प्रत्येक पोरासाठी त्याच्या बापाकडून .....

बाप

Submitted by मंदार-जोशी on 9 January, 2012 - 09:46

डावी उजवीकडे बघत
एखादी चुकार गाडी,
सावलीलाही स्पर्श करणार नाही
एखादा मुजोर ट्रकवाला,
शिंतोडे उडवणार नाही
अशा बेताने...
...खांद्यावर डोकं ठेऊन
शांत झोपी गेलेल्या आपल्या पोराला जपत
त्याच्या स्वप्नांची स्पंदनं ऐकत
त्याचा श्वास
मनात, खोल आत भरून घेत
भर पावसात, छत्री सावरत
रस्ता पार करणारा तो दिसतो रोज

तो रस्ता मोठा करणार आहेत म्हणे यंदा
पाऊस तर असाच असतो दर वर्षी
खड्डेही वाढतील कदाचित

पण तो मात्र
जसा आज दिसला होता...व्रतस्थ...
पोराला घेऊन तोच रस्ता पार करताना
अगदी तस्साच दिसेल
....उद्याही!

गुलमोहर: 

बाप ...

Submitted by किरण कुमार on 13 June, 2011 - 03:54

आयुष्यात दू:खाने जरी डोळ्यात पूर आला
तू हासताच गाली सारा थकवा दूर झाला

तू जन्मलास अन मी जगलो असा नव्याने
संगीत ऐकले जे सांग कोठूनी सूर आला

उचलूनी हात बाळा दिधला जरी धपाटा
काहूर मनात माझ्या भरुनी उर आला

इवलेस हात मोजती आभाळाच्या कक्षा
लटक्या तूझ्या रागाने चंद्रास खूर आला

तूझी उन्हात पावले ती बघता या मेघांनी
धरणीला भिजवाया पाउस आतूर झाला

तूझी ओढ इतूकी आता कामास दूर सारी
तूज भेटण्या रोजचे हा बाप फितूर झाला

- किरणकुमार

Subscribe to RSS - प्रत्येक पोरासाठी त्याच्या बापाकडून .....