उपक्रम

गणपती बाप्पांची सुंदर चित्रे - वर्षा व्हिनस

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 13:36

मायबोली परिवारातील एक चित्रकार वर्षा व्हिनस यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेली गणपतीची चित्रे!
१)
2012_SK_varshavenus_Shri Ganesh 1.jpg
२)
2012_SK_varshavenus_Shri Ganesh 2.jpg
३)
2012_SK_varshavenus_Shri Ganesh 3.jpg
४)

विषय: 

गणपती बाप्पांची सुंदर चित्रे - स्मिता१

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 13:22

मायबोली परिवारातील एक चित्रकार स्मिता१ यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेली गणपतीची चित्रे!

2012_SK_Smita1_1.jpg2012_SK_Smita1_2.jpg

विषय: 

गणेशोत्सवाच्या गप्पा-टप्पा

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 13:01

2012_saina-gp.jpgप्रसंग : सायना नेहवाल (सा ने) आणि पुल्लेला गोपीचंद (पु गो) लंडनहून परत येताहेत...

सा ने: दमले बुआ... एक तर खेळ खेळ खेळायचं, हिला हरव, तिला हरव...वर जरा मनासारखं खायला मिळेल तर तेही नाही. तिथे तुमची मेली ती शिस्त आडवी येते सारखी.
पु गो : मान्य. पण म्हणून तर टिकलीस ना.
सा ने : हे बरीक खरं ह गुर्जी. पण..पण आता मला खूप भूक लागली आहे... अब नही मै रुकुंगी, सारे बंधन तोड दुंगी, सारा जंक फूड खाउंगी... हिहाहाहा...

विषय: 

नाते : भक्तीचे आणि मातीचे - ललिता-प्रीति

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:39

गणपती आले. आता दहा दिवस सगळीकडे मंगलमय वातावरण असेल. "गणपती बाप्पा मोरया" च्या गजराने अवघा आसमंत दुमदुमून जाईल. भक्तीरसाला उधाण येईल. गणेशोत्सवाशी संबंधित काहीही लिहायचे झाले, तर त्याची सुरूवात अशीच करायची पध्दत आहे. पण multitaskingच्या जमान्यात केवळ भक्ती एके भक्ती करून भागत नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशभक्तीशिवाय इतर अनेक गोष्टी कराव्या लागतात.

सुसरबाईची मोडली खोड, हत्तीच्या नाकाची झाली सोंड! - अरुंधती कुलकर्णी

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:27

प्रत्येक आदिम संस्कृतीत सृजनाच्या, जीवसृष्टीच्या निर्मितीच्या कथा ऐकायला, वाचायला मिळतात. आफ्रिकेच्या जंगलांत नांदणार्‍या अनेक आदिवासी जमातींमध्ये अशा विविध कथा प्रचलित आहेत. या लोककथांमध्ये त्या त्या प्रांतांतील निसर्ग, प्राणी, प्रथा यांचे प्रतिबिंब दिसून येते. एका कथेनुसार सृष्टी-निर्मात्याने आफ्रिकेत आढळणार्‍या महाकाय, विशाल अशा बाओबाब वृक्षाच्या मुळांतून प्राणी, पक्षी, किड्यांना जगात आणले. त्यातील बरेचसे प्राणी तेव्हा जसे दिसायचे तसेच आताही दिसतात. पण काही प्राण्यांचे रूप व रचना काळाच्या ओघात बदलली.

मांजरांचे घर - शशांक पुरंदरे

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:19

ते घर इतर कोणत्याही घरांसारखेच - चौकोनी कुटुंब - सुलभा, सुनील, त्यांच्या दोन मुली - सानीया, स्वराली आणि मुलींची आजी.

पण त्या घराची एक खासियत अशी की तिथे मांजरांचा सततचा राबता. काही अधूनमधून भेट देणारी भटकी मांजर जमात तर कधी काही काळ वस्तीला असलेली मांजरे. पण मांजरे असणारच तिथे.

सुलभाला मांजरांची आवड का मांजरांना तिच्याविषयी ओढ हे सांगणे जरा कठीणच. सुनीलला प्राण्यांविषयी प्रेम पण मांजरासारख्या स्वार्थी प्राण्याची जरा नावडच. मुली सहाजिकच आईच्या बाजूने.

देव माझा - दिनेशदा

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:03

देव माझा...

जसं जसं वय होत जातं, तसं आमच्यावेळी हे असे नव्हते हो, असे सूर आळवायची सवय लागते, नाही का ?
आता मुंबईतल्या गणेशोत्सवाचेच बघा ना. मी असे म्हणू शकतो कि पुर्वी थर्मोकोल नव्हते, रोंबा सोंबा नाच
नव्हता, रासायनिक रंग नव्हते, नवसाला पावणारे बाप्पा नव्हते कि राजे ही नव्हते... पण नाही, एक गोष्ट
मात्र, इतक्या वर्षात बदलली नाही, ते बाप्पाचे रुप.

अगदी लहानपणापासून बाप्पाचे जे रुप मनात ठसलेय, त्याला आजही कुणी विचलीत केलेले नाही, करु
शकणारही नाही. आणि हा बाप्पा असतो तो फक्त या उत्सवातलाच. देवळात हा भेटत नाही. देवळातल्या

प्रकाशचित्रांचा झब्बू - लेकुरे उदंड जाहली!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:14

तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!

प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?

तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!

हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

प्रकाशचित्रे - मूळाक्षरे व बाराखड्यांची

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 07:31

मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?

या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल. Wink

खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.

प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 07:30

मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्‍या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!

हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - उपक्रम