या चकल्या तेलात टाकल्यावर विरघळतात आहेत भाजणी जुनी होती (पाच वर्षापुर्वी आईनी करुन दिलेली म्हणुन जरा जास्तच साम्भाळुन वापरत होते) म्हणुन फ़्रीझर मधे ठेवली होती आणी करायच्या आधी थोडी परतुन घेतली होती. आता पर्यंत चकल्या कधीच बिघडल्या नव्हत्या. आता त्यात आणखिन भाज़णी घालु का की तान्दुळाची पीठी घालु?

Dineshvs
Thursday, November 08, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चकल्याच्या पिठात तेल जास्त पडलेय. त्यात तांदळाचे पिठ वा थोडे गव्हाचे पिठ वा थोडे बेसन घालुन ट्राय करता येईल. थोडासा मैदा घालुनही जमायला हव्यात. नाहीच जमले तर वडे, कडबोळी वा थालीपिठ करता येईल.

Amayach
Friday, November 09, 2007 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तांदुळाची पीठी घालुन पीठ मळले आणि चकल्या केल्या. छान झाल्या. तुमच्या टिप्स नेहेमीच छान असतात. Thanks!

Manuswini
Friday, November 09, 2007 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, आता इथेच सांगते तुमची चकली प्रकार ६ केल ह्या वेळी. पन तांदूळ सुद्धा टाकलेच होते पण मस्त झाली.
सगळे फोटो हळु हळु upload करते नी टाकणार आहे.



Divya
Saturday, November 10, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावर्षी एक नवीन प्रयोगाने चकलीची भाजणी केली.

४ वाट्या तांदुळाची पीठी,
२ वाट्या चणा डाळीचे पीठ,
१ वाटी उडद डाळीचे पीठ,
१ वाटी मुग डाळीचे पीठ

सर्व पीठे मंद आचेवर खमंग वास येइपर्यन्त भजावी. नंतर सगळी पीठे एकत्र करुन पाण्यात तिखट मीठ आणि तीळ घालुन उकळी आणुन त्या उकळलेल्या पाण्यात भाजणी भिजवावी. थोडावेळ झाकुन ठेवावी.
नंतर गार पाण्याचा हात लावुन मळुन चकल्या कराव्यात.

US मधे indian grocer मधे ही सर्व पीठे मिळतात. छान होते चकली, अगदी भाजणीचा खमंगपणा छान येतो.
फ़क्त मोहन अजिबात घालायचे नाही आणि पीठ जुने असल्याने जर चकल्या मोडल्या तर कोर्नफ़्लोर/ बेसन/ उडिद डाळीचे पीठ चमचा भर लावुन चकल्या कराव्यात.
Hope पुढच्या वर्षी कुणाला कराव्या वाटल्या तर म्हणुन लिहुन ठेवते.


Ami79
Friday, November 16, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठेतरी कणकेच्या चकल्यांवर चर्चा झाली होती त्यानिमित्ताने-

मी आईला त्याबद्दल सांगितले, तर ती म्हणाली की त्या चकल्या खुप तेल खातात. तीने केल्या होत्या एकदा. यावर उपाय आहे का?


Akhi
Monday, February 18, 2008 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमी तापलेल्या तेलात टाकली तर चकलीच्या बाहेरच्या भागाचा संपर्क गरम तेलाशी आल्याने तेथील पाण्याची वाफ होते. व ती बाहेर येउ लागते. त्या छिद्रांमधुन तेल आत शिरु लागते पण तापमान १५० डीग्री पेक्षा कमी असल्याने मायलार्ड रिअक्शन होत नाही. त्यामुळे बाहेरचा भाग सोनेरी अ घट्ट होत नाही. आतील पाण्याची वाफ झाली तरी पुरेसा दाब निर्माण होते नाही व ती बाहेर येउ लागते. व आत शिरणा-या तेलाला ती रोखुन धरु शकत नाही. म्हणुन चकली विरते.



याउलट जर खुप गरम तेलात चकली टाकली तर, बाहेरील भागात मायलार्ड रिअक्शन होउन लगेच सोनेरी अ थोड्याच वेळात लाल बनतो. बाहेरील भाग घट्ट असल्याने अतीरिक्त वाफ बाहेर येउ शकत नाही. अशी चकली बाहेरुन कडक व आतुन नरम होते. व अशी चकली अतीरीक्त वाफ शोषुन घेते व चकली नरम व चिवट होते.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators