लग्न प्रमाणपत्र
मी ४वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला आहे मला लग्न प्रमाणपत्र काढायचे आहे परंतु माझ्याकडे लग्नाचा फोटो v इतर कोणताही पुरावा नाही तरी मी लग्न प्रमाणपत्र कसे काढू कृपया योग्य मार्गदर्शन करा
मी ४वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला आहे मला लग्न प्रमाणपत्र काढायचे आहे परंतु माझ्याकडे लग्नाचा फोटो v इतर कोणताही पुरावा नाही तरी मी लग्न प्रमाणपत्र कसे काढू कृपया योग्य मार्गदर्शन करा
नमस्कार,
पुण्यात सिंहगडरोड परिसरातल्या अपार्टमेंट विक्री संदर्भात रिअल ईस्टेट लॉ संबंधित लॉयरची माहिती हवी आहे.
कोणाच्या ओळखीत, अनुभवात असे वकील असतील तर कृपया माहिती मिळेल का.
वकीलाबद्दल अनुभव असल्यास फारच मदतीचे होईल.
धन्यवाद
उदविग्न मनाचा उद्रेक...
होईल आता उदविग्न मनाच्या संतापाचा उद्रेक...
घडले नाही कधी असा घडवेल एल्गार अनेक...
मिटलेल्या मुठीमध्ये, तुटलेली स्वप्ने घेऊन अनेक...
न्याय निवाडा उरला नाही, शोधी संघर्षाची मार्गे अनेक...
अनेक मिटले, मिटतील अनेक मृगजळ समान न्यायातून...
उरलेले मरतील भूक, द्वद्व, अन कोल्हेकुई समाज विवंचनेतून...
त्याच अंधारातून पुन्हा प्रकाश निघेल एक...
न्यायामागच्या अन्यायाला फाडतील किरणे अनेक...
मागून मिळत नसेल तर तो मिळवावाच लागतो...
संघर्षासाठी एक वेळ शस्त्र हातात घ्यावाच लागतो...
मोदीनी पास केलेले तीन कृषी कायदे
१) Farmers Produce Trade and Commerce (Production and Facilitation) Act, 2020
२) Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services Act, 2020
३) Essential Commodities (Amendment) Act, 2020
वरील तीन कायद्यांच लांबलचक नाव लहान करुन मी खालील प्रमाणे आपल्या शब्दात मांडतो.
१) शेतमालास मुक्त बाजारपेठ नि मुक्त व्यापार कायदा
२) करार पध्दतीची शेती कायदा
३) साठवणुकीचा कायदा (जिवनावश्यक व महत्वाच्या वस्तू)
नवरा बायकोच्या डिस्पुटमध्ये जर कोर्टात गेलात तर अगदी सुरुवातीपासून जर कोणता विषय महत्वाचा बणून बसत असेल तर तो म्हणजे मेन्टेनन्सचा. यात पण दोन प्रकार असतात. एक असतं अंतरीम मेन्टेनन्स अन दुसरं असतं फायनल मेन्टेनन्स. फायनल मेन्टेनन्सच ते फायनल निकाल लागल्यावर कळेलच पण अंतरीम मेन्टेनन्स मात्र सुरुवातीलाच लागु होतं. कारण केस दाखल झाली म्हणजे बायकोला नव-याचं घर सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं. सहसा बायका माहेरी जावून राहतात. परंतु आजकाल त्या घर भाड्याने घेऊन राहू लागल्या. जोडीला मूल बाळ असल्यास त्या मुलाचं शिक्षण, शाळेची फीज व इतर खर्च आलच. मग हे सगळं भागवायचं कसं? केस तर वर्षोन वर्षे चालते.
एन.ए. (Non Agricultural)
https://www.loksatta.com/maharashtra-news/st-conductor-manoj-chodhari-su...
माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार; बस कंडक्टरने घेतला गळफास
We often tend to think of judgements as the text, whereas judgements can more accurately be conceived of as performance, as the culmination of a process.
- चिंतन चंद्रचूड
रुथ बेडर गिन्सबर्गना 'नक्की कधी पुरेशा (स्त्रिया सुप्रिम कोर्टावर) होतील' विचारल्यावर 'व्हेन देअर आर नाईन' हे त्यांचं सुप्रसिद्ध उत्तर होतं. याने लोकांना बसलेला धक्का बघुन 'नऊ पुरुष असताना कधीच हा प्रश्न कोणाला न पडल्याची' खंतही त्या बोलुन दाखवत. वयाच्या ८७ वर्षी RBG चे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले. क्लिंटन प्रशासनाच्या काळात १९९३ मध्ये त्यांची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावर नेमेणूक झालेली. त्यांना श्रद्धांजली!
त्यांच्या कार्यकाळातील हे काही महत्त्वाचे टप्पे आणि कायद्याचे विश्लेशण करुन दिलेली मते (ओपिनिअन्स).
हल्ली बहुतेक मुली लग्नानंतर नाव बदलत नाहीत. लग्नाआधी मधले नाव आडनाव वेगळे अन लग्नानंतर वेगळे असते. अश्यावेळी बाळाच्या जन्मदाखल्यात वडिलांचे नाव आडनाव कसे लावतात? हॉस्पिटलमध्ये जर सगळी कागदपत्रे लग्नाआधीच्या नावावर असली तरीही बाळाला वडिलांचे नाव अन आडनाव लावण्यासाठी काय करावे लागते. कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
कृपया माहीत असल्यास सांगा.
तसेच, ऑनलाईन जन्मदाखला कसा मिळवायचा माहीत असेल तर तेही सांगा प्लिज.