उपक्रम

बीज अंकुरे अंकुरे- मराठी भाषा दिवस २०१२

Submitted by संयोजक on 20 February, 2012 - 22:17

beej_ankure copy.jpg

मराठी भाषा दिवस २०१२ निमित्ताने थोडे मुद्द्याचे बोलुया?
इथे खाली दिलेल्या मुद्द्यांवर लिहिणे अपेक्षित आहे.

  • आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­
  • तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
विषय: 

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' परिसंवाद विशेषांक - घोषणा २

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 February, 2012 - 11:56

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओ़ळख(आयडेन्टिटी)-' परिसंवाद विशेषांक

विषय: 

मराठी भाषा दिवस २०१२- लहान मुलांचे कार्यक्रम

Submitted by संयोजक on 7 February, 2012 - 13:54

आपलं बालपण समृद्ध करणारा आपल्या भाषेचा पिढीजात वारसा, आपल्या मातीशी तिथल्या निसर्गाशी, माणसांशी आपलं नातं जोडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टी. नव्या पुस्तकांचा हट्ट धरायला लावणार्‍या, त्यांच्या सुवासासारख्या दरवळत राहणार्‍या, आयुष्यभर साथ करणार्‍या रंजक गोष्टी. आजीआजोबांच्या मायेची ऊब देणार्‍या गोड गोष्टी. मुलांचं आकलन वाढतं तशा स्वरचित गोष्टींनाही बहर येतो. त्या तर भन्नाट !

१. नेहमीच्या गंमतगोष्टी
नियमावली

विषय: 

मायबोली - शीर्षकगीत : प्रकाशन

Submitted by Admin-team on 30 January, 2012 - 20:49
मायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून सहभागी असणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन. या शीर्षकगीताची जी छोटी झलक होती, तिला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, तसेच या संपूर्ण गीतालाही तुम्ही आपलेसे कराल, अशी आशा आहे.
-मायबोली.कॉम


मायबोली शीर्षकगीत ऐका:

विषय: 
शब्दखुणा: 

शीर्षकगीत : माझा अनुभव (पेशवा)

Submitted by पेशवा on 30 January, 2012 - 00:12

"तू गातोस हे माहीत नव्हतं! " "मलाही नव्हतं! तू आहेस म्हणून धाडस करतोय" स्काईपवर हा माझा आणि योगेशचा संवाद... स्टेजवर लहानपणी कधीतरी गायलेलं गाणं आणि चार मित्रात केलेला घसा साफ ह्या पलीकडे गाणं "गायची" कधी वेळ आली नाही . ह्या वेळी 'य' धाडस करून योगेश ला इ-पत्र टाकलं होत. माझ्या साठी गाणं हे त्या कॉलेज मधील हव्याहव्याश्या वाटणाऱ्या पण (कायम) दुसऱ्याला वश (काय झकास शब्द आहे) होणाऱ्या काळिज-दुःख मुली सारखच. त्यामुळे योगेशला ह्याची कल्पना आधीच देऊन टाकली होती. म्हणजे सुर सापडतील ह्याची खात्री नाही आणि सापडलेच तर तालात येतील ह्याची हमी नाही. तू सांग मी गातो (त्याला ज्ञानेश्वर व्ह्यायची संधी.

विषय: 

शीर्षकगीत - आमचं गाणं (श्यामली)

Submitted by श्यामली on 30 January, 2012 - 00:10

गणेशोत्सव संपता संपता, योगेशची मेल आली, असं असं मायबोली शिर्षक गीत करायच आहे त्यात तुम्ही म्हणजे मी, माझा मुलगा कौशल आणि मुलगी देविका तिघांनी गायच आहे. सोबत त्या बाफची लिंक जोडलेली होती. सुट्टी संपत आली होती, बराच वेळ हाताशी असणार होता गायला आवडतच आणि पुन्हा मायबोलीसाठी असं असल्यामुळे जोरात हो म्हणून सांगितल.

इथे झालेल्या काही(संगीत) गटगमुळे माझ्या मुलांचा आणि माझा आवाज योगेशला ठाऊक होता त्यामुळे आमची या प्रोजेक्टसाठी डायरेक्ट एंट्री असणार होती म्हणे :) मोठ्या लोकांशी असलेल्या मैत्रीचा अभिमानच वाटला एकदम. :)

विषय: 

माझ्या मायबोलीचं अभिमान गीत आणि मी - (जयश्री अंबासकर)

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 30 January, 2012 - 00:07

मायबोलीने शिर्षक गीत स्पर्धा आयोजित केली तेव्हा मला “मी आणि माझी मायबोली” ह्या स्पर्धेची आठवण झाली. ह्या स्पर्धेत मला मिळालेलं पहिलं बक्षिस आठवलं :)

http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118058.html

http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/marathi_audio_maayboli.html

उल्हास भिडेंना बक्षिस जाहीर झालं तेव्हा वाटलं........मायबोलीची दुसरी पिढी आपलं मनोगत व्यक्त करतेय. भावना त्याच.... फक्त शब्द थोडेसे वेगळे. मायबोली तीच फक्त तिचे चाहते वेगळे, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आणि आता तर ह्या शब्दांना सूर, तालही मिळालाय. खूप खूप छान वाटलं.

विषय: 

मायबोली शिर्षकगित -- माझा अनुभव - (वर्षा.नायर)

Submitted by वर्षा.नायर on 29 January, 2012 - 23:56

गेल्या अनेक महीन्यात खरेतर मला मायबोलीवर येयला देखिल वेळ झाला नाही. ऑफिसमधे मायबोली ब्लॉक्ड आहे आणि बाकी इतर अनेक गोष्टींमधे बिझी झाल्याने घरी आल्यावर देखिल मायबोली वर येता येत नव्हते. अर्थात मनात ह्याबद्दल रुखरुख आणि खंत जरुर असते. दुबईतील माझ्या माबोकर मित्र-मैत्रिणींकडुनपण नेहमीच मायबोलीवरील खास अपडेट्स मिळत असतात. मायबोली शिर्षक गिताची स्पर्धा झाली आणि त्याला योग चाल लावणार हे मला त्यांच्याकडुनच समजले.
ह्या उपक्रमाबद्दल मस्त वाटले. उल्हास भिडेंनी खरोखरच उत्तम आणि समर्पक गित लिहीले आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - उपक्रम