पर्यावरण

पर्यावरण

पाणघोडा कसा पाळावा?

Submitted by माँटी on 25 February, 2020 - 01:06

रहदारी व प्रदूषण यावर अक्सीर उपाय जलवाहतूक आहे. त्यासाठी पाणघोडा कसा पाळावा याबद्दल माहिती हवी आहे.

शब्दखुणा: 

या पिशव्यांच करायचं काय?

Submitted by रंगराव on 17 February, 2020 - 12:03

जैविक अन् विघटनशील कचर्याच्या व्यवस्थापनाच्या पर्यायी उपाययोजना आता समाजात मुळ धरु पाहतायेत. पण प्लास्टिकच्या बाबत मात्र आपण बरेचसे परावलंबी आहोत. रोज राज्यात एक कोटी दुधाच्या पिशव्यांची विक्री होते. रोज दुधाच्या पिशव्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर येत असतो. हा कचरा विविध नाले गटारे आणि इतर ठिकाणी साचून राहिल्याने बर्‍याच परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की या पिशव्या केरातून त्यांच्या पोटात गेल्याने भटक्या प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो, केरातून काही महाभाग या पिशव्या गटारी मध्ये टाकतात ,गटारी ,ड्रेनेज तुंबतात,अनारोग्य उद्धभवते.

वानरे - माकडांचे मृत्यू, आईची माया आणि भावना

Submitted by Dr Raju Kasambe on 12 February, 2020 - 04:20

वानरे - माकडांचे मृत्यू, आईची माया आणि भावना

ह्या लेखात माकडे तसेच वानरांच्या आयुष्यातील काही दुःखद घटना वर्णन केलेल्या आहेत. अर्थात मला जमेल आणि अर्थबोध होईल तसे ते लिहिले आहे. घटना (निरीक्षणे) खरी आहेत पण घटनांच्या अनुषंगाने आलेली माझी मते सत्यच असतील असे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही.

हाऊ टु ट्रेन युवर गेंडा? काझीरंगाच्या आठवणी!!

Submitted by Dr Raju Kasambe on 10 February, 2020 - 12:30

हाऊ टु ट्रेन युवर गेंडा? काझीरंगाच्या आठवणी!!

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला काझीरंगाच्या राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता संशोधन प्रकल्प मिळाला आणि त्या निमित्ताने मला अंदाजे एक महिना (नोव्हेंबर व डिसेंबर २०१५) आसामात राहावे लागेल अशी माहिती मिळाली. त्या दरम्यान मी तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी घ्यावयाच्या होत्या. म्हणजे माझे आवडते काम!

wetlands - आपल्या किडनीज

Submitted by डी मृणालिनी on 9 February, 2020 - 11:36

कोकण सारखे ठिकाण , जिथे ३००० mm पाऊस पडतो. यावरून सगळ्यांनाच असं वाटतं कि कोकणात पाणी भरभरून असेल. पण तरीही मे महिन्यात इथल्या काही गावांमध्ये टँकर का लागतो ? मुळात कोकणातल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता ०% आहे . महाराष्ट्राला पश्चिम घाट लाभल्यामुळे पावसाचे पाणी थेट या डोंगरांवरून थेट समुद्रात जात नाही . का ?? फक्त wetlands अर्थात पाणथळ जागा यांच्यामुळे . wetlands हे पर्यावरणात स्पंज सारखे काम करतात . जास्तीत जास्त पाणी शोषतात आणि गरज असताना release करतात . त्यामुळेच कोकणाला पाणी मिळते. झाडे जर आपली फुफ्फुसे आहेत तर wetlands आपली किडनी आहे.

प्रांत/गाव: 

टूु ग्लोबल वॉर्मिंग

Submitted by आ.रा.रा. on 7 February, 2020 - 11:48

मतला:
मजेमजेचे गार हवेचे चार दिवस तू भोगून घे
आहे जोवर चान्स तुला, जीवन-हला तू झोकून घे!

मक्ता:
आयुष्याच्या संध्याकाळी, म्हणतो आहे आ.रा.रा...
माझ्या वंशजा जे आम्ही तोडले, जमले तर तू जोडून घे

*

गझलेत शेर भरा, ही न. वि.

शब्दखुणा: 

दुर्मिळ पक्ष्याच्या शोधात: जेर्डन्स कोर्सर (उत्तरार्ध)

Submitted by Dr Raju Kasambe on 7 February, 2020 - 08:51

दुर्मिळ पक्ष्याच्या शोधात: जेर्डन्स कोर्सर. (उत्तरार्ध)

दि.१० जून २००६:
दुर्मिळ जेर्डन्स कोर्सरच्या शोधात. या दिवशी सकाळी आम्हाला ब्लॅक आयबिस, कॉमन वूडश्राइक, पाम स्विफ्ट, यलो-लेग बटनक्वेल आणि पिवळ्या चोचीचा सातभाई दिसला. ह्या सातभाईंची शिळ खूप मंजुळ आणि कर्णमधुर असते.

दुर्मिळ पक्ष्याच्या शोधात: जेर्डन्स कोर्सर. (पूर्वार्ध).

Submitted by Dr Raju Kasambe on 7 February, 2020 - 05:58

दुर्मिळ पक्ष्याच्या शोधात: जेर्डन्स कोर्सर. (पूर्वार्ध).

बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा

Submitted by Dr Raju Kasambe on 4 February, 2020 - 01:19

बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा

हजारो अग्निपंखांचे थवे गुलाबी
खाडीत कांदळवनाच्या उतरती
लावे वेध मिलनाचे, चाहूल मृगाची
ठेका धरतो ‘फ्लॅश मॉब’ नृत्याचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

लिपस्टिक आयशाडो
मिनिस्कर्ट स्टॉकिंग्ज
तयारी गुलाबी गुलाबी
करून मेकअप पूर्ण पार्टीचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

कॅटवॉक गुलाबी सुंदरींचा
नटून, खेटून चाले तुरुतुरु
जणू परेड नृत्यांगणांची
आभास नुसता खाण्याचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

Pages

Subscribe to RSS - पर्यावरण