तंत्रज्ञान

मराठी भाषेतील ई-पुस्तके आणि तदनुषंगाने स्वामित्वहक्कांबद्दल चिंतन

Submitted by व्यत्यय on 1 March, 2014 - 04:03

जगभरातील मराठी भाषिक लोकांमध्ये स्मार्ट फोन आणि टेबलेट वापरायचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. या फोन किंवा टेबलेटवर इंग्रजी ई-पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या पण लक्षणीय आहे. तरीही मराठी भाषेतली ई-पुस्तके कुठेही बघायला मिळत नाहीत. बुकगंगा यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण तरीही त्यांचे स्वत:चे वेगळे app वापरावे लागते. आणि माझा या app चा अनुभव काही चांगला नाही. मी Flipkart किंवा तत्सम साईटवरून अजूनही मराठी ई-पुस्तके विकत नाही घेऊ शकत.

आयपॅड मधील नोट्स मधलं लिखाण अर्ध् मुर्ध दिसतंय.

Submitted by मानुषी on 27 February, 2014 - 11:17

माझ्या आयपॅड वर मी गुगल इन्पुट्मधे मराठी टाइपते. आणि ते नोट्स मधे कॉपी पेस्ट करते.
ईंग्रजी लिखाण तर तिथेच करते.
अचानक काल नोट्समधलं प्रत्येक पानावरच् लिखाण अर्धवट डिलिटेड अर्ध शिल्लक असं दिसतंय.
काय झालं असेल? सगळी पानं अशीच अर्ध्वट डिलिटेड दिसतात.
प्लीज संगण्क तज्ञांनो मदत करा.

शब्दखुणा: 

इंटरनेट चे भविष्य

Submitted by Mandar Katre on 26 February, 2014 - 00:43

संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय

नुकत्याच अमेरिका स्थित MDIF नामक संस्थेने संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा देण्याची योजना जाहीर केली आहे . या योजने अंतर्गत जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून मोफत इंटरनेट वापरता येणार आहे.

कंपनी पुढच्या काही वर्षात पृथ्वीभोवती अवकाशात फिरणाऱ्या शेकडो क्यूब -SAT उपग्रहांचे जाळे निर्माण करणार आहे ,ज्यायोगे आज ज्याप्रमाणे जीपीएस सेवा दिली जाते ,त्याच प्रमाणे भविष्यात फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाइल .

'बघू पुढे' वाली पिढी

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2014 - 05:53

ह्या धाग्यान्वये एक गंमतीशीर अनुभवकथन व त्याबाबत थोडे मतप्रदर्शन करण्याची संधी घेत आहे. काही प्रमाणात ह्या धाग्यातील विषयाचा संबंध माझ्या 'मराठीचा अभिमान' आणि 'यू आर रिजेक्टेड' ह्या दोन धाग्यांमधील विषयाशी आहे, पण ह्या धाग्यात वेगळ्याच कोनातून अनुभवकथन करत आहे.

==============

मृत्युंजय

Submitted by व्यत्यय on 18 January, 2014 - 09:50

सर्व जगंच कसं नीट आखीव रेखीव आणि सुंदर होतं.
झोपडपट्ट्या नव्हत्या, गरीबी नव्हती. युद्ध नव्हती, कोणीही जन्मत: अधू किंवा अपंग नव्हतं. मनोरुग्णांचे कोंडवाडे नव्हते. वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाने सर्वच रोगांवर विजय मिळवलेला. अगदी म्हातारपणावर देखील. अपघातांमुळे होणारे तुरळक मृत्यू सोडले तर “मरण” हे काही कर्मठ विचारसरणीच्या लोकांचा दुराग्रह होता.

मतदार नोंदणी, गुगल, सुरक्षा

Submitted by स्वाती२ on 5 January, 2014 - 10:40

आज टाईम्स ऑफ इंडीयातील
http://timesofindia.indiatimes.com/india/Security-fears-over-Election-Co...
ही बातमी वाचली. मतदार नोंदणीचे काम गुगल या कंपनीला दिल्यामुळे सुरक्षेसंबंधी प्रश्न निर्माण होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयाच्या बर्‍या-वाईट परीणामांबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 

ISRO - आम्हाला तुमचा अभिमान आहे !

Submitted by विजय देशमुख on 5 January, 2014 - 06:52

आज ISRO ने GSLV-D5 चे यशस्वी उड्डान करुन भारताच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय जोडला आहे. क्रायोजेनिक इंधन वापरुन हे रॉकेट बनवले होते. क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानास परदेशातुन मदत न मिळाल्याने ते तंत्रज्ञान ISRO च्या शास्त्रज्ञांनी स्वतः शोधले.
या तंत्रज्ञानाचा वापर करुन अतिशय कमी खर्चात उपग्रह त्याच्या कक्षेत स्थापित करण्यास मदत होईल. त्यामुळे आता भारताला इतर विकसनशील देशांचे उपग्रहही अंतराळात स्थापित करणे शक्य होणार आहे.

सर्व शास्त्रज्ञांचे आणि अश्या प्रकल्पास अप्रत्यक्षपणे मदत केलेल्या प्रत्येकाचे (अगदी राजकारण्यासह) अभिनंदन.

शब्दखुणा: 

याहु मेल मधे प्रॉब्लेम आहे का? २४ डिसेंबर २०१३ - सेंध्याकाळ ६:०० वा

Submitted by mansmi18 on 24 December, 2013 - 08:43

याहु मेल मधे प्रॉब्लेम आहे का? माझे सेशन एक्स्पायर होत रहातेय.
इतर कोणाला हा प्रॉब्लेम येतोय का? (मी फायरफॉक्स आणि क्रोम मधे पाहिले ..सेम प्रॉब्लेम आहे).

डिलीट झालेल्या फाइल्स रीकवरी साठी मदत हवी आहे.

Submitted by निवांत पाटील on 23 December, 2013 - 00:51

शनिवारी थोड्याशा गडबडीत एक मोठी चुक झाली. Happy
एका डेस्क्टॉप्च्या डेस्कटॉप वर एक फोल्डर होता. त्यात गेल्या महिनाभरात क्रियेट केलेल्या ८ ते १० एक्स्सेल फाइल्स होत्या. त्याला ड्रॉपबॉक्स मध्ये शेअर करुया असा विचार करुन त्या डेस्कटॉप वर ड्रॉपबॉक्स इन्स्टॉल केला. तो कॉम्प माझा नसल्यामुळे फक्त एक फोल्डर सिन्क्रोनाइज करायचा होता जेणेकरुन मी त्या फाइल्स त्या ऑफिसबाहेरुन अपडेट करु शकेन आणि तेथे बाकिच्या लोकांना अ‍ॅक्सेस करता येइल असा प्लॅन होता. ( नमन पुर्ण)

शब्दखुणा: 

भारतरत्न पुरस्कार विजेते प्रा. सीएनआर राव

Submitted by विजय देशमुख on 16 November, 2013 - 21:10

आज डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा सन्मान जाहीर झालाय. डॉ. सि.व्ही. रामन आणि डॉ. कलाम यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते तिसरे शास्त्रज्ञ. ७९ वर्षाचे डॉ. राव यांनी १५०० हुन अधिक शोधनिबंध, ४५ पुस्तके लिहिलि असुन त्यांचा h-index १०० हुन अधिक आहे, जो जगात फारच थोड्या लोकांचा असतो. {बहुतेक नोबेल लॉरेटचा}.
याबद्दल त्यांचे अभिनंदन.

Pages

Subscribe to RSS - तंत्रज्ञान