व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

काल शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा चालु असताना म्हणालो तसे ही मुलाखत इथे लिंक मध्ये देत आहे!

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत एबीसी न्युज चॅनेल ने दाखवली. सोबत तिचे टेक्स्ट पण दिलेले आहे.

http://www.abc.net.au/tv/elders/transcripts/s2757468.htm

प्रकार: 

माझं नाव भैरप्पा - एस. एल. भैरप्पा / अनुवाद : उमा कुलकर्णी

Submitted by चिनूक्स on 1 December, 2009 - 13:12
लेखकाच्या, किंवा कुठल्याही कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि त्याने घडवलेल्या कलाकृतीचा संबंध असतो का? बहुतेक असावा. सृजनशील कलावंताचं आयुष्य आणि त्याच्या कलाकृती यांतील नातं तसं अगम्य असतंच. पण त्या कलावंताच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे थोडेफार समजले की मग ती कलाकृती अधिकच भावते. पिकासोचं आयुष्य, त्याच्या बायका, त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया यांच्याबद्दल कळलं की त्याची चित्रं सोपी होतात. त्याच्या चित्रातले रंग, त्याने वापरलेली प्रतिकं त्याचे मनोव्यापार कळले की लगेच उलगडतात.

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: लेखांक एकूण ४ पैकी २ रा

Submitted by नरेंद्र गोळे on 27 November, 2009 - 04:58

मायबोली डॉट कॉम च्या २००६ च्या दिवाळीअंकात आशिष महाबळ ह्यांनी लिहीलेल्या खालील लेखात योगाभ्यासाच्या पार्श्वभूमी विषयी चर्चा केलेली आहे. लेख वाचण्यासारखा आहे. भारतीय तत्वचिंतनाचा वेध : http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118185.html?1161387673 वेद ते वेड? पतंजलींच्या महाभाष्याची प्रस्तावना मराठीत आणण्याचा प्रयत्न मिस्टर उपक्रम डॉट ऑर्ग वर धनंजय यांनी केलेला आहे. ती मालिकाही वाचनीय आहे. http://mr.upakram.org/node/747 तिचे शीर्षक आहे: व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण. आता योगसूत्रांकडे वळू या.

॥ द्वितीयः साधनपादः ॥

दुसरा चतकोर. साधनपाद.

मोठा नेता कसा निर्माण होतो?

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

एखादा व्यक्तीला नेता व्हावे असे वाटले म्हणुन, तो नेता होत नाही! पण परिस्थिती जर अनुकुल असेल तर कुणीही सोम्या गोम्या अचानक नेता होउ शकतो. भारतीय राजकारणात, आघाडी/युती/अपक्ष ह्यांच्या काळात, असे अनेक लोक नेतेपदी विराजमान झाले, कि ज्यांची ते पद सांभाळण्याची अभ्यास/ कुवत/ लायकी नव्हती.

प्रकार: 

श्री. अवधूत परळकर - तेंडुलकर : जवळून जाणवलेले

Submitted by चिनूक्स on 15 November, 2009 - 17:44

श्री. विजय तेंडुलकर नक्की कसे होते, हा एक अतिशय अवघड प्रश्न. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुपेडी होतं की खरे तेंडुलकर कसे होते, हे समजून घेणं खूप कठीण आहे. नाटककार म्हणून जागतिक ओळख असलेल्या तेंडुलकरांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका ही माध्यमं लीलया हाताळली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दृक्-श्राव्य विभागाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.

ज्येष्ठ मराठी लेखक बाबा कदम यांचे कोल्हापूर येथे निधन

Submitted by गिरिश सावंत on 20 October, 2009 - 11:20

१९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय' याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन' हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर ही `अधिकार' हा चित्रपट निघाला. भालु, सन्ना, ज्योतिबाचा नवस, पाच नाजूक बोटे, बिनधास्त, गर्लफ्रेंड, डेझर्ट क्वीन, डार्लिंन, निष्पाप बळी, गजरा, बॉंबे पोलीस, रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवॉर्ड अशा सुमारे ८० च्या आसपास कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या.

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा! Happy

गुगल वरील जयंती...
gandhi09.gif

आज एक दिवस उपवास करायचा निश्चय केला आहे!

प्रकार: 

लता ८०

Submitted by चिनूक्स on 28 September, 2009 - 14:22
lata_collage2.jpg

आज २८ सप्टेंबर. लतादीदींचा सहस्रचंद्रदर्शनसोहळा. यानिमित्तानं दीदींशी गेल्या अनेक वर्षांचा ऋणानुबंध असणार्‍या काही दिग्गजांची ही मनोगतं..

श्रीमती शांता शेळके - 'लताबाई'

Submitted by चिनूक्स on 28 September, 2009 - 13:48

lata_M.jpg

छाया - श्री. मोहन वाघ , प्रताधिकार - श्री. मोहन वाघ

'मराठा तितुका मेळवावा'पासून 'हे गीत जीवनाचे'पर्यंत शांताबाईं शेळक्यांनी लिहिलेली असंख्य गीतं लतादीदी गायल्या. पण यापलीकडेही दोघींचं अतिशय दृढ असं मैत्र होतं. माई मंगेशकर तर शांताबाईंना आपली मुलगीच मानत.

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व