लेखनसुविधा

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी

Submitted by पुरंदरे शशांक on 30 June, 2016 - 06:10

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी .........

नुकत्याच तुकोबांच्या आणि माऊलींच्या पालख्या पुणे मुक्कामी आल्या होत्या तेव्हाचा प्रसंग. संभाजी पुलावरुन बुवांची पालखी येण्याचा अवकाश - कुठल्याशा लाऊडस्पीकरवरुन मोठ्ठा जयजयकार झाला - संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय ....
आणि बुवांचा एक जोरकस अभंग मनात तरारून उठला ...

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |
झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |
अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |

अवघे सावळ

Submitted by पुरंदरे शशांक on 29 June, 2016 - 02:44

अवघे सावळ

उतरले पूर्ण | तुकोबा जीवन | यथार्थ दर्शन | गाथेमाजी ||

चिंतनी मननी | भक्तांसी तुकोबा | नवल विठोबा | करीतसे ||

अभंग तुक्याचे | निरखी विठ्ठल | मनी कुतुहल | फार दाटे ||

कैसी ही आगळी | भक्तिची माधुरी | शब्दी खरोखरी | सामावेना ||

मिटूनी नयन | बैसे स्वस्थचित्त | श्रीहरि एकांत | भोगतसे ||

तुकोबा तुकोबा | गजर अंतरी | आनंद सागरी | देव बुडे ||

विठ्ठल का तुका | तुका कि विठ्ठल | अवघे सावळ | एकरुप ||

संतांचे उपकार

Submitted by पुरंदरे शशांक on 27 June, 2016 - 23:43

संतांचे उपकार

भक्तासाठी देव | होतसे प्रगट | येरा तो अदृष्ट | आकळेना ||

भाव ऐसा थोर | देवापायी नित्य | जीवभाव सत्य | लुप्त होई ||

आठविता चित्ती | एकमात्र हरि | लौकिक विसरी | पूर्णपणे ||

वेड लागे देवा | भक्ताचेच पूर्ण | सांडिले निर्गुण | अरुपत्व ||

ठाकतसे उभा | भक्ताचे ह्रदयी | निर्गुण सामायी | सगुणत्वे ||

आकळावे वाटे | कोणासी श्रीहरि | अभंग उच्चारी | सप्रेमाने ||

ज्ञानेश्वरी गाथा | मनन - चिंतन | स्वये नारायण | दृष्य होई ||

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ४

Submitted by Suyog Shilwant on 16 June, 2016 - 18:33

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा.
सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 2
सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 3

ह्या मागील तिन्ही भागात आपल्याला सुयुध्द त्रिनेत्री व त्याच्या भुतकाळाची माहिती कळाली. हे तिन्ही भाग मिळुन कथेचा पहिला चॅप्टर 'शोध' पुर्ण झाला आहे. मागील भाग- 3 मध्ये आजोबांनी सुयुध्दला त्यांच्या घराण्याचा खरा इतिहास सांगितला पण सर्वकाही सांगायच्या आत. त्यांच्या घरात दैत्य घुसले. काया ती पहिली व्यक्ती होती जी त्यांना दाराच्या फटीतून पाहते व प्रचंड घाबरते. तिला घाबरलेले पाहुन चिरंतर तिला विचारतो.

शब्दखुणा: 

सांगावा

Submitted by पुरंदरे शशांक on 31 May, 2016 - 06:02

सांगावा

आले सांगावा घेऊन
ढग गहिरे जरासे
येई पाऊस मागून
सोड मनाचे निराशे

येतो हवेत गारवा
वारा वाभरा दुवाड
किलकिले करुनिया
ठेव मनाचे कवाड

नवलाची येई खास
मत्त वळवाची माया
घेई ऊरात भरून
भुई-अत्तराचा फाया

पखरण थेंबुट्यांची
होत राही अविरत
सल कोरडे विरु दे
ओल राख अंतरात ....

बहुरुपी तुकोबा !!

Submitted by पुरंदरे शशांक on 16 May, 2016 - 00:17

बहुरुपी तुकोबा !!

नटनाट्ये अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥५६४

जुन्या लेखकांची पुस्तके

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 10 May, 2016 - 06:18

इंग्रजी साहित्यातील बरीच पुस्तके ऑनलाईन वाचता येतात, कितीतरी PDF च्या स्वरुपात उपलब्ध असतात, अशा वेळेस मराठी पुस्तके, कादंबऱ्या मात्र कितीही शोधल्या तरी वाचयला मिळत नाहीत. विशेषत: नवीन वाड्ग्मय उपलब्ध असत, पण जे धडे, कादंबऱ्या लहानपणी वाचल्या आहेत त्या मात्र शोधून सापडत नाहीत. (आणि फावल्या वेळात एकदम पुस्तक समोर उघडून ऑफिसमध्येही वाचता येत नाही)

इथे बरेच जण असावेत ज्यांना या बद्दल काही माहित असेल. काही जणांकडे pdf असतील. तर अशी पुस्तक शेअर करता येतील का इथे. किंवा इ-मेल मध्ये वाचता येतील का?

प्रांत/गाव: 

सृष्टी सौंदर्य

Submitted by salgaonkar.anup on 5 May, 2016 - 04:18

दूर आभाळाच्या देशात अनेक प-या राहत होत्या. सगळ्याच अगदी सुंदर, प्रसन्न आणि सदैव आनंदी.
या सगळ्यांत आपलं वेगळेपण जपत होती, ती सोनेरी केसांची परी. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गुलाबी गाल, लाल चुटूक ओठ आणि कुणालाही मोहून टाकतील असे लांबसडक मोकळे सोनेरी केस.
अप्रतिम सौंदर्य आणि सगळ्यांना आपलसं करेल असा उत्तम स्वभाव म्हणूनच ती सगळ्यात वेगळी असली तरी सगळ्यांची लाडकी.
एके दिवशी सगळ्या प-या मिळून वा-यासोबत आभाळी लपंडाव खेळत असतात. अनेक प-या स्वतः भोवती काळे पांढरे ढग गुंडाळून त्यात लपून बसतात.

शब्दखुणा: 

तडका - जात पंचायत खल्लास

Submitted by vishal maske on 13 April, 2016 - 11:23

जात पंचायत खल्लास

जातपंचायती राड्यांचा
आता ना ऊल्हास असेल
कायद्याच्या कचाट्याने
जातपंचायत खल्लास असेल

सामाजिक बहिष्काराचा
ढोंगीपणा हटला जाईल
कायद्याला साक्ष ठेऊन
समाजही नटला जाईल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा