उदयन

विषय क्र. १:- मोदी जिंकले ! पुढे काय ?

Submitted by उदयन.. on 3 July, 2014 - 04:26

मोदी जिंकले... आता पुढे काय? असा प्रश्न कोणी मला सहज जरी विचारला तर माझे उत्तर "जय हरी विठ्ठल करत बसा" हेच असेल. मोदींचा अडवाणी न होता पहिल्या झटक्यात पंतप्रधानपदाची खुर्ची मिळाली यातच नशीब, कष्ट, योग्य दिशा वगैरे वगैरे सगळी विशेषणे लागलेली आहेत. मोदींना सत्तेवर आणण्यात जितका वाटा भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा होता त्यापेक्षा जास्तच वाटा काँग्रेसचा होता हे स्वतः मोदी देखील मान्य करतील. जशी २००९ साली भाजपाने मनमोहनजींविरुद्ध मोहीम उघडून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला तशीच मोहीम काँग्रेसने मोदींच्या विरोधात उघडून कुर्‍हाडीवर पाय मारून घेतला.

विषय: 

एक था व्हिलन..!! (स्पॉयलर)

Submitted by उदयन.. on 2 July, 2014 - 03:55

एक था व्हिलन..!

नावावरुन एका खलनायकावर बेतलेला चित्रपट वाटतो. जसे खलनायक, डर, बाजीगर इत्यादी अँटीहिरो टाईप चे चित्रपट. परंतु नावावरुन बघायला गेलात तर हमखास फसाल. या चित्रपटात खलनायक कोण आहे या वर प्रदर्शना पुर्वी उगाच रहस्याची धुळ चौफेर उधळली गेली होती ती डोळ्यात गेल्यामुळे चित्रपट बघावा लागला. वाटले मोहित सुरी आश्चर्याचा धक्का देईल . पण काय सिध्दार्थ गेला श्रध्दा गेली हाती आला रितेश या पेक्षा मर्डर २ बरा होता म्हणायचा . थोडे स्टोरी कडे वळुया .

विषय: 

"हंसी तो फंसी" ड्रामाक्वीन. चित्रपट चर्चा

Submitted by उदयन.. on 13 February, 2014 - 05:46

हंसी तो फंसी.....

तिच्याकडे "ऐश्वर्यासारखे" सौंदर्य नाही .. नाही तिच्याकडे "माधुरी" सारखे निखळ हास्य.. ती "बिपाशा" सारखी बोल्ड नाही .. दिपिका सारखी देखणी उंची पण नाही ..... तरी ही ती पडद्यावर असल्यावर एक क्षण देखील लक्ष तिच्यावरुन बाजुला जात नाही... "परिणिती चोप्रा" ने आपल्या अवखळ , अल्लड , सॉल्लिड अभिनयाने संपुर्ण चित्रपट खांद्यावर लिलया उचलला आहे...संपुर्ण चित्रपटात ती अक्षरश: "ड्रामाक्वीन" म्हणुनच वावरली आहे.. कधी काय करेल याचा भरोसाच नाही चित्रपटात..

विषय: 

२००५ आधीच्या चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्यावे..!!

Submitted by उदयन.. on 22 January, 2014 - 09:16

रिझर्व बँकेने प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की ३१ मार्च २०१४ पुर्वी २००५ पुर्वीच्या सर्व चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्याव्यात... ५ , १० , २०, ५०, १०० , ५०० , १००० या सर्व किंमतींच्या नोटा बँकेतुन बदलुन मिळतील

या बाबत अधिक माहीती साठी

http://rbi.org.in/scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=30458

Banknotes issued prior to 2005 to be withdrawn: RBI Advisory
The Reserve Bank of India has today advised that after March 31, 2014, it will
completely withdraw from circulation all banknotes issued prior to 2005. From April 1,

शब्दखुणा: 

धुम - ३

Submitted by उदयन.. on 21 December, 2013 - 05:54

वर्षाचा सर्वात महागडा आणि आतुरतेने वाट पहायला लावणारा चित्रपट "धुम-३" काल बघण्यात आला .

