उभा ठाकला .... ठाकला साजण दारी...

उभा ठाकला .... ठाकला साजण दारी...

Submitted by पुरंदरे शशांक on 26 May, 2012 - 01:03

उभा ठाकला ..... ठाकला साजण दारी.....

अगदी केव्हाही कोसळेल असं गच्च भरलेलं आभाळ..............
पण...ना ढगांचा गडगडाट.... ना वीज....... एकूणच वातावरणात एक विचित्र शांतता भरुन राहिलेली......
झाडंही अगदी शांत, निचळ उभी, पानंही न हलवता .......

खूप दूरवर .. कुठेतरी पावसाचं आगमन झालेलं.......
त्यामुळे हवेत झालेला बदल, हलकेच जाणवतोय न जाणवतोय असा दरवळणारा सूक्षम मृदगंध........
आत्ता येईल, आत्ता येईल तो... असं वाट पहायला लावणारा तो..... जाणवतोय... दर्वळतोय.. पण नजरेस मात्र पडत नाहीये........
....कसं हे जीवघेणं वाट पहायला लावणं याचं ?.......

गुलमोहर: 
Subscribe to RSS - उभा ठाकला .... ठाकला साजण दारी...