व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य !!

Submitted by निमिष_सोनार on 29 October, 2013 - 03:55

आपल्या मनातल्या विचारांबाबतचा एक नवा विचार मी येथे मांडत आहे. त्या नव्या विचाराचा स्वीकार झाल्यास तसे जरूर कळवा.

बरेचदा आपल्याला दोन प्रश्न भेडसावत असतात.
म्हणजे खाली दिलेल्या या दोन प्रश्नांबाबत आपण "विचार" करतो:
लोक काय विचार करतील?
लोक काय म्हणतील?

मला असे वाटते की लोक काय विचार करतील याचा विचारही आपणच केला तर लोकांना विचार करायला काहीही उरणार नाही आणि आपल्याला काय विचार करायचा आहे तेच मात्र राहून जाईल आणि त्यामुळे आपण मात्र लोकांच्या विचारपद्धतीचे गुलाम होवून जाऊ.

लोकांना त्यांच्या पद्धतीने विचार करू द्या.
आपण आपल्या पद्धतीने विचार करा.

मायबोलीकर आयडी ओळखा कोडे

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

१.मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषा वापरून कोडे सोडवा
२. चित्रावरून शब्दशः अर्थ काढा
३. काल पेडगावी ज्यांनी हे सोडवले आहे त्यांनी उत्तरे लिहू नका Happy

एका रशियन गुप्तहेराची थरारकथा !!

Submitted by निमिष_सोनार on 7 October, 2013 - 04:50

पुस्तक: वर्ल्ड फ़ेमस अडव्हेंचर्स
लेखक: अभय कुमार दुबे
आवृत्ती: 2008
प्रकरण 21: द सिक्रेट एजंट हू सेव्ह्ड द वर्ल्ड
अनुवाद: निमिष न. सोनार, धानोरी, पुणे

सोर्गि हा देशभक्त गुप्तहेर होता. केवळ पैसे आणि वलय यासाठी तो या क्षेत्रात आला नाही. तो देशभक्त होता आणि त्याची इच्छा नाझींचे निर्दालन करून रशियाला आणि जगाला त्यांच्यापासून वाचवणे ही होती. त्याने हे प्रत्यक्षात आणले ते अशी एक माहिती रशियाला पुरवून की जी हिटलर ची सद्दी संपवायला पुरेशी ठरली.

परमपूज्यनीय वंदनीय महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Submitted by धिरज कांबळे on 2 October, 2013 - 02:31

आज महात्मा गांधीजींची जयंती...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या या परमपूज्यनीय वंदनीय महात्मा गांधीना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

आज लाल बहादूर शास्त्रींचीं जयंती ..परमपूज्यनीय वंदनीय शास्त्रींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

सौंदर्य प्रसाधने-कॉस्मेटीक्स-मेकअप

Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:32

सौंदर्य प्रसाधने ,कॉस्मेटीक्स. मेकअप, Cosmetics याबद्दलचं हितगुज

Discussion related to cosmetics and other beauty products.

शब्दखुणा: 

दिलिपसाब यांची प्रकृती स्थिर.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 19 September, 2013 - 07:34

अभिनय सम्राट दिलिपकुमार यांची प्रकृती स्थिर आहे..

फेसबुक वरील एका पेजची लिंक आणि नवी मुंबई येथील एका स्थानिक पत्रकाराकडून केलेल्या खात्रीनंतर मी दिलिपसाब निवर्तल्याची बातमी येथे दिली होती.

ही बातमी खोटी असून चुकीच्या बातमीसाठी मी दिलगीर आहे.

दिलिपसाब यांस उत्तम आयुरारोग्य लाभो.

आजीची कलात्मक गोधडी

Submitted by मंजूताई on 19 September, 2013 - 05:30

'गोधडी' शब्द उच्चारला की तो 'आजी' ह्या विशेषणाविना अधुरा वाटतो नाही का? प्रेमळ मायेची ऊबदार गोधडी ही आजीचीच! कोणे एकेकाळी(?) नऊवारीतली अन पांढऱ्या केसांची बाई म्हणजे आजी हे समीकरण होतं आता हे इतिहासजमा झालंय. आजच्या पिढीला आज्या ह्या सलवार कमीजमधल्या किंवा फार झालं तर साडीतल्या! त्यामुळे आजीच्या गोधडी प्रश्नच नाही. गोधडी हा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जुन्या कपड्यांना टाकून न देता त्याला कलात्मक नवीन रूप देऊन त्याचे 'रिसायकलिंग' (पुर्नरवापर) करणे. त्यापाठीमागे आर्थिक कारण जास्त असावीत किंवा वाया जाऊ न देणे हे तत्त्व असावे पर्यावरण पूरकतेपेक्षा.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व