एका मैत्रिणीशी बोलताना असे समजले की त्यांच्या घरी रीसायकलसाठी वेगळे बिन नाही कारण कोक आणि तत्सम पेयांचे कॅन्स, मिनरल वॉटरच्या बाटल्या फारसे घरात येत नाहीत. तेव्हा मला सांगायचे सुचले नाही पण कोकचे कॅन किंवा मिनरल वॉटरच्या बाटल्या ह्याशिवाय अनेक प्रकारचे डबे, बाटल्या, झाकणं रीसायकल होतात. तर तुम्ही नेहेमी रीसायकल करता त्या वस्तुंची यादी शक्य झाल्यास इथे द्या. जेणेकरुन इतरांना माहिती होइल.
** रीसायकलची खूण स्वत: तपासल्याशिवाय वस्तू त्या बिनमध्ये टाकु नका.
भोपाळचे गुन्हेगार सुटले ! बर मग ? पुढे ? मस्त फिफा वर्ल्ड कप सुरू होत आहे. हे कुठल कधीपर्यंत घेउन बसायच ? मरणारे वीस हजार कधीच मेले. यातना भोगणारेही बरेचसे मरून गेले असतील एव्हाना. मग आता काय उगाच ?
ज्यांच्यावर खटला भरला ते सुटले, ज्यांच्यावर भरलाच नाही त्यांचे काय ?
योग्य देखभाल न करता घातक रसायनांचा साठा करणारे कंपनी व्यवस्थापन हे गुन्हेगार क्रमांक एक.
अशा कारखान्यांची तपासणी करायला सरकारचे अनेक विभाग असतात, ती तपासणी न करताच पैसे खाऊन प्रमाणपत्र देणे हेच चालत असते सर्रास सगळीकडे. तसे ज्यांनी दिले ते गुन्हेगार क्रमांक दोन.
समजा, आपल्याला एखादा समारंभ करायचा आहे, पण तो साजरा करण्यासाठी काय काय नवीन गोष्टी करता येतील याची मायबोलीवर चर्चा करण्याची कल्पना कशी वाटते? म्हणजे उत्सवमूर्तीसाठी काही विशेष, आमंत्रितांचे आदरातिथ्य, गिफ्ट्स इ विषयी कित्येकांच्या डोक्यात काही अभिनव कल्पना असतात, ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युलेही असतात, कधी थोडं पारंपारिक पण हटके असं मस्त मिश्रण जमून येतं मग हे अनुभव शेअर करण्याविषयी काय मत?
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
मातृदिनानिमित्त 'आई', 'मातृत्व' या विषयाशी संबंधित स्वतः काढलेली प्रकाशचित्रे, रेखाटने पोस्ट करण्यासाठी हा धागा-