लोकशाही

मोरपीस.....

Submitted by भुंगा on 14 September, 2012 - 00:11

जे दिसतेय ते महाभयंकर आहे.......

मुठभर राजकारणी, धनदांडगे उद्योगपती, महागाई, भ्रष्टाचार, नाकर्ती जनता सगळेच मिळून एकट्या पडलेल्या असहाय, अबला लोकशाहीचे धिंडवडे काढतायत...... एका अंधार्‍या खोलीत तिला एकटीला डांबून अक्षरशः तिचे लचके तोडण्याचं काम या झुंडीतल्या गुंडांनी चालवलय........ सगळ्यांचे चेहरे निर्विकार आहेत, विकट हास्य करत एक एक जण तिचं एक एक वस्त्र फेडत तिला ओरबाडतोय, विवस्त्र करतोय आणि लोकशाहीचा आक्रोश त्या चार भिंतींच्या बाहेर मात्र जात नाहिये...!!!

पण इथे एखाद्या घटनेचा ईव्हेंट केला गेला नाही तरच नवल...

एका लोकशाहीची एकसष्टी !

Submitted by दामोदरसुत on 16 April, 2012 - 07:27

एका लोकशाहीची एकसष्टी !
लोकशाहीची उत्क्रांति - साठ वर्षात उत्क्रांत झालेला एक नमुना (मॉडेल) !

अतिशय समर्थ आणि जाणत्या लोकांनी जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीची बरेच कष्ट घेऊन घटना लिहिली. ती उत्क्रांत होऊन साठ वर्षांनंतर जे मॉडेल अस्तित्वात आले आहे त्याची तुलना एका मर्यादेपर्यंत पत्त्याच्या डावाशी करता येईल. पण या डावात नेहमीच्या ५२+२ पत्त्यांशिवाय कोर्‍या पत्त्यांची संख्या अमाप आहे. मुळात या कोर्‍या पत्त्यांची, कोर्‍या पत्त्यांकरिता, कोर्‍या पत्त्यांनी चालविलेली लोकशाही असे तिचे अपेक्षित स्वरूप होते. आता साठ वर्षांनी ती सर्वसाधरणपणे अशी आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले

Submitted by नरेंद्र गोळे on 20 December, 2010 - 05:35

भारतीय जनतेला लोकशाहीनेच तर समृद्ध केले. सर्व लोक एकसारखेच असतात हे शिकवले. स्पृश्यास्पृश्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, उच्च-नीच, सवर्ण-दलित, हिंदू-मुसलमान, स्त्री-पुरूष, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, साक्षर-निरक्षर सगळ्यांना एकाच पातळीवर आणून सोडले. मतदारपदाच्या. इतर भेदाभेद मिटलेत हे तर चांगलेच झाले. मात्र साक्षर आणि निरक्षर सगळे, सारख्याच हक्कांचे अधिकारी झाले हे मात्र चांगले झाले नाही. त्यामुळे साक्षर होणार्‍यास समाजात असावा तसा मान राहू शकला नाही. अंगठेबहाद्दर नेते झाले आणि साक्षर होऊन विद्यार्जन करणार्‍यांवर आडमुठी हुकुमत गाजवू लागले. खरे तर लोकशाहीतही गुणांना मान असावा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भारतीय लोकशाही प्रगल्भ होईल काय?

Submitted by अस्मादिक on 18 November, 2010 - 12:59

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण दिवस निर्जला उपवास करून पुढील २-३ दिवस हा लेख मी लिहीत होतो...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लोकशाही