समाज

तुम्ही किती व्यवस्थित आहात?

Submitted by फारएण्ड on 9 November, 2012 - 10:15

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.

खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.

अमेरिकेत पेनेसिल्वानियामध्ये दक्षिण भारतीय आजीचा खून करून १० महिन्याच्या नातीला पळवले.

Submitted by mimarathi on 25 October, 2012 - 21:29

अमेरिकेत पेनेसिल्वानियामध्ये दक्षिण भारतीय आजीचा खून करून १० महिन्याच्या नातीला पळवले. आजी नातीला सांभाळण्यासाठी भारतातून आली होती आणि जान. २०१३ मध्ये परत जाणार होती.
हा सगळा काय प्रकार असेल? आज ३ दिवसांनी नातीचा किंवा खुन्याचा काहिच तपास नाहीये.आज सकाळी हि बातमी कळल्यापासून काहीच सुचत नाहीये, विस्कॉन्सिन मध्ये गुरुद्वारा वर हल्ला झाला, आता हे घडलंय इथे राहणारे भारतीय सहसा कुणाच्या अध्यात मध्यात नसतात. वांशिक द्वेषातून तर हे झाले नसेल ? सानवी लवकर आपल्या आई बाबांना भेटो हीच प्रार्थना.....!

अधिक माहिति :

विषय: 
शब्दखुणा: 

संवेदना ज्योत (ओळख)

Submitted by मंजूताई on 25 October, 2012 - 03:04

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे, नाव कमवावे असे वाटत असते आणि असे सामान्यतः घडतही असते. पण ज्योतीताईंच्या बाबतीत उलटे झाले. दीपाने आपली आई,ज्योतीताईंना शिकविले ते मोठे होण्यासाठी किंवा नाव कमाविण्यासाठी नाहीतर त्यांना त्यांच्या नातवाला योग्य प्रकारे शिकविता येण्यासाठी. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या वेळेला त्या वयाच्या अश्या टप्प्यावर होत्या की पूर्वीच्या बायकांप्रमाणे हातात जपमाळ ओढत रामराम करत बसण्याच्या किंवा आजच्या काळाप्रमाणे भिशी पार्ट्या, महिला मंडळ किंवा आपले छंद जोपासण्याच्या. ज्योतीताईंचे सुखी चौकोनी कुटुंब. सचिन व दिपा अपत्ये.

शब्दखुणा: 

अरविंद केजरीवालांचे आरोपसत्र

Submitted by एक प्रतिसादक on 17 October, 2012 - 13:39

सूचना :
===============================================================
१. आपण करत असलेले काम या बाफपेक्षा महत्वाचे आहे. ते आधी संपवावे.
२. आपली तब्येत या बाफपेक्षा महत्वाची आहे. रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल वाढेल असं काही करू नये. हे सर्व नियंत्रणात ठेवावे. डोक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे विश्रांती घ्यावी.
३. सतत तीन तास कठोर परिश्रम करून भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाची सिद्धी प्राप्त केली आहे. या विषयावर आपला वेळ वाया घालवू नये.
================================================================

शंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत

Submitted by चिंतातुर जंतू on 13 October, 2012 - 05:33

वृत्तपत्रांतून मराठी बातम्या वाचता येऊ लागल्या त्याला आता कित्येक वर्षं झाली. या काळात वृत्तांकनाच्या शैलीत चांगलाच फरक पडला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रांत ज्या बातम्या दिल्या जात असत ती भाषा आणि आजची भाषा यांत काय फरक आहे ते दाखवण्यासाठी जुन्या बातम्यांच्या मजकुराचे नमुने हवे आहेत. आंतरजालावर कुठे असे नमुने उपलब्ध असले तर कृपया इथे दुवे द्यावेत. टंकलेला मजकूर किंवा स्कॅन केलेली पानं यांपैकी काहीही चालेल. स्कॅन असेल तर मजकूर वाचता येईल इतपत दर्जा चांगला हवा.

