उपक्रम

'महफिल-ए-गझल' - पंकज उधास

Submitted by माध्यम_प्रायोजक on 23 October, 2012 - 03:55

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक म्हणून मान्यता पावलेले पद्मश्री श्री. पंकज उधास यांच्या मैफलीचा लाभ पुणेकरांना बर्‍याच वर्षांनी मिळणार आहे. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राजाराम पुलाजवळील 'महालक्ष्मी लॉन्स' (कर्वेनगर) येथे ही 'महफिल-ए-गझल' संपन्न होईल.

pankaj.jpg

हितगुज दिवाळी अंक २०१२ - परिसंवाद

Submitted by संपादक on 14 October, 2012 - 18:05

तंत्र हा आजच्या जगाचा मंत्र तर आहेच, परंतु तो आपला मित्र देखील आहे का, हे आजमावून पाहण्यासाठी हितगुज २०१२ दिवाळी अंकात आपण समाविष्ट केलाय 'तं तं तंत्रज्ञानाचा..' हा परिसंवाद!
आपण सगळेच या ना त्या मार्गाने तंत्रज्ञानाचा वापर करत असतो, तेव्हा याच तंत्रज्ञानाविषयी विचार करायला, आमच्या काही प्रश्नांवर मत द्यायला आवडेल ना तुम्हांला?

विषय: 

'उद्द्यापन' - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 9 October, 2012 - 20:52

संयोजनासाठी नाव द्यावं की नाही अशा चलबिचल अवस्थेतून झालेली सुरुवात आज "अरे! संपलं सुद्धा, आता परत इ-भेट कधी?" अशा हुरहुर लावणार्‍या अवस्थेत संपली. संयोजनासाठी नाव देताना, हां ठिके! नाव देऊ - झाली निवड तर नेमून दिलेले काम करून कार्य पार पाडू, हा का ना का! एवढं सोपं वाटलं होतं. सुरुवात झाली तीच मुळी फेल गेलेली व्हिडिओ कॉन्फरन्स - मुख्य संयोजकांनी दुसर्‍या मिटींग नंतर घेतलेली सपशेल माघार - दोन तीन संयोजकांचा नो शो - नव्या संयोजकांची शोधाशोध - त्यांच्याबरोबर पुन्हा करावी लागलेली अथश्री - अशी, बेरीज थोडी आणि वजाबाकी जास्त...

गणेशोत्सव २०१२ : स्पर्धांचा निकाल!

Submitted by संयोजक on 6 October, 2012 - 03:27

नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धांमध्ये आपण बहुसंख्येनी सहभागी झालात, तसेच भरभरून दादही दिलीत, त्याबद्दल संयोजक मंडळातर्फे आपणासर्वांचे मन:पूर्वक आभार.

यावर्षी आम्ही ४ स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
१. तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
२. गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा
३. मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग व तिखट विभाग
४. चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा

'श्रेयनामावली' - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 5 October, 2012 - 10:27

नमस्कार मंडळी,

गेले काही दिवस वाजत गाजत असलेल्या २०१२ मायबोली गणेशोत्सवाची आता सांगता झाली. आपण सगळ्यांनी बाप्पांना " गणपती बाप्पा मोरया | पुढच्या वर्षी लवकर या ||" असं सांगून ती सुफळ संपूर्ण करविली.

अगदी श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेपासूनच मायबोलीकरांच्या मदतीचा ओघ सुरु झाला. उच्चासनारूढ अशा गणेशमूर्तीचे प्रकाशचित्र जिप्सी यांनी अगदी विनाविलंब दिले. (मंडप, आजूबाजूची आरास वगैरे कलाकुसर संयोजकांची बर्का!) चैतन्य दिक्षीत यांनी बासरीवादनाचे पार्श्वसंगीत देऊन प्रतिष्ठापनेच्या मंडपाचे पावित्र्य द्विगुणित केले. हार्दिक आभार जिप्सी आणि चैतन्य!

'संहिता', 'पुणे ५२' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात

Submitted by माध्यम_प्रायोजक on 4 October, 2012 - 02:37

मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हींग इमेजतर्फे आयोजित केलेल्या १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तीन चित्रपटांची निवड झाली आहे. हे तिन्ही चित्रपट 'इंडिया गोल्ड' या स्पर्धाविभागात दाखवले जातील.

संयुक्ता मुलाखत : मेंदी आणि बॉडी पेंटिंग आर्टिस्ट दीपाली देशपांडे

Submitted by अगो on 3 October, 2012 - 05:31

संयुक्तातर्फे दर महिन्याला एका यशस्वी, कर्तबगार स्त्रीची ओळख आपण करून घेत असतो. काही महिन्यांपूर्वी मनात आलं की मायबोलीवरही आपल्या व्यवसायात उत्तम प्रकारे जम बसवलेल्या अनेकजणी असतील, त्यांची मुलाखत वाचायला सर्वांनाच आवडेल. लगेच एक नाव डोळ्यांसमोर आलं ते दीपाली देशपांडे उर्फ मायबोलीवरची आपली ’दीपांजली’ हिचं. आपला छंद, कला व्यवसायात बदलण्याचं भाग्य खूप कमी जणांना लाभतं. दीपाली त्या भाग्यवंतापैकी एक! मायबोलीवर वेळोवेळी होणार्‍या गप्पांमधून दीपाली ’मेंदी आणि बॉडी पेंटिंग आर्टिस्ट’ आहे हे बर्‍याचजणांना माहीत असेल.

विषय: 

मतदान आणि परीक्षण : प्रवेशिकांची एकत्रित यादी - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 30 September, 2012 - 19:38

मंडळी,
गणेशोत्सवातील स्पर्धांत आणि कार्यक्रमात मनापासून भाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा व उपक्रम संपले आहेत पण अजून सगळ्यात महत्वाचं काम तुम्हांला करायचं आहे ते म्हणजे मतदान! भरघोस मतदान करून योग्य विजेते घोषित करण्यास आम्हाला मदत करणार ना?

मतदानाचा कालावधी : भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी ६:०० (तारीख १ ऑक्टोबर २०११) ते सोमवारी सकाळी ६:०० (तारीख ८ ऑक्टोबर २०१२)

तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा

विषय: 

कल्पकता संयोजकांची-२ (दैनंदिन कार्यक्रम,स्पर्धा,उपक्रम)- मायबोली गणेशोत्सव२०१२

Submitted by संयोजक on 30 September, 2012 - 16:20

गणेशोत्सव २०१२ मधील दैनंदिन कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रमांच्या कल्पक जाहीराती इथे एकत्रीत स्वरूपात देत आहोत.
श्री गणेश प्रतिष्ठापना:-
aaraas.jpg
प्रकाशचित्रः- जिप्सी संकल्पना आणि मांडणी:_मधुरा_

स्पर्धा आणि उपक्रम :

2012_tompasu_edited.jpgvia

बालचित्रवाणी - रुद्राक्ष - MallinathK

Submitted by संयोजक on 30 September, 2012 - 13:57