उपक्रम

माध्यम प्रायोजक उपक्रमासाठी स्वयंसेवक हवेत

Submitted by admin on 1 March, 2013 - 14:00

जुलै २०१३मध्ये प्रोव्हिडन्स येथे भरणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी माध्यम प्रायोजक म्हणून आपली निवड झाली आहे. तसेच येत्या काही महिन्यांत ४/५ दर्जेदार मराठी चित्रपटांचे माध्यम प्रायोजक आपण असणार आहोत. त्यासाठी काही स्वयंसेवकाची आवश्यकता आहे.

अधिवेशनाला येणार्‍या मान्यवरांच्या तसेच चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ व कलाकारांच्या (प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवरून) मुलाखती घेणे, मुलाखतींचं शब्दांकन करणे, स्पर्धा / खेळ आयोजित करणे, घोषणा लिहिणे अशी कामं माध्यम प्रायोजक करतात. माध्यम प्रायोजक ग्रुपात सहभागी होण्यासाठी तुम्ही भारतातच असला पाहिजेत, अशी अट नाही.

विषय: 

नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

विषय: 
शब्दखुणा: 

गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

सा.न.वि.वि: प्राजक्ता३०

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 09:52

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी : प्राजक्ता३०
पाल्याचे नाव : श्रीया
वय : ५.५ वर्षे

DSC_0313.JPG

विषय: 

बोल बच्चन बोलः रुणूझुणू

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 01:10

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - रुणुझुणू
पाल्याचे नाव - सृजन
पाल्याचे वय - ६ वर्षे ४ महिने

आभारः संदीप खरे आणि फाऊंटन म्यूझिक कंपनीचे कांतिलाल ओसवाल.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - उपक्रम