उपक्रम

मराठी भाषा दिवस - स्पर्धा निकाल आणि समारोप

Submitted by संयोजक on 27 February, 2010 - 21:15

नमस्कार मंडळी,

संवाद साधणं ही सजीवांची जवळपास मूलभूत गरजच! प्राणीपक्षीसुद्धा अन्न सापडल्याची किंवा धोक्याची सूचना विशिष्ट ध्वनी करून आप्तस्वकीयांना देतात. माणसाची धाव त्यापुढची. 'भाषा' हे त्याच्यासाठी केवळ 'माहितीची देवाणघेवाण' करण्याचं माध्यम किंवा साधन नाही. ते त्याच्या जगण्यातलं एक आनंदनिधान आहे. तो भाषा 'वापरत' नाही, तो एखाद्या शिल्पासारखी भाषा 'घडवतो', तिला अलंकारांची लेणी चढवतो.. आणि हे करतांना नकळत स्वतःही अधिक सुसंस्कृत घडत जातो.

बाळकृष्ण ज्ञान केंद्र

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

बाळकृष्ण ज्ञान केंद्र

बरेच दिवसापासुन मनात होते. व्यक्तीगत पातळीवर अनेकांना माहीती, मदत, सल्ला देणे ह्या कामाला संस्थात्मक अन व्यापक रुप देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. बघु कितपत यश येतेय.....!
सध्या नेवासा तालुक्यातील १०० पेक्षा जास्त युवकांशी नियमित संपर्कात आहे. जुन २०११ पर्यंत (मी भारतात परत जाईपर्यंत) ते प्रमाण किमाण १००० वर नेणे हे प्राथमिक उद्दिष्ठ आहे.

' बाळकृष्ण ज्ञान केंद्र' (बाळकृष्ण नॉलेज सेंटर, करडकवाडी) ह्या उपक्रमाचे ऑर्कुट वरील प्रोफाईल ...

नेवासा तालुक्यातील (नेवासा तालुका हे एक प्राथमिक युनिट मानुन)

प्रकार: 

सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ६ब (बासुरी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 00:48

दुसरी प्रवेशिका वडिलांना पत्र ( बाबांस पत्र).

-बासुरी

basuri2_1.jpgbasuri2_2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

सप्रेम नमस्कार - प्रवेशिका २ (साधना)

Submitted by संयोजक on 3 February, 2010 - 05:07

माझी मुलगी ऐश्वर्या (इयत्ता ९वी) हिने मला लिहिलेले पत्र.

-साधना

hastakshar_entry_2_1.jpghastakshar_entry_2_2.jpg

विषय: 

सप्रेम नमस्कार - प्रवेशिका १

Submitted by संयोजक on 2 February, 2010 - 18:34

'सप्रेम नमस्कार' उपक्रमातील पत्रांचे प्रदर्शन आजपासून सुरु करत आहोत. यामध्ये रोज तुम्हाला अनेक प्रकारची, सुंदर पत्रे वाचायला मिळतील. यातले ही पहिली प्रवेशिका.

विनंतीनुसार आयडी आणि नाव देण्यात आलेले नाही.

**************************
मी माझ्या भाचीला ती ६ महिन्यांची झाल्यावर एक पत्र पाठवले होते. दूरदेशी राहत असलेल्या मावशीला भाचीने, अर्थातच तिच्या आईने लिहीलेले उत्तर सोबत जोड़ले आहे.

hastakshar_entry_1_1.JPG

विषय: 

गुणसूत्रांची भेसळ थांबवा!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 2 February, 2010 - 00:06

नमस्कार!

ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल विचारविनिमय करत आहेत.

येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे.
ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?

"मराठी भाषा दिवस" स्पर्धा

Submitted by संयोजक on 27 January, 2010 - 00:49

२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. यावर्षी त्यानिमित्ताने काही उपक्रम चालू करण्याचा मायबोली प्रशासनाचा विचार चालू होता. यासंदर्भात संयोजनासाठी 'संयुक्ता'ला विचारण्यात आल्यावर त्या सूचनेला भरभरून प्रतिसाद मिळाला.

त्या विचारमंथनातून खालील ३ उपक्रम्/स्पर्धा निवडल्या गेल्या आहेत. मायबोलीच्या इतर उपक्रमांप्रमाणेच या नवीन उपक्रमालादेखील सर्व मायबोलीकर भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री आहे.

१. बोलगाणी - बालगीत/बडबडगीत स्पर्धा


२. इवलेसे रोप - लहान मुलांसाठी निबंध स्पर्धा

विषय: 

सप्रेम नमस्कार

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:47

patr342.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०

बोलगाणी

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:45
bolgani.jpg

इवलेसे रोप

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:39

आपली छोटी मायबोलीकर "जुई" हिने वरील मजकुर लिहिण्यास मदत केली आहे.

ही स्पर्धा खालील वयोगटात घेण्यात येणार आहे:
गट क्रमांक १: प्रिस्कुल ते इयत्ता पाचवी
गट क्रमांक २: इयत्ता सहावी ते नववी
गट क्रमांक ३: इयत्ता दहावी ते बारावी

Pages

Subscribe to RSS - उपक्रम