तर होडी

कोकण : तर [ Ferry service ]

Submitted by भाऊ नमसकर on 22 April, 2011 - 22:55

आता कोकणात सर्वत्र पूल व्हायला लागलेत; ऐलतीर व पैलतीर याची गंमत तडीपार होतेय. तरीची होडी आता मासेमारी करूं लागलीय. माडांच्या बागेतून मुरडत, बागडत तरीकडे धावणारी पायवाट पूलाकडे जाणार्‍या डांबरी रस्त्याला बुजून अंगावर गवत पांघरून दडत्येय. आठवडा बाजाराच्या दिवशी डोक्यावर टोपल्या घेऊन तरीची आधीची फेरी पकडायला तुरुतुरु धावणार्‍या बाजारकरणी आता टायमातली येस्टी पकडायला स्टॉपवर ठाण मारतायत. एक वेळ गावच्या इथ्यंभूत माहितीचा संदर्भग्रंथ असणारी व पिढ्यानपिढ्या दिवसरात्र तत्परतेने सेवा देणारी नदीकांठची तरवाली कुटूंबं आपली ओळखच गमावून बसलीयत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - तर होडी