कुण्या वाटेनं बा गेली ती नार?

कुण्या वाटेनं बा गेली ती नार?

Submitted by आशूडी on 17 June, 2011 - 04:03

परवा एका पुस्तकात "मराठी लेखिकांच्या साहित्याला भाज्या आमट्यांचे वास असतात" असं एका 'टिपीकल लेखकाचं' 'टिपीकल लेखिकांबद्दल' मांडलेलं मत आणि त्यावर त्या पुस्तकाच्या लेखिकेने केलेला ऊहापोह वाचला. आणि नकळत माझ्याही डोक्यात चक्रं फिरायला लागली की, खरंच असं आहे? तो लेख जरी लेखिकांवर नेम धरुन होता तरीही, एकूणच साहित्यात दिसणारी स्त्री कशी आहे? मग ती लेखकाने रेखाटलेली असो वा लेखिकेने. मी आजवर वाचलेल्या साहित्यातलं स्त्रीचं रुप कसं आहे? पुस्तकांची पानं फडफड करत पार शाळेच्या दिवसात पोचले आणि तेव्हा वाचलेल्या स्त्रीप्रधान कथा कादंबर्‍या डोळ्यांपुढे फेर धरु लागल्या.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कुण्या वाटेनं बा गेली ती नार?