माहिती

मदत!मदत!!मदत!!!

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

नमस्कार मित्रांनो, मला एक लवकरात लवकर एक मदत हवी आहे. इथे सिंगापूरात बरेच साहित्य हवे तसे मिळत नाही. म्हणजे यंदा गणेशोत्सवात आम्हाला पौराणिक कथा वाचायच्या आहेत. त्यासाठी मला त्रिशंकूच्या कथेची दीर्घ आवृत्ती हवी आहे. मला नेटवरुन जी मिळाली ती वाचून लगेच संपेल. अगदी मिनिटा दोन मिनिटात. मला मैत्रेयी आणि गार्गि ह्यांच्या पण कथा हव्या आहेत. तसेच सर्वात म्हत्त्वाचे म्हणजे देवी अनुसयामात हिच्या पतीव्रताची परिक्षा देवांनी कशी घेतली त्याबद्दलची कथा हवी आहे. अजून जर छान छान पौराणिक कथा कुणाकडे असतील तर मला ykakad@gmail.com वर स्कॅन्ड करुन पाठवा.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मंगळावरील प्रयोगशाळा

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

क्युरिऑसिटी साधारण १२ तासांपूर्वी मंगळावर अवतरले. मंगळाचे एक वर्ष कार्य करु शकेल इतपत उर्जा या मंगळाचराला प्लुटोनियम द्वारे उपलब्ध आहे. ताशी ३० मिटर गतीने सरकत, अडीच फुटांपर्यंतचे अडथळे पार करत क्युरिऑसिटी या लाल ग्रहाची माय्क्रोब्सना सहन करण्याची वृत्ती आजमावेल. पण हे विज्ञानाबद्दलच नाही तर अर्थकारणाबद्दलही आहे.

ग्रहांशी माझे (फार)काही देणेघेणे नाही, पण यावर कोणीही काहीही न लिहिलेले पाहून राहवले नाही. म्हणून हा आल्प खटाटोप. सगळीकडे याबद्दल बरेच काही अर्थातच उपलब्ध आहे.

प्रकार: 
शब्दखुणा: 

विज्ञानिका - ५ (हिलीयमची निर्मीती)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

या पुर्वी: विज्ञानिका - ४ (सापेक्षता - काळाची) http://www.maayboli.com/node/35019

विषय: 
प्रकार: 

एवेएठि मे २०१२

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

थोबाडपुस्तकाचे रोखे बाजार येऊन त्यावर नवीन खटले सुरू झाले तरी एवेएठिचा वॄत्तांत नाही या घटनेवर काही बाराकरांनी, त्यातून काही हजर असलेल्यानी, आणि बहुतेक एवेएठिचा काहीच संबंध नसलेल्यानी चर्चा करायला सुरूवात केली असून, वृत्तांतच नाही तर 'त्याला साधे गटग म्हणावे, एवेएठिचा दर्जा कशाला?' असा नाराजीचा सूर लावला आहे, अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे.

प्रकार: 

विज्ञानिका - ४ (सापेक्षता - काळाची)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

विज्ञानिका - ३ (सापेक्षतावाद - विशिष्ट)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

दोन साध्या वाक्यांमधे सापेक्षतावादाचा गाभा मांडता येतो:
(१) सगळ्या गोष्टी सापेक्ष असतात, आणि
(२) प्रकाशाचा वेग निरपेक्ष असतो.
पहिले वाक्य हे दूसऱ्या वाक्यातील प्रकाशाच्या वेगाचा निरपेक्षतावाद ठसवायला तसे रचले आहे. ती वाक्ये विसंगत वाटत असतील तर ती एकत्र करून असे म्हणता येईल की प्रकाशाचा वेग सोडून इतर गोष्टी सापेक्ष असतात. या 'इतर' मधे वस्तुमान, लांबी, वेळ व संबंधीत गोष्टी येतात. तुमचे वस्तुमान किती आहे (म्हणजे मोजल्या जाते) हे तुम्ही काय (खरंतर किती) खाल्ले आहे याच प्रमाणे तुम्ही मोजणाऱ्याच्या सापेक्ष किती वेगाने जाताय यावरूनही ठरणार. (वस्तुमान आणि वजन एक नाही).

विषय: 
प्रकार: 

विज्ञानिका - २ (फाईनमन सांकेतिकं)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आधीचा भागः विज्ञानिका - १ (अणुगर्भाच्या अंतरंगात)

फाईनमन सांकेतिकं ही मूलभुत कणांमधील उलाढाली समजुन घ्यायची गुरुकिल्ली. बलवाहक कण (जसेकी विद्युतचुंबकीय बलाचा वाहक प्रकाशकण, strong बलाचा वाहक W- ई.) हे लहरींनी दाखवले जातात तर इतर कण बाणेदार रेघांनी. विद्युतचुंबकीय भारासारख्या काही गोष्टी अविकारी असतात. त्यामुळे एखादा (ऋण भार असलेला) इलेक्ट्रॉन नष्ट झाला, तर सोबत घन भार असलेला एक कण पण नष्ट होणार (उदा. पॉझिट्रॉन).

विषय: 
प्रकार: 

विज्ञानिका - १ (अणुगर्भाच्या अंतरंगात)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

अणुगर्भ हे विद्युतभाररहीत न्युट्रॉन्स व घन भार असलेल्या प्रोटॉन्सचे बनले असतात. सर्वात हलका अणुगर्भ हायड्रोजनचा - त्यात एकच प्रोटॉन व शुन्य न्युट्रॉन. पण इतर सर्व अणुगर्भांमधे एकापेक्षा जास्त घन भारीत प्रोटॉन्स (आणि काही न्युट्रॉन्स) असतात. अनेक वर्षे प्रोटॉन आणि न्युट्रॉन हे मूलभुत कण समजल्या जात. पण नंतर ते क्वार्क्सचे बनले असतात असे दाखवले गेले. प्रोटॉन मधे दोन अप आणि एक डाऊन तर न्युट्रॉन मधे दोन डाऊन आणि एक अप (p=uud; n=udd).

विषय: 
प्रकार: 

Luwan of Brida - सारंग महाजन

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

सारंग महाजन हा माझ्या धाकट्या भावाचा मित्र. त्याच्या हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ रिंग्ज प्रेमामूळे आमचं बरं जमायचं. हॅपॉ सिरीजमधलं पुस्तक बाजारात आलं की याच्या हातात आणि नंतर एक-दोन दिवसात त्याच्याकडून माझ्या हातात यायचं. माझ्या लग्नाची इ पत्रिका याने मला बनवून दिली होती.

भावाबरोबर बीएससी करून नंतर एमबीए ( ??) झालेला हा पोरगा. नोकरीच्या भानगडीत न पडता याने वेब पेज डिझायनींग सुरु केलं. सारंग काय करतोय याचं उत्तर दर काही दिवसांनी बदलायचं. वेब पेज डिझायनींग /मेन्टेनंस चालू होतंच. सोबत जीम, फोटोग्राफी, भटकंती, वाचन, लिखाणही चालू होतं.

प्रकार: 

नुस्कान काय हाय?

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

अनेक गोष्टी अपायकारक ठरु शकतात.
ज्यांच्याकरता त्या तशा ठरल्या अशांबद्दल थोडे.

http://www.whatstheharm.net/homeopathy.html
(४३७ लोकांना हानी पोचली)

http://www.whatstheharm.net/astrology.html
(६० हजार लोकांना धोका झाला)

http://www.whatstheharm.net/fengshui.html
(५ लोकांचे नुकसान झाले)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - माहिती