परी

परीकथा भाग ४ - (फेसबूक स्टेटस १.६ ते १.७ वर्षे)

Submitted by तुमचा अभिषेक on 26 October, 2015 - 14:07

.

३० सप्टेंबर २०१५

पापा !
ते सुद्धा पा पा पा पा नाही तर सुस्पष्ट आणि खणखणीत पापा ..
ते सुद्धा मम्मा बोलायच्याही आधी आधी..
फिलिंग शब्द, इमॉटिकॉन्स आणि स्मायलींच्या पलीकडले Happy

.
.

२ ऑक्टोबर २०१५

वीज चमकते तेव्हा आधी प्रकाश दिसतो, मग थोड्यावेळाने आवाज ऐकू येतो.
हेच सायन्स वापरून आम्ही ब्रश केल्यावर चूळ भरतो.
आधी शांतपणे ग्लासातले पाणी पिऊन घेतो, मग फुर्रर करून आवाज काढतो. वीज काही आपल्या डोक्यावर कोसळत नाही, आणि आमच्या तोंडातले पाणी काही बेसिनमध्ये पडत नाही Happy

.
.

५ ऑक्टोबर २०१५

मोठी माणसं विनोद करतात, लहान मुलं विनोद घडवतात.

विषय: 
शब्दखुणा: 

परीकथा ३ - दिड वर्ष (facebook status)

Submitted by तुमचा अभिषेक on 29 September, 2015 - 06:26

परीजन्माची कहाणी
परीकथेचे सव्वा वर्ष
परीकथा २ - सव्वा ते दिड वर्ष

.

३१ ऑगस्ट २०१५

सध्या आमच्याकडे रोज डंबशेराजचा खेळ चालतो.
जीभ बाहेर काढून ती बोटाने त्यावर टिकटिक करते, तेव्हा तिला जेली नाहीतर चॉकलेट खायचे असते.
हाताने हवेत गोल गोल रेघोट्या मारते, तेव्हा पाटीवर खडू गिरवायचा असतो.
जेव्हा तोच हात वायपरसारखा फिरवते, तेव्हा ते गिरवलेले साफ करायला डस्टर हवा असतो.

विषय: 
शब्दखुणा: 

परीकथा २ - (सव्वा ते दीड वर्ष) (facebook status)

Submitted by तुमचा अभिषेक on 26 August, 2015 - 14:15

..

परीकथेचे सव्वा वर्ष ..
..

२० जुलै २०१५

लहान मुले खरंच किती निरागस असतात..
जिथे गल्ली क्रिकेटमध्ये सारे जण बॅटींगसाठी मरत असतात,
फिल्डींग करतानाही आपली बॅटींग कधी येणार याचीच वाट बघत असतात,
अगदी टॉसही जिथे कोणाची बॅटींग पहिली असणार, हे ठरवण्यासाठीच उडवला जातो,
तिथे आमची परी बॅट पप्पांच्या हातात देते आणि स्वत: बॉलिंग टाकायला धावते.
खरंच., लहान मुले किती निरागस असतात Happy

.
.

२२ जुलै २०१५

विषय: 
शब्दखुणा: 

परी

Submitted by निलेश बामणे on 10 July, 2012 - 04:39

परी

तिच सुंदर दिसण हे एकच कारण

मी तिच्या प्रेमात पडायला....

माझ कुरूप दिसण हे एकच कारण

तिन मला रोज टाळायला...

सौंदर्य सोडल तर तिच्याकडे काहीच नव्ह्त

मी तिच्या प्रेमात पडायला...

पण! माझ्याकडे सारच जास्तच

होत ती मला टाळायला....

ती सुंदर पण ! चारचौघींसारखीच

एक होती म्हणायला...

मी कुरूप जरी असलो तरी आवडायचो

सर्वांना आपला म्हणायला...

मी वेडापिसा व्हायचो फक्त

एकदा तिला पहायला...

ती मात्र रोज नवीन बहाणे

शोधायची मला टाळायला...

शेवठी हिंमत नाही उरली

तिच्या मागे धावायला...

तेंव्हा ती लागली रोज मला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - परी