BMM2011

म म मराठीचा-

Submitted by megrev94 on 19 May, 2011 - 16:46

म म मराठीचा-
माझ्या हळव्या मनाला लागे प्रकाश चाहूल, माझी मायबोली घाले मला हळुवार हाळ;
कण प्रकाशाचे देती क्षण आनंदाचे हाती, क्षेम स्मरता दुज्यांचे नवी सुखे जन्म घेती;
सुखातून प्रसवे सुख आनंदी आनंद ,नाही तिमिराला जाग मन प्रसन्न प्रसन्न;
दूर देशी जरी आलो ओढ संपली ना कधी,अशी सारस्वताची हि माय माउली मराठी;
दिस अपूर्वाईचे हे सोहोळ्याच्या तयारीचे माझ्या लाडक्या भाषेच्या संपन्न उत्सवाचे!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"व्हॉट आर यु गाइज अप टू इन शिकागो?"

Submitted by megrev94 on 19 May, 2011 - 16:41

"व्हॉट आर यु गाइज अप टू इन शिकागो?"

असा सवाल व्हीसा ऑफिसरने मला केला आणि काय उत्तर देऊ असा प्रश्न पडला, कारण माझं शिकागोचं ज्ञान "भूगोलाच्या पुस्तकातला कत्तलखाना, आणि सीअर्स टॉवर् " ह्याच्या पलीकडे नव्हतं. माझा गोंधळलेला चेहेरा पाहून त्याने हसून एक सल्ला दिला," मुली, निव्व्वळ दिलखुलासपणे शिकागो फिर, शिकागो कधीच कुणाला निराश करत नाही." हे वाक्य माझ्या मनात इतकं खोलवर कोरलं गेलं कि, "ओहेर विमानतळावर" पोचल्याक्षणीच माझ्या मनाने पसंतीचा कौल दिला. तिथून सुरु झालेला हा "शिकागोनुभव" आपणा सर्वांनाही मिळावा, ह्यासाठी हा लेख प्रपंच.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - BMM2011