उपक्रम

कथाशंभरी - २ - घर - पल्लवी ०९

Submitted by पल्लवी ०९ on 6 September, 2022 - 23:46

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
उत्साहाने घराचे कुलूप उघडणाऱ्या जोडप्याकडे पाहून त्याने आपली नजर वळवली. आपल्या नजरेत पराकोटीचा विषाद , मुरलेली हतबलता त्यांना जाणवू नये ह्या पंचायतीत! त्याच्या बंद डोळ्यांसमोर त्याने आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने आकडेमोडीत घालवलेले कित्येक तास तरळून गेले. दुसऱ्या क्षणी मानेला हलकेच दिलेल्या झटक्यासरशी मनातले कडवट विचार बाजूला करत शेजाऱ्यांचे स्वागत करायला रघू हसून पुढे झाला.

विषय: 

चित्रकला उपक्रम २ - कार्टून कॅरेक्टर - स्वाती_आंबोळे (गौरी)

Submitted by स्वाती_आंबोळे on 6 September, 2022 - 22:08

कथाशंभरी २ - चक्रनेमिक्रमेण - हरचंद पालव

Submitted by हरचंद पालव on 6 September, 2022 - 20:41

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि पुन्हा काहीतरी आवाज येतो आहे असे वाटून तो चपापला. खात्री करण्याकरिता दारापाशी गेला आणि कुठल्यातरी भितीने आल्यापावली स्वगृही परतला. त्या बंद घराच्या आतून ती सगळा प्रकार सीसीटीव्हीवर बघत होती. पण तिकडे लक्ष देण्यापेक्षा आत्ता व्हिडिओ कॉलवर मैत्रिणीशी बोलणे गरजेचे होते. बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय! सीसीटिव्हीवर रघू पुन्हा घराबाहेर पडलेला दिसला.

विषय: 

कथाशंभरी - हे भगवान!

Submitted by छन्दिफन्दि on 6 September, 2022 - 15:17
#ganapti2022 #littlemoments #kathashambhari

लक्ष्मी लग्नानंतर मुंबईला राहायला आली. नवीनच ओळखी झल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी.
शेजारीच अजून एक छोटी बिल्डिंग होती. त्यांची स्वयंपाकघराची खिडकी लक्ष्मी च्या स्वयंपाकघराच्या खिडकीसमोरच होती.

सकाळी चहा करताना समोरच्या घरातून काकांचा आवाज येई
"भगवान दूध घे. " " भगवान चहा घे ." "भगवान पाव घे "

त्या कुटुंबाशी जास्त ओळख नव्हती तरी त्या काकांच्या खानपानाची कीर्ती तिच्यापर्यत आली होती.
"काय लोकं असतात एकेक, सकाळी सकाळी उतरलेली नसते तरी आपलं देवापुढे उभं राहायचं. नीट उतरू तरी द्यायची ना आधी. देवाला काय तर म्हणे चहा आणि ब्रेड घे "

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०२२: आमचा बाप्पा

Submitted by छन्दिफन्दि on 6 September, 2022 - 14:47
#ganpati #littlemoments #ganpati2022

परवा गणपतीसाठी चांदीची,तांब्या-पितळेची भांडी उजळवत होते. माझ्या अत्यंत आवडीचा उद्योग! हळू हळू सगळी पुटं जाऊन लखलखीत झालेली भांडी देव्हाऱ्याचा नूरच पालटतात. ती उजळवत असताना मन पस्तीस एक वर्ष मागे गेलं.
आमचं गाव डहाणू जवळचं. आम्ही हरतालिकेच्या आदल्या दिवशी धडकायचो. स्टेशन पासून बसने अर्ध्या तासात घरी पोहोचायच. विहिरीवर हात पाय धुवायला गेल्यावर दिसायच्या कठड्यावर वाळायला ठेवलेल्या लखलखीत केलेल्या समया, तांबे.

विषय: 
शब्दखुणा: 

कथाशंभरी२- समज गैरसमज

Submitted by अज्ञानी on 6 September, 2022 - 08:16

..... आज नव्याने सेतु बांधावा का ह्या विचारात असतानाच मागून हाक आली.

स्वामी, जिथेतिथे कथाशंभरीमध्ये रघू म्हणजे कोणीतरी खुप वाईटच असणार असा समज देशात दृढ़ होऊ लागलाय.

ह्याला दुजोरा देणारा धीरगंभीर स्वर उमटला.

प्रभु, निस्सीम भक्तीने रघूरामाची सत्ता घरावर प्रेमळपणाने स्विकारणारे जनवासी ह्या वसुंधरेवर दुर्मिळ झालेले असताना नलनिलांची अद्भुत विद्या फक्त द्विपक्षीय चर्चामध्ये मांडवलीचे सेतु बांधण्यापुरताच शिल्लक राहिलीय का असेच दृश्य पाहण्यात येत आहे.

विषय: 

कथाशंभरी २ - रघू - अज्ञानी

Submitted by अज्ञानी on 6 September, 2022 - 01:54

दरवेळी माझ्यासोबतच सर्व सण साजरे व्हायचे. आज तर विशेष महत्व म्हणून पुरणाचा बेत असायचा. फुलांच्या माळा आणि मस्त झूल सुद्धा. आनंदाने माझ्या अंगावर रोमांच उठायचे आणि त्याचबरोबर घुंगराची लयबद्ध किणकिण... त्या आवाजासरशी प्रत्येकवेळी माझ्याकडे कौतुकाने पाहिलेली ती प्रेमळ नजर...डौलदार वशिंडावर मारलेली मायेची थाप... आज सर्व सर्व काही तिव्रतेने आठवतंय. धनी अचानक गेल्यावर कर्जफेडीसाठी उरलेली पूंजी म्हणजे मीच होतो फक्त ! त्यानेही भागले नाही म्हणून घरावर जप्ती झाली.. आणि माझी बैठक सावकाराच्या घरी !!

विषय: 

कथाशंभरी - २ - घर नंबर १२ - अमितव

Submitted by अमितव on 5 September, 2022 - 09:46

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि क्षणभर थबकलाच. आज एकटा असतानाही तो ते घर 'बघू' शकत होता! इकडे बाबाबरोबर कितीतरी वेळा तो आलेला. फ्रेम केलेले असंख्य फोटो, लांबसडक जिने आणि एकाच फ्रेमवर घातलेली चादर! ती चादर घातल्याने त्या फोटोतल्या आज्जीला बाहेरचं जग खरंच दिसत नसेल? आणि बाजूच्या अंधार्‍या खोलीत काढलेला तो वंशवृक्ष. ते बाबाचं घर असुनही वंशवृक्षात बाबाचं नाव नाही हा पडलेला प्रश्न! शेजारी राहुनही ते अदृष्य घर फक्त बाबा असतानाच कसं दिसतं हे कोडं! बाबा गेल्यावर आता आईला आधार द्यायला हवा विचार करतोय तोवर आईची हाक ऐकू आली अल्बस-सेव्हरस!

विषय: 
शब्दखुणा: 

कथाशंभरी२ - प्रस्थान - मामी

Submitted by मामी on 5 September, 2022 - 06:59

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि लगबगीने तो चावी घेऊन त्या घरात गेला.

गेल्यागेल्या त्याने दार आतून व्यवस्थित लावून घेतले आणि तो थेट शेवटच्या खोलीत गेला. खोलीला एक भलीमोठी काचेची खिडकी होती.

रघूने अंगावरचे कपड्यांचे थर ओरबाडून काढून टाकले, घड्याळात बघून काहीएक आकडेमोड केली आणि समोरच्या फडताळाचे दार उघडून त्यातील चोरकप्प्यातील एक कळ दाबली.

आवाज न करता घर वर उचलले गेले आणि अंतराळात झेपावले. पृथ्वीवरचे काम संपवून आज रघू तब्बल ५०० पृथ्वीवर्षांनी त्याच्या मातृग्रहाकडे परत जात होता.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - उपक्रम