प्रकाशित

स्वप्नरिक्त

Submitted by भुईकमळ on 6 November, 2014 - 04:41

आता फक्त भास
सोबतीला उरे
कुठे शब्दझरे
झाले लुप्त..॥१॥

कशा उजळाव्या
मंद प्राणवाती
पापणीच्या काठी
अश्रुराग ...॥२॥

लाटाळली रात्र
कशी यावी नीज
बैचेनीची गाज
काळजात॥३॥

नाही बघायचे
पुन्हा पुन्हा मागे
गाव पाठी जागे
हुंदक्यांचे .॥४॥

अंधारपालखी
फांद्या पेलतात,
पाने पोळतात
काजव्यांनी..॥५॥

प्रकाशीत

Submitted by संजयb on 10 March, 2012 - 13:32

एक गूपीत सांगू का?
मी स्वयं प्रकाशित झालो आहे
गात्र गात्र कणन् कण
झगमगून गेले आहेत
जणू मी तारा झालों आहे
आंधाराची भिती नाही
प्रकाशाची एक शलाका
माझ्यात पेटली आहे
प्रवासाचा रस्ता
अन् लक्ष देखील काळले आहे
बाजूस व्हा अभाग्यानों
मी आता निधालो आहे
तूमच्या साठी वाटा विसावे
मीच आता बांधणार आहे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - प्रकाशित