लेख

ये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है…

Submitted by अतुल ठाकुर on 28 March, 2020 - 04:01

download_1.jpg

शब्दखुणा: 

सहचरी नावाची केअर गिव्हर - डॉ. शैलेश उमाटे

Submitted by अतुल ठाकुर on 6 February, 2020 - 00:36

ठाणे पाठपुरावा वर्धापनदिन म्हणजे एक मेजवानी असते. माधव कोल्हटकरांच्या कल्पक आयोजनामुळे यादिवशी तासदीड तासाच्या कर्यक्रमात अतिशय मौलिक माहिती हा कार्यक्रमाला येणार्‍यांच्या पदरी पडते. स्वतः माधवसरांचे खुसखुशीत निवेदन, विनोदाची पखरण असतेच. त्यातून डॉ. शैलेश उमाटेंसारखे विनोदाचे वावडे नसलेले, आपले व्याख्यान अतिशय सहज, सोप्या भाषेत, घरगुती उदाहरणाने समजावून देणारे आणि त्याजोडीला अभिनयाचे अंग असलेले, तरुण व्यक्तीमत्व जर कार्यक्रमाला लाभले तर कार्यक्रमाची रंगत वाढतच जाणार यात नवल नाही. कालचा कार्यक्रमही तसाच रंगला.

विषय: 
शब्दखुणा: 

जीए कथा एक आकलन - सांजशकुन- अस्तिस्तोत्र - १

Submitted by अतुल ठाकुर on 13 January, 2020 - 23:34

जीएंच्या सांजशकुन मधील अस्तिस्तोत्र ही पहिली कथा. कथा फक्त चार पानांची. पण संस्कृतात सूत्र वाङ्मय असतं त्या धर्तीची आहे. सूत्रं अगदी छोटी असतात. किंबहूना ती छोटीच असावी असा नियम आहे. अल्पाक्षरत्व हा येथे फार मोठा गुण मानला जातो. मात्र या एकेका सूत्राचा आवाका प्रचंड असतो. त्यावर नाना तर्‍हेच्या टिका लिहिल्या जातात. अनेक विद्वान अनेक तर्‍हेने त्यांचा अथ लावतात. खरं तर "सांजशकुन" मधील सर्व कथाच सूत्राप्रमाणे आहेत. अणी मी विद्वान नसतानादेखील त्यांतील काही कथांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेख