समाज

टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग)

Submitted by टवाळ - एकमेव on 24 April, 2012 - 01:41

मित्रांनो ! मी तसा मा.बो. वरचा जुनाच पडीक आहे. म्हणजे बघा, उणीपुरी १० वर्षे काढलीत मी ईथे. सुरवातीची साडे-चार वर्षे मी अगदी साधा-सुध्या स्वरूपात जपून-जपून प्रतिक्रिया देत काढली. पण माझा येळकोट काही रहात नव्हता आणि मुळ स्वभाव जात नव्हता. शेवटी एक दिवशी माझ्यातल्या मी चा साक्षात्कार झाला आणि "नम्र टवाळा" चा जन्म झाला. बराच काळ मुख्यतः कट्टा आणि क्वचित दुसर्‍या काही पानांवर टवाळक्या केल्यानंतर आता स्वतःचे एक पान सुरू करावे अशी सुरसुरी आली. या पानाचे नाव मी "टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग)" असे देण्याचे मुख्य कारण टवाळ या आय्-डी सारख्याच मा.बो.

मृतांच्या नातेवाईकांना १ लाख आणि जखमींना २५ हजार..... ???????

Submitted by भुंगा on 11 April, 2012 - 01:52

भारतात कुठेही एखादी दुर्घटना, अपघात झाला की लागलीच सरकारतर्फे मदत जाहीर केली जाते. बर्‍याचदा त्याचे स्वरूप हे "मृतांच्या नातेवाईकांना १ लाख आणि जखमींना २५ हजार" अशाच स्वरूपाचे असते. दुर्घटनेच्या गांभीर्यानुसार रकमेत बदल होत असेलही पण मृत आणि जखमी यांना मिळणार्‍या मदतीच्या रकमेचे प्रमाण हे असेच व्यस्त असते नेहमी. हे नेहमीच वाचनात आलं की अनेक प्रश्न डोळ्यासमोर येतात आणि असं का?? या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळत नाही.

विषय: 

BLACK MAGIC- नीती नियती आणि न्याय

Submitted by RISHIKESH BARVE on 10 April, 2012 - 01:55

नीती नियती आणि न्याय

माझ्या यापूर्वीच्या लेखनावरील प्रतीक्रीयावरून मायबोली कर अत्यंत सजग आणि संवेदनशील आहेत असे जाणवले ,यास्तव सर्वांसाठी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याचा मानस आहे .

न्याय ,नीती , धर्म या संकल्पना आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो? हिंसा ही प्रत्यक्ष घडल्यावरच होते की मानसिक हिंसा ही सुद्धा हिंसाच मानांवी?

BLACK MAGIC- FOR THOSE WHO BELIEVE ,NO PROOF IS NECESSARY ,AND FOR THOSE WHO DON’T BELIEVE, NO PROOF IS ENOUGH !
संदर्भ- http://vedicwisdom.com/blackmagic/spirit_world.php

आनंदवनातील ग्रंथालयासाठी पुस्तकं हवी आहेत

Submitted by चिनूक्स on 4 April, 2012 - 07:13

आनंदवनातल्या रहिवाशांसाठी पुस्तकांची आवश्यकता आहे.

आनंदवनात 'स्नेहसावली' हा कुष्ठरुग्णांचा वृद्धाश्रम आहे. इथे साधारण ६५० ज्येष्ठ कुष्ठरुग्ण राहतात. शिवाय आनंदवनात मुकबधिरांसाठी व सुदृढ मुलांसाठी शाळा आहेत. आनंदवनातल्या या रहिवाशांसाठी सुसज्ज ग्रंथालय असावं, अशी इच्छा आहे.

यासाठी घरातली जुनी किंवा नवीन पुस्तकं देणगी म्हणून मिळू शकतील का? पुस्तकांना विषयाचं, किंवा वयोगटाचं बंधन नाही. 'लोकप्रभा', 'सा. सकाळ', 'अनुभव', 'माहेर', 'मेनका', 'तनिष्का', 'चित्रलेखा' अशा मासिकांची वर्गणी आनंदवनासाठी भरून ही मासिकं तिथे नियमितपणे मिळण्याची व्यवस्थाही करता येईल.

सुपरवूमन सिंड्रोम

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 4 April, 2012 - 02:15

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला. त्यातील ''सुपरवूमन सिंड्रोम'' या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. मग जालावर थोडी शोधाशोध केल्यावर या विषयाशी संबंधित पुष्कळ लेख मिळाले. बरीच अभ्यासपूर्ण माहिती वाचनात आली. उपयुक्त वाटली. त्याच माहितीचा सारांश येथे देत आहे.

बायका लिहा-वाचायला शिकू लागल्या, घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करू लागल्या, स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या.... पण त्यानुसार त्या करत असलेल्या घरातील पारंपारिक कामांमध्ये काही फरक झाला का?

हे माझे आयुष्य नाही! हे माझे लग्न नाही!!

Submitted by निनाद on 2 April, 2012 - 07:57

सामिया - तिचा जन्म ऑस्ट्रेलियातला. वडील मूळचे पाकिस्तानातले. तिला त्यांनी एकदा सांगितले की आपल्याला फिरायला जायचे आहे पाकिस्तानात. तेथे गेल्यावर त्यांनी तिचे लग्न लाऊन टाकले तिच्या चुलत भावाशी. हे लग्न त्यांनी ती फक्त १२ वर्षांची असतानाच ठरवले होते.

सौ. वीणाताई श्रीकांत सहस्रबुद्धे (थर्ड आय असोसिएशनच्या संचालिका) यांच्या कार्याशी ओळख: संयुक्ता मुलाखत

Submitted by dhaaraa on 25 March, 2012 - 21:26

नशिबाने जरी जग दाखवणे नाकारले तरी आपल्या मनःचक्षूंनी जग पाहू इच्छिणार्‍या दृष्टीहीनांसाठी तिसर्‍या डोळ्याच्या रुपात आपुलकीने मदतीचा हात पुढे करण्यार्‍या नाशिकच्या 'थर्ड आय असोसिएशन' (पुर्वाश्रमीची थर्ड आय फाऊंडेशन) या दृष्टीहीनांसाठी, विशेषतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची, आणि संस्थेच्या कामाची ओळख मायबोलीकरांना करून देण्याचा हा माझा प्रयत्न! गेली १४ वर्षे विविध अडचणींवर मात करून नेटाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार्‍या या संस्थेच्या संचालिका आहेत - सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आज गुढी पाडवा!! मायबोलीच्या सदस्यांना व तुमच्या सुहृदाना आणि सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

विषय: 
प्रकार: 

अन्नं वै प्राणा: (८) - (२)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ह्या विशाल पृथ्वीचे असे कितीसे आहे मला ज्ञान?
देशोदेशीची किती नगरे - किती राजधान्या...
माणसाची किती कर्तृत्वे - किती नद्या, किती सागर, किती वाळवंटे,
किती अज्ञात जीव, किती अनोळखी वृक्ष...
कितीतरी राहून गेले आहे पाहायचे
विशाल विश्वाचे हे आयोजन.
एका क्षुद्र कोपर्‍यात गुंतून राहिलेय माझे मन.
त्या क्षोभामुळेच वाचत असतो प्रवासवर्णने
अक्षय उत्साहाने
जिथे घडते एखादे चित्रमय दर्शन -
लगेच घेतो टिपून.
माझ्या ज्ञानातल्या उणिवा काढतो भरून
अशा त्या भीक मागून मिळवलेल्या धनातून.
प्रकार: 

अपॉईंटमेंट घेतल्याशिवाय नाही...

Submitted by ऋयाम on 1 March, 2012 - 23:38
  1. एकाच शहरात राहूनही नातेवाईकांना भेटणं कमी होणं.
  2. नोकरी करू लागल्यावर शाळेतल्या-कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना भेटणं कमी होणं.
  3. मित्र-मैत्रिणींची लग्न झाल्यानंतर त्यांच्याशी भेटी न होणं.

असे प्रकार हल्ली बरेचदा होताना दिसतात. "भेटूया परत!" म्हणत निरोप घेतला, तरी परत भेटणं महिनोन महिने होत नाही, दिवस निघून जातात.

Pages

Subscribe to RSS - समाज