संशोधन/अभ्यास

Research/Studies

संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर - भाग १ - प्रोब मायक्रोस्कोपी

Submitted by राजकाशाना on 18 November, 2011 - 03:35

आपल्या रोजच्या आयुष्यात डोळ्यांना फार महत्त्व आहे. जे आपण प्रत्यक्ष पाहिले ते खरे अशी आपली पक्की समजूत असते. अगदी कोर्टातही गुन्हा प्रत्यक्ष बघणार्‍याची साक्ष अधिक महत्त्वाची असते. खरी गोष्ट अशी आहे की आपल्या डोळ्यांना जे दिसते ते आपले जग हिमनगाचे एक छोटेसे टोक आहे. आपले डोळे प्रकाशाच्या विशिष्ट तरंगलांबींनाच प्रतिसाद देतात. असे का असावे? तर आपली ज्ञानेंद्रिये यांना प्रतिसाद देत नाहीत हे उत्क्रांतीमधून आपल्याला मिळालेले एक प्रकारचे संरक्षण आहे. कल्पना करा. या क्षणाला तुमच्या भोवती काय काय आहे?

शब्दखुणा: 

संशोधनक्षेत्रातील मायबोलीकरांची यादी

Submitted by वरदा on 11 November, 2011 - 02:19

आत्तापर्यंत जेवढ्यांचे उल्लेख झालेत त्या त्या माबोकरांची नावं आणि कार्यक्षेत्र याची यादी करतेय. बाकीच्यांनी भर घालावी. जसजसे लेख लिहिले जातील तसे त्यांचे दुवे इथे टाकत राहीनच!
सगळ्या माबोकरांना यादीत भर टाकण्यासाठी आणि संशोधनाविषयी लेख लिहिण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचं बोलावणं करतेय, अ‍ॅडमिनच्या वतीने Happy

ज्यांची डॉक्टरेट अजून पूर्ण व्हायची आहे त्यांना इथे फार विस्ताराने/ निष्कर्षांसकट लिहिता येणार नाही याची जाणीव आहे. तरीपण निदान काय काम चालू आहे याचा गोषवारा देऊ शकलात तर फार छान होईल!

शब्दखुणा: 

संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर - भाग १- Experimental Condensed Matter Physics

Submitted by चारुलता on 7 November, 2011 - 07:33

खरतर हा धागा सुरू करायला आजच्या इतका चांगला दिवस कोणता असु शकेल ! Happy
आज पदार्थ विज्ञान आणि रसायन शास्त्र या विषयात अभुतपुर्व कामगिरी करण्यार्‍या डॉ. मेरी क्युरी चा जन्मदिन. तिच्या प्रयोगांनी या दोन्ही विषयातील तत्कालीन संशोधनाला एक नवी दिशा दिली. तिचे नाव हे अनेक अर्थानी मैलाचा दगड आहे. तिचा हा प्रवास सोपा सहज नक्कीच नाही. अनेक अडचणी, अयशस्वी प्रयोग आणि त्यामुळे येणारे नैराश्य या सर्वांवर मात करुन नोबेल मिळवणारी ती पहिले स्त्री सशोधक म्हणुन खूप काही शिकवते. हॅट्स ऑफ टु मेरी !

Pages

Subscribe to RSS - संशोधन/अभ्यास