निष्प्राण लटकती पितरे

निष्प्राण लटकती पितरे...

Submitted by kunitari on 5 August, 2011 - 22:16

दुष्काळा मुळे आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाची व्यथा..

निष्प्राण लटकती पितरे, पाउस गोठला होता |
सर्पणात विरती गहिवर, डोळ्यात दाटला होता ||१||

माय माती विव्हळते, भेगात आक्रंद होता |
ग्रीष्मात हरवली प्रतिमा, तो चंद्र शोधीत होता ||२||

दग्ध कोरडी नक्षत्रे, हा भोग राहिला होता ||
रथसप्तमी उराशी, तो स्तन्य जाळीत होता ||३||

सूर्यात पोळली पाने, हा कोंब पोरका होता |
तापत्र वेढल्या स्मशानी, तो सांब निपचित होता ||४||

गुलमोहर: 
Subscribe to RSS - निष्प्राण लटकती पितरे