समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातलं सांगायचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे शब्द !
शब्दांचं महत्व जरी एवढं असलं कि बऱ्याचदा हे 'शब्द'च एका उत्तम होऊ शकणाऱ्या संवादाच्या मध्ये येतात.असं होतं कारण,आपण जे काही शब्दांमधून बोलण्याचा प्रयत्न करत असता ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरेच पडतात.एकामागून एक कितीही शब्द ठेवले तरी 'जे ' व्यक्त करायचं असतं ते पुन्हा शिल्लक राहतंच !
काहीवेळा असंही होतं कि,सांगायचं असतं वेगळंच पण 'ते ' सांगायला आपण जे शब्द वापरतो त्यातून काहीतरी वेगळंच व्यक्त होऊन जातं आणि आपला त्यावर इलाज नसतो कारण कितीही प्रयत्न केला तरी शब्द अपुरेच पडतात !
नव्या शहरात येतो ना,तेव्हा पाहुणे असतो आपण त्या शहरासाठी....
अगदी नवखे,नवीन,अनोळखी पाहुणे...आता पाहुण्यांनी म्हणजे आपण लगेच अशी अपेक्षा करू नये कि,आपल्याला लगेच त्यांच्यातलाच एक समजायला लागेल हे शहर...
पाहुण्याला 'घरातलाच ' एक व्हायला वेळ लागतो,तो वेळच मागत असतं ते शहर...
एकदा तो वेळ दिला कि,सामावून घेतं ते शहर तुम्हाला...तुम्ही वेगळे राहातच नाही मग,तुम्ही शहरातले आणि शहर तुमच्यातलंच होऊन जातं !!
माणसं हि अशीच असावीत का ? वेळ देत नाहीयोत का आपण ?

कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु: |
यक्षचक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ||१||

दिवस १९७३ चे होते. जीवन आजच्या तुलनेने साधे होते. अंगभर साडी नेसलेली, एक वेणी घातलेली आणि ती वेणी उजवीकडून पुढे आणलेली तरुणी साधी असली तरी नायिका म्हणून शोभत होती आणि सुंदरही दिसत होती. बलदेव खोसाचा भोळा भाबडा चेहराही नायक म्हणून पडद्यावर स्विकारला जात होता. आणि या सर्वात माधुर्य आणत होते ते त्याकाळचे संगीत. चित्रगुप्त यांना नौशाद, सी रामचंद्र, मदनमोहन यांच्याप्रमाणे नावाजले गेले नसले तरी त्यांनी जी मोजकी गाणी दिली ती मात्र जबरदस्त होती. "चंदा की किरनोंसे" हे त्यातीलच एक गीत.