शाळा

शालेय अभ्यासोपयोगी साईटस, पुस्तकं

Submitted by मामी on 30 July, 2013 - 01:11

शालेय अभ्यासात उपयोगी पडणार्‍या बेवसाईटस आणि पुस्तकं यांची नोंद या धाग्यावर करावी.

विषय: 

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ४

Submitted by स्वाती२ on 22 July, 2013 - 14:08

आयुष्याचे विषय

Submitted by डॉ अशोक on 21 July, 2013 - 13:54

आयुष्याचे विषय

इतिहासातील तह-कलमांनी
मनात गुंता झाला
टुंड्राच्या अभ्यासाने
भुगोल वेडा झाला!

बीज-गणितातील "क्ष" ही
राक्षसातील वाटून गेला
नाते त्रिज्येशी भूमितीत
परिघाशी "पाय" अडला !

गणितातील शून्याचे
असेच काही झाले
गुणपत्रिकेतच त्याचे
स्थान पक्के झाले!

हायड्रा अमीबा प्राणीशास्त्रातले
भिंगातूनही ना दिसले
अल्गी-फंगी वनस्पती कां ते
शास्त्रानेही ना सांगितले !

शाळेचे ना कुठल्या विषयाचे
आयुष्याशी नाते होते
आयुष्याचे सगळे-सगळे
विषय वेगळे होते !

कळले ताई ?

Submitted by रसप on 16 July, 2013 - 04:02

शाळेसाठी
जातानाचा
डोंगरातला
रस्ता होता
आठवतो का
आता ताई ?

घोट्याइतके
खळखळ पाणी
असलेला तो
ओढा लागे,
त्याच्यानंतर
माळावरच्या
चिखलामधली
पायवाटही
थबथब थबथब..!!
आठवते का ?

रोज तिथूनच
दूर-दूरच्या
शाळेसाठी
चालत जाणे
तरी कधीही
कंटाळाही
आला नाही
आठवते का ?

बरेच चालुन
गेल्यावरती
शाळा येई
तू आनंदी
अन् मी दु:खी
रोज व्हायचो
आठवते का ?

कितीकितीदा
माझ्या बाई
माझ्याबाबत
तक्रारींचा
तुझ्याचपाशी
पाढा वाचत
पण तू कधिही
आईला ना
सांगितले ते
आठवते का ?

मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत

हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 June, 2013 - 02:57

''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्‍या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्‍यात साठवून घेऊ लागलो.

शब्दखुणा: 

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १

Submitted by स्वाती२ on 14 June, 2013 - 14:34

जून महिना उजाडला की इथे धामधूम सुरु होते हायस्कूल ग्रॅड्युएशनची. पालक, नातेवाईक, शिक्षक, कोच, मेंटर्स यांनी गजबजलेला परीसर. संडे-बेस्ट मधील मुलं-मुली, काही तर आपापल्या सैन्य शाखेच्या गणवेशातली. विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक हायस्कूल पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. चार वर्ष केलेल्या मेहनतीचे सार्थक होते. मुलं टोप्या उडवतात आणि एक महत्वाचे पर्व संपते.

शाळा

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 March, 2013 - 05:43

कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥
कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥

नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी
नुस्त्याच फळ्याला चौकट लाकडी...
मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर
सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥

शाळेत शिक्षक इकडे तिकडे,
यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे
का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे!
बि.ए. सोडुन दुसरा मार्ग,यांना परवडला होता का कधी?॥२॥

इथले विद्यार्थी,कोचिंगला जाती
घरचे सोडून,बाहेर खाती,इथल्यापेक्षा तिथेच जास्ती
कोचिंग क्लास का लागतात गोड,जणू जेवणातली लोणच्याची फोड..

शब्दखुणा: 

आमची शाळा

Submitted by चंपक on 23 February, 2013 - 05:57

Copy of Pamplet_F1.jpg

पी. एच. डी नंतर देखील दोन वर्षे शिक्षण घेउन आता शिकायचे काही शिल्लक राहिले नाही, असे समजुन मी भारतात आल्यावर शिक्षकाची नोकरी पत्करली! पण त्या सहा महिन्याच्या कालावधीने एकुनच शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला Happy
लायकी नसणारे लोक शिक्षण संस्था चालक झाले कि काय होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अन मग ठरवले, स्वतःच शिक्षण क्षेत्रात काही काम करायचे. जुने मित्र होतेच... एक प्रोजेक्ट नव्याने सुरु करत आहे!

हि कसली 'शाळा'?

Submitted by anandsant on 6 February, 2013 - 11:50

शाळा......रद्दड चित्रपट ...प्रत्येकाला आपल्या शाळेची आठवण करून दिली एवढंच काय ते यश...भंगार कथानक, - जुना काळ दाखविण्याच स्पष्टीकरण नाही, - दिलीप प्रभावळकरांना वाया घालवलय - ,माजरेकर सर ( संतोष जुवेकर) / नरूमामा (जितेंद्र जोशी) / बेंद्रे बाई / जोश्याची बहिण हि पात्र निरर्थक, - एकालाही स्वतःचा स्वभाव नाही, म्हात्रे सोडला तर नायकाचा एकही मित्र लक्षात राहत नाही, मुलांचं भावविश्व खुलवून दाखवण्यास director असमर्थ, expression देण्याची मुभा फक्त म्हत्रेलाच, कथा कुठेही रंजक होत नाही..चित्रपट चालू असताना मधेच सर्वांची नावं दिसायला लागतात, इथे चित्रपट संपतो!

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - शाळा