मायबोली माध्यम प्रायोजक

लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्याच्या मदतीसाठी 'मराठी बाणा'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 April, 2014 - 14:24

श्री बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ प्रकाश आमटे संचालित हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प दवाखान्याच्या पुनर्निर्माणासाठी लोकबिरादरी मित्रमंडळ, पुणे यांच्यातर्फे आयोजित, श्री. अशोक हांडे प्रस्तुत 'मराठी बाणा'.

शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०१४
वेळ - सायं. ७ ते १०
स्थळ - गणेश कला क्रीडा, पुणे

***

'पितृऋण' - दर्जेदार अभिनय , उत्तम कलाकृती

Submitted by सामी on 7 December, 2013 - 05:38

मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या 'पितृऋण' या चित्रपटाच्या निमित्तानं जाहीर झालेल्या स्पर्धेत भाग घेतला आणि ध्यानिमनी नसताना, चक्क चित्रपटाच्या शुभारंभाच्या खेळाची दोन तिकिटं मिळाली. या बद्दल सर्वात पहिल्यांदा मायबोली चे मनापासून आभार.

'पितृऋण'च्या निमित्ताने श्री. नितीश भारद्वाज यांच्याशी गप्पा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 December, 2013 - 01:11

पशुवैद्यकशास्त्रामध्ये शल्यविशारद असणारे नितीश भारद्वाज यांना दिग्दर्शनाची आणि अभिनयाची विशेष आवड होती. त्यातूनच त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं. अभिनेता म्हणून त्यांची ओळख अधिक असली तरी त्यांनी भारतामध्ये आणि परदेशातही अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि अनुबोधपट दिग्दर्शित केले असून, परदेशात, विशेषत: ब्रिटनमध्ये, रेडिओसाठी दिग्दर्शनही केलं आहे.

विषय: 

'पितृऋण' - प्रश्नमंजुषा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 26 November, 2013 - 23:56

पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक असणार्‍या व्यंकटेश कुलकर्ण्यांना एक दिवस अचानक दिसते हुबेहूब त्यांच्यासारखीच दिसणारी एक व्यक्ती. कुलकर्णी अचंबित होतात आणि शोध घेत एका वेगळ्याच रहस्याच्या मुळाशी जाऊन पोहोचतात. मग सुरू होतो भावनांचा कल्लोळ!

त्या व्यक्तीचा व्यंकटेश कुलकर्ण्यांशी काय संबंध?
तुटलेल्या मानवी नात्यांना पुन्हा एकत्र बांधून, वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची एका मुलाची धडपड म्हणजे ’पितृऋण’!

PITRUROON - POSTER.jpg
विषय: 

'संहिता'च्या खेळांचं वेळापत्रक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 October, 2013 - 06:13

’संहिता’ हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाच्या खेळांचे तपशील -

१. गिरगाव - सेंट्रल प्लाझा - दुपारी. ३.३०

२. जोगेश्वरी - २४ कॅरट - संध्या. ७.४५

३. लोअर परेल - पीव्हीआर फिनिक्स - दुपारी १२

४. घाटकोपर - आयनॉक्स (फेम) - संध्या. ५

५. घाटकोपर - आर सिटी बिग सिनेमा - संध्या. ५.४५

६. गोरेगाव - पीव्हीआर ओबेरॉय - संध्या. ५.५०

७. दहीसर - आयनॉक्स (फेम) - दुपारी १२.४५

८. चेंबूर - फन - संध्या. ५.४०

९. मुलुंड - बिग सिनेमा - संध्या. ५.३०

१०. भांडुप - सिनेपोलिस - दुपारी. २.४०

११. ठाणे - सिनेमॅक्स इटर्निटी - संध्या. ५.३०

'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळाची मुंबईतील तिकिटे उपलब्ध

Submitted by साजिरा on 15 October, 2013 - 08:13

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळाची मुंबईतील तिकिटे मायबोलीकरांसाठी उपलब्ध आहेत. या शुभारंभाच्या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी chinmay@maayboli.com या पत्त्यावर इमेल पाठवावी.
इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा. एका मायबोलीकराला एकच तिकीट दिलं जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. चिन्मयचा फोन नंबर- ०९९७०८४२४०५

'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळासाठी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

खेळाचे तपशील पुढीलप्रमाणे-

विषय: 

नाटक आणि मी - उत्तरा बावकर

Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 October, 2013 - 01:17

एक चतुरस्र व सशक्त अभिनेत्री अशी श्रीमती उत्तरा बावकर यांची ओळख आहे. 'दोघी', 'उत्तरायण', 'बाधा', 'नितळ', 'वास्तुपुरुष', 'हा भारत माझा', 'एक दिन अचानक' अशा असंख्य हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. मात्र उत्तराताईंच्या अभिनय-कारकिर्दीला सुरुवात झाली ती दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य-महाविद्यालयापासून.

उत्तराताईंची महत्त्वाची भूमिका असलेला 'संहिता' हा चित्रपट येत्या १८ तारखेला प्रदर्शित होतो आहे.

या निमित्तानं उत्तराताईंनी त्यांच्या कलाकिर्दीविषयी लिहिलेला खास लेख.

सौभाग्यवती मालविकादेवी सत्यशील जहागिरदार - सुमित्रा भावे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 27 September, 2013 - 02:16

एक चित्रपट दिग्दर्शिका.
एक निर्मात्री.
एक लेखिका आणि एक अभिनेत्री.

या दिग्दर्शिकेला एक संहिता लिहायची आहे.
पण या संहितेचा शेवट कसा असावा?

आपली संहिता आपल्याला लिहिता येते का?

या चौघींना आपल्या संहितेचा सुखांत करता येईल का?

सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स व अशोक मूव्हीज प्रा. लि. यांच्या सहकार्यानं सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या विचित्र निर्मिती या संस्थेनं 'संहिता'ची निर्मिती केली आहे.

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला असून दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं या चित्रपटानं पटकावली आहेत.

'इन्व्हेस्टमेंट' चित्रपटाच्या खेळांचं वेळापत्रक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 19 September, 2013 - 12:28

ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शन केलेला, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेला 'इन्व्हेस्टमेंट' दि. २० सप्टेंबरपासून महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं वेळापत्रक -

listinvestment.jpg

'इन्व्हेस्टमेंट'च्या निमित्ताने सुप्रिया विनोद यांच्याशी संवाद

Submitted by योकु on 30 August, 2013 - 11:11

या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला 'इन्व्हेस्टमेंट' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय. ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आहे.

पैसा, प्रगती, महत्त्वाकांक्षा यांच्या गर्तेत सापडलेल्या कुटुंबाची कहाणी या चित्रपटात आहे. सुप्रिया विनोद यांची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली माध्यम प्रायोजक