पुस्तक परिचय - ’सोन्याच्या धुराचे ठसके'

Submitted by ललिता-प्रीति on 11 October, 2012 - 00:17

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Sonyachya-Dhurance-Thasake.html

---------------------------------------------

निराळा योगी - जयन्तीनिमित्त व्यक्त केलेले मनोगत ...

Submitted by अ. अ. जोशी on 8 October, 2012 - 10:31

कै. आप्पासाहेब उर्फ एस.आर. भागवत यांच्या १३०व्या जयन्तीनिमित्ताने पुण्यातील सह्याद्री सदन येथे झालेल्या कार्यक्रमातील माझे मनोगत व्हिडियो लिंकद्वारे येथे देत आहे..

http://www.youtube.com/watch?v=nGOsLIIbUIE&feature=relmfu

कवी/लेखक अरूण वि. देशपांडे यांचेही मनोगत येथे व्हिडियोरूपाने लिंकमधून देत आहे.

http://www.youtube.com/watch?v=exnqFGtBTmE&feature=relmfu

केंद्रिय कोळसा मंत्री यांचे खेदजनक वक्तव्य

Submitted by डॉ. बंडोपंत on 3 October, 2012 - 03:03

केंद्रिय कोळसा मंत्री श्री प्रकाश जयस्वाल यांनी एका कार्यक्र्मा प्रसंगी महिलांविषयी काढलेले उद्गाराचा निषेध करण्यात येत आहे त्यांनी असे म्हटले आहे की महिला ह्या लंग्नानंतर जुन्या होतात अशाने मजा जाते. असे वक्तव्य निश्चितच अशोभनिय आहे.

शब्दखुणा: 

त्याला लागते जातीचे, येरे गबाळ्याचे काम नव्हे

Submitted by रणजित चितळे on 28 September, 2012 - 12:53

गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर मधल्या पंचायती निवडणुका इस्लाम विरोधी ठरवून लष्करे तोयबा, हिजबूल मुजाहदीन आणि जैशे मोहमद सारख्या दहशतवादी संघटनांनी एका पत्रका द्वारे फतवा काढून खोऱ्यातील गावांतल्या सरपंचांनी राजीनामे देण्यात यावेत असे आवाहन केले. या आवाहनाला जेव्हा कोणी बळी पडत नाही असे जाणवले तसे धाक घालण्यासाठी दहशदवाद्यांनी सरपंचांना गोळ्या घालून मारण्यास सुरवात केली आहे. पंच मुहंमद शफी तेली ह्यांची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली. आता पर्यंत चार सरपंचांना गोळ्या घालून मारण्यात आले आहे. हे सर्व उत्तर काश्मीर बारामूल्ला भागात घडले. मुहंमद शफी तेली क्रिरी भागातला होता.

‘तेव्हा’ आणि ‘आता’...

Submitted by झुलेलाल on 28 September, 2012 - 05:33

तीस-चाळीस वर्षांपूर्वी किंवा त्याआधी मुंबईत स्थायिक झालेल्यांच्या आठवणींच्या कप्प्यावरची धूळ हळुवार फुंकर मारून बाजूला केली, की मुंबईचं एक वेगळं, अलगद रूप उलगडू लागतं आणि त्याबरोबर सुस्कारे आणि उसासेही ऐकू येऊ लागतात.. ‘आता त्यातलं काहीच उरलं नाही’ हे वाक्य पालुपदासारखं कानाभोवती घुटमळू लागतं आणि गेल्या दिवसांच्या आठवणींनी आजचा एखादा वृद्ध मुंबईकर कुढत राहतो.
आमच्या वेळी असं नव्हतं आणि असं होतं, असं सांगताना, त्या जुन्या मुंबईकराचा ऊर अभिमानानं भरून गेलेला असतो आणि आजचा नवा मुंबईकर नवलकथा ऐकत असल्यासारखा आ वासून हे ऐकत बसतो..

Pages

Subscribe to RSS - समाज