गद्यलेखन

" मला काहीच प्रॉब्लेम नाही " हाच तर खरा प्रॉब्लेम आहे

Submitted by सुजा on 17 August, 2017 - 01:17

काल " मला काहीच प्रॉब्लेम नाही " बघितला . सिनेमा अजिबातच समजला नाही हाच आम्हाला प्रॉब्लेम झाला. नायक नायिका दोघंही आईवडिंलाच्या मनाविरुद्ध जाऊन कोर्टात लग्न करतात. दोन्ही पालकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात पण समजाऊ शकत नाहीत. मग काय लग्न करतात आणि स्वतःच घरकुल उभारतात . कष्ट चालूच असतात आणि काहीतरी बिनसतं अस नायिकेला जाणवत पण ते काय आहे ते प्रेक्षकांना समजतच नाही कारण काही प्रॉब्लेमच दाखवला नाहीये . बिनसण्याकरता काय प्रॉब्लेम असतो तो सशक्तपणे अधोरेखितच होत नाही . सगळं वरवरचं वाटत राहत. नायक सरळ मार्गी आहे . तो ऑफिस मध्ये काही अफरातफर/झोलझाल करत नाही .

विषय: 

"द सर्कल" (The Circle) च्या निमित्ताने

Submitted by चौकट राजा on 3 August, 2017 - 15:54

काल मी "द सर्कल" (The Circle) चित्रपट पाहिला. भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे कि नाही ते मला माहिती नाही. पण अमेरिकेत थिएटरांमधे येऊन गेला आणि आता नेटफ्लिकस इ. ठिकाणी उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट आहे "द सर्कल" ह्या सोशल नेटवर्किंग कंपनी / वेबसाईट बद्दल आणि चित्रपटाचा विषय आहे अशा वेबसाईट्स नी घेतलेला आपल्या जीवनाचा ताबा. समाजात डोळे (आणि बुद्धी) उघडी ठेऊन वावरणार्‍या अनेकांच्या डोक्यात हा विचार चाललेला असेलच! "द सर्कल" फक्त तो विचार विस्तृतपणे दाखवतो आणि आपले डोळे अजून उघडतात. फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप चे नाव न घेता हा चित्रपट त्याबद्दल थेट भाष्य करतो.

जबरदस्त "इंदू सरकार"

Submitted by सुजा on 29 July, 2017 - 16:16

फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याच्या इराद्याने " तुर्कमान गेट " या वस्तीवर बुलडोझर फिरवला जातो. वस्तीला आग लावली जाते /जाळपोळ केली जाते या सगळ्या गदारोळात आपली नायिका सापडते आणि अचानक तिला दोन लहान मुलं दिसतात. भेदरलेली/घाबरलेली . एकटीच . त्या जाळपोळीत त्यांचं रक्षण करण्यासाठी नायिका धावून जाते आणि त्या छोट्या मुलांच्या चक्रव्ह्यूहात जी काही अडकते आणि खऱ्या खुऱ्या चित्रपटाला सुरवात होते. नायिकेचा नवरा सरकारी ऑफिसर असतो . त्याने मुलांना घरात ठेऊन घेण्यासाठी नायिकेवर बंदी घालणं.

विषय: 

नाटक!!!

Submitted by सारंग पात्रुडकर on 24 August, 2014 - 02:52

नाटक… नाटकामधील रंजकता नेहमीच भुरळ घालते.

त्याच नाट्यजादूचा अनुभव घेण्यासाठी नाटक केले आणि बरच काही उलगड्लं…

नाटकात सगळं सरळसोट असतं उलट माणसं एरवीच जास्त नाटकीपणे वागतात, वेगवेगळे मुखवटे लावतात.
नाटकामधे सगळं कसं सरळ प्रामणिक आणि पारदर्शक असत. अगदी जे “काही” असेल ते प्रेक्षकांसमोर.
एखाद्याला वाटत असेल काय सगळं ठरवून तर घडतयं, याच्यानंतर तो प्रसंग हा संवाद हे हावभाव…

हा खरचं एवढा सरळ हिशोब आहे का? याचं उत्तर शोधताना नाटकामागची ‘नाटकं’ उलगडली.

अभिनयाची एक वेगळी कथा आहे फ़क्त अभिनय करुन चालत नाही ते ओव्हरऍक्ट वाटतं.

विषय: 

स्तब्ध शब्द....

Submitted by झुलेलाल on 28 September, 2013 - 02:24

`भाषा कधी मरत नाही... ती मारली जाते’... भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचं हे वाक्य. खूप दिवस मनाच्या गाभ्यात घुमत राहील, असं...
आजवर अनेक भाषा अशाच मारल्या गेल्या. काही अजूनही तरल्या आहेत. कारण भाषेचं मरण असं, अचानक होत नसतं. ते मरण पर्वतासारखं, हळूहळू असतं.
आधी आजूबाजूचे दगडधोंडे अदृश्य होतात, मग माती दूर होऊ लागते.. असं दीर्घकाळ चालतं, आणि ते इतकं सवयीचं होऊन जातं, की डोळ्यादेखत एखादा पर्वत नष्ट झाला तरी ते लक्षातही येत नाही.
हे झालं नैसर्गिक प्रक्रियेच्या बाबतीत! पण काही वेळा, कृत्रिमरीत्याही हे घडवलं जातं.

शब्दखुणा: 

गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:17

!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.

लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.

गुप्तता, चित्र चालू आहे! - आशिष महाबळ - aschig

Submitted by संयोजक on 19 September, 2012 - 15:46

(छ. टि. १: भारतीय कथांनुसार चित्रगुप्त, नारद आणि अत्री ही ब्रह्माची मुलं आहेत.
छ. टि. २: खालील संभाषणातील लोक व घटना खऱ्या आहेत आणि कल्पनांशी त्यांचा काहीही संबंध नाही.)

नारद : नारायण, नारायण! चित्रगुप्ता, तू या लोखंडी गजांच्या पलीकडे काय करतो आहेस?
चित्रगुप्त: काय करणार? मी लोकांवर पाळत ठेवतो तशी कोणीतरी माझ्यावर ठेवली.
ना: अरे पण तू केले तरी काय?
चि: मला जसे सर्व कळते तसे तुलाही कळते, तरी सांगतो, ऐक: मी काम करता-करता डुडलींग करत होतो.

वर्तुळ : भाग २

Submitted by विशाल कुलकर्णी on 11 September, 2012 - 00:32

काकु पुन्हा तेच भेसुर हसली...

हं... वेडा आहेस ! तू काय किंवा तुझे बाबा काय तिच्यासाठी फक्त एक माध्यम आहात. शहाणा असशील तर तुझे बाबा म्हणतात ते ऐक. हे घर, मी तर म्हणते घरच काय गावसुद्धा सोडून जा. तरच वाचशील.

वर्तुळ : भाग १
आता पुढे....

*******************************************************************************

नक्कीच काही तरी बिनसलय त्याचं. गेले तीन दिवस झाले रोज मी तळ्याकाठी वाट बघतेय त्याची, पण साहेबांचा पत्ताच नाही. शेवटी वैतागून ठरवलं की आज त्याच्या घरी जायचच, अगदी जायचं म्हणजे जायचं.'

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन