उपक्रम

तों. पा. सु. (हस्तकला स्पर्धा) (प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 26 August, 2012 - 11:01

2012_tompasu_edited.jpgvia

सध्याचा जमाना आहे डाएटचा! तर या डाएट फॅड ला आमचाही हातभार म्हणून आम्ही तुम्हाला हस्तकलेच्या माध्यमातून न-पदार्थ करायला उद्युक्त करत आहोत. म्हणजे काय की वस्तु/पदार्थ पाहून तोंडाला पाणी तर सुटलं पाहिजे पण शेवटी पोटात जाईल... फक्त तोंडाला सुटलेलं पाणी. बाकी काहीही नाही.
काही अंदाज? जौदे! आता वाचाच आणि कराच!!

सुंदर माझा बाप्पा! (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 25 August, 2012 - 15:46

balchitravani 2_0.jpg

"ए आई, मला पण बाबाला मदत करायची आहे; बाप्पाची आरास करायला!"
दोस्तांनो, गणपतीची आरास करायला आवडते ना? मग इथे तर तुम्हाला प्रत्यक्ष बाप्पालाच सजवायचंय!

चला तर मग...

१) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलामुलींकरता आहे.
२) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
३) गणपती बाप्पाच्या दिलेल्या चित्राची प्रत (प्रिंटआउट) काढायची आहे.

विषय क्र. ३ : माझ्या मनातला मराठी चित्रपट

Submitted by Kiran.. on 19 August, 2012 - 11:44

सह्याद्रीवर दूरदर्शनचे सुवर्णक्षण दाखवले गेले. कुणीतरी आवर्जून फोन केल्याने टीव्ही लावला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. पडद्यावर पथनाट्याच्या धाटणीचं एक नाटक सादर केलं जात होतं. वेटिंग फॉर गोदो या नावाचं ते नाटक... सुरूवातीला काही कळेचना. माझ्या मेंदूच्या आकलनाच्या सीमा ढवळून काढणारं काहीतरी समोर घडत होतं आणि सुन्न करणारा एक अनुभव घेऊन मी अवाक होऊन गेलो होतो. एक जबरदस्त संहिता ! कुणी लिहीलीये हे या क्षणाला माहीत नाही, कधी लिहीलिये हे ही माहीत नाही. पण टाईमलेस अशी ती कलाकृती होती.

मायबोली दिवाळी अंक २०१२ संपादक मंडळ

Submitted by रूनी पॉटर on 16 August, 2012 - 21:59

मायबोली दिवाळी अंक २०१२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
तसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्‍या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्‍या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.

विषय: 

गणेशोत्सव २०१२: पूर्वतयारी आणि सूचना

Submitted by संयोजक on 14 August, 2012 - 17:34

मायबोलीकरांनो,

यंदाच्या गणेशोत्सवाला आता फक्त एक महिना राहिला आहे. संयोजक मंडळानी जोरदार तयारी सुरु केली आहे. तुमच्याकडूनही सूचनांचे स्वागत आहे.

विषय क्र. १ - "आप्पाचा सिनेमा... १६ एम एम"

Submitted by -शाम on 12 August, 2012 - 09:01

दहावीत नापास झाल्याने घर सोडून गेलेला आपला मुलगा आज बर्‍याच दिवसांनी घरी आल्याचा मोठा आनंद आजीच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. मुलं कितीही चुकली तरी आईवडील शेवटी त्यांना माफ करणारचं ह्या जगरीतीप्रमाणे आजी क्षणात विरघळली होती.
पायात बूट, बेलबॉटम पँट, अ‍ॅपलकट शर्ट, त्याला मोठ्ठी कॉलर, डोळ्यांवर मोठ्ठा गॉगल आणि केसांचा हिप्पीकट त्या जरा जराजराश्या पडू लागलेल्या अंधारात मी आप्पाला बारकाईने निरखू लागलो. आणि माझं लक्ष त्याच्या हातातल्या पेटीकडे गेलं.
आप्पाने जाताना अशी पेटी नेली नव्हती मग येताना कुठून आणली या विचारात मी मोठ्यांचे संवाद ऐकू लागलो

"मी आता इथेच रहायचं ठरवून आलोय"

माध्यम प्रायोजक उपक्रमासाठी स्वयंसेवक हवेत

Submitted by admin on 9 August, 2012 - 01:06

गेल्या वर्षीपासून मायबोली.कॉमने मराठी चित्रपटांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत आपण ’देऊळ’, ’जन गण मन’, ’पाऊलवाट’, ’हा भारत माझा’, ’चिंटू’, ’मसाला’ या चित्रपटांची ऑनलाइन प्रसिद्धी केली. यापुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असून ’संहिता’, ’कुटुंब’ या व अशा काही दर्जेदार चित्रपटांचे माध्यम प्रायोजक म्हणून आपण काम पाहणार आहोत आणि त्यासाठी काही स्वयंसेवकाची आवश्यकता आहे.

मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by रूनी पॉटर on 30 July, 2012 - 21:55

मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - उपक्रम