यशराज बॅनरच्या "रोजगार हामी योजना" अंतर्गत अभिषेक आणि उदय यांना काम देण्याकरीता "धुम" या चित्रपटांची साखळी तयार केली आहे असे फेबु ट्विटर भाष्य केले आहे......काही अर्थी हे बरोबरच आहे..:)
खरतर धुम -१ आणि धुम-२ हे चित्रपट तयार करताना काही लॉजिक वापरलेले होते..

विषय: 

अल्बम ची गाणी हवी आहे

Submitted by उदयन.. on 7 December, 2013 - 04:26

download_0.jpg

why not synthesizer या नावाचा विजु शाह यांचा पहिला अल्बम होता

मला त्या अल्बम ची गाणी हवी आहेत

गुगल वर फार शोधले नाही मिळाली...

गेली १५ वर्ष शोधत आहे ...

कुणाकडे असल्यास कृपया मदत करावी Happy

विषय: 
शब्दखुणा: 

फोटोग्राफी स्पर्धा..डिसेंबर.. "architecture." वास्तु .. निकाल

Submitted by उदयन.. on 5 December, 2013 - 03:51

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " डिसेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "architecture." वास्तु

तसे हा विषय थोडाफार "अँगल" या थीम मधुन थोडाफार डोकावलेला होताच..

यंदा हा स्वतंत्र थीम म्हणुन निवडलेला आहे..

जगात इमारती, मंदीर , चर्च.. महाल.. वाडा अश्या अनेक स्वरुपात "architecture." आहेत..
"architecture." - वास्तु यांचे फोटो मधे . भव्यता, मांडणी यांच्या बरोबर अँगल देखील महत्वाचा ठरतो..
राजवाडे ,, एखादा वाडा ,, इत्यादीचा समावेश होतो.
थोडक्यात बांधलेली वस्तुंचा समावेश यात होतो.

राजकीय चर्चा

Submitted by उदयन.. on 2 December, 2013 - 07:08

राजकारणावर चर्चा करण्यासाठी खास हा धागा ...

भाषा सांभाळुन लिहिले तर .. उत्तम होईल...

बिंधास्त वादविवाद करा... मुद्दे मांडा... विरोध करा... जे करायचे ते करा.......पण दिलेल्या परिघात राहुन

कधी कधी चर्चा गप्पांच्या पानावर होतात. त्यामुळे राजकारणात स्वारस्य नाही त्यांना त्रास होतो.. म्हणुन हा खटाटोप..

विशेष सुचना :- ज्यांना राजकारणात स्वारस्य नाही...... त्यांनी इथे येउन उगाच खरडत बसु नये..

धागा सार्वजनिक केलेला नाही आहे

विषय: 

साउंडट्रॅक..( theme Music)

Submitted by उदयन.. on 30 November, 2013 - 04:34

हॉलिवुड चित्रपटात आपल्या भारतीय चित्रपटासारखी गाणी नसतात.. बॅकग्राउंड संगीत .. चित्रपटाच्या पार्श्वभुमीला साजेसे संगीत दिलेले असते.. संपुर्ण चित्रपटाचा "रस" हा त्या एका संगीताच्या तुकड्यात ओतप्रोत भरलेला असतो..नुसते हे संगीत ऐकले तरी संपुर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो.. हीच या "थीम साउंडट्रॅक्स" ची शक्ती आहे.

विविध चित्रपटांमधले गाजलेले साउंडट्रॅक्स बद्दल चर्चा करण्या करीता हा धागा

विषय: 

अचाट मजेदार बातम्या

Submitted by उदयन.. on 29 November, 2013 - 04:36

निंबुडा यांचा पत्रकारितेची कमाल - मांजरीचे सूडनाट्य हा धागा वाचला..

या वरुन या धाग्याची संकल्पना घेतली

सकाळ, नवाकाळ इत्यादी बर्याच वृत्तपत्रांतुन आणि न्युज चॅनल्स च्या माध्यमातुन काही अचाट मजेदार बातम्या प्रसिध्द होतात......त्याला ना आगा असतो ना पिछा असतो..

यात इंडिया टिव्ही नावाचे न्युज चॅनल सर्वात पुढे आहेत......या चॅनल्स च्या हेडलाईन्स तर इतक्या अचाट असतात की हसुन हसुन पोट दुखायला लागते

काही उदा.

1.jpg2_1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - उदयन