लेखनसुविधा

तुटो प्रपंचाची गोडी

Submitted by पुरंदरे शशांक on 27 April, 2017 - 22:34

तुटो प्रपंचाची गोडी । जडो विठ्ठली अावडी ।

नावडो हे धन मान । नको तृष्णा विषयपान ।

येर सारे वाव नुरो । ह्रदी विठ्ठल संचरो ।

येई येई पांंडुरंगा । घेई घेई रे वोसंगा ।

निके प्रेमाचे भातुके । देई देई रे इतुके ।

----------------------
वाव -- खोटे, व्यर्थ
वोसंगा --- मांडी
निके -- खरे, शुद्ध
भातुके -- खाऊ, खाद्यपदार्थ

अंगाई

Submitted by पुरंदरे शशांक on 27 April, 2017 - 01:04

अंगाई

पाळण्यात चिऊताई
करीतसे गाई गाई
चांदो अाला अाकाशात
नीज कशी येत नाही

तारका या अाकाशात
झोपल्या गं किती गुणी
अजूनिया का गं जागी
अाज माझी परीराणी

खेळूनिया लपाछपी
चांदोबाही झोपी गेला
निंबोणीच्या झाडामागे
पार दिसेनासा झाला

नीज येते पापणीत
चळवळ थांबेना ही
मंद मंद झुलवून
अाई गातसे अंगाई

नीज येई डोळ्यावर
तरी खेळायचे हिला
झुलवून थके पार
डोळा अाईचा लागला..

शब्दखुणा: 

सांज शृंगार

Submitted by पुरंदरे शशांक on 24 April, 2017 - 02:14

रंग चितारी अाभाळावर जाताना दिनकर
लाजलाजुनी नवथर संध्या मोहरली तिथवर

काजळ किंचित भिरभिरले अन् पापणीत थरथर
ओष्ठद्वय रंगता उमलले गुलाब गालांवर

पदर जांभळा उचलून पाही हळूचकन् प्रियवर
दारातून ती पहात असता गेला कि झरझर

कृष्णवस्त्र हिरमुसून ओढी पुरते अंगावर
लुकलुकणारी एक चांदणी उमटे क्षितिजावर......

कृष्ण सावळा तो राधेचा

Submitted by पुरंदरे शशांक on 21 April, 2017 - 04:52

कृष्ण सावळा तो राधेचा कुठे हरवला तरी
व्याकुळलेली दिसे बावरी फिरते यमुनातीरी

सूर कुठे पाव्याचा घुमतो कान देऊनी उभी
झुळझुळणारा वारा वाहे नादावून ती खुळी

चमकून बघता अाभाळीचा मेघ शामवर्णी
कान्हा कान्हा शब्द विराले निश्चळ ती रमणी

मेघ थबकला माथ्यावरती राधा फुटली ऊरी
अलगद सुटता भान तयाचे बरसे वरचेवरी

चिंब भिजूनिया कृष्णप्रेमिका अंतरात श्रीहरी
जळ यमुनेचे कृतार्थतेने लोळे चरणांवरी

नाम घेता तुकोबांचे ।

Submitted by पुरंदरे शशांक on 20 April, 2017 - 11:30

नाम घेता तुकोबांचे ।।

नाम घेता तुकोबांचे । ह्रदी रुजतसे साचे । बीज भक्ती वैराग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।१||

फिका वाटतो संसार । मुखी येते नित्य थोर । एक विठ्ठल नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।२॥

अास अंतरी जागते । ओढ विठूची लागते । अाम्ही भाग्याचे भाग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।३॥

ओढ लागतसे मना । कुणी भेटवा सज्जना । संगे गजर नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।४॥

गाथा ह्रदया निववी । हाता धरोनी चालवी । पिसे लागे अभंगांचे । कैसे देणे तुकयाचे ।।५॥

पुरे जाहला लौकिक । नसे मुक्तिचे कौतिक । द्यावे भातुके प्रेमाचे । माथा नमवूनी साचे ।।६॥

भरवसा

Submitted by पुरंदरे शशांक on 19 April, 2017 - 01:38

भरवसा

भरवसा डोळ्यांवर
भरवसा कानांवर
भरवसा दृढ थोर
माझ्याच तो बुद्धीवर

भरवसा धनावर
भरवसा लोकांवर
भरवसा असे माझ्या
मुला माणसांच्यावर

भरवसा तुटता तो
खंतावतो मनोमन
कोणी नव्हतेच माझे
फुकाचीच वणवण

सारे इथे नाशिवंत
देह जातो चितेवर
भरवसा का धरीला
व्यर्थ उगा अनावर

अाता अाशेने पहातो
दूर कुठे अज्ञातात
भरवसा वाटे जरा
पुन्हा पुन्हा त्या गर्तेत .....

शब्दखुणा: 

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

Submitted by अदित्य श्रीपद on 4 April, 2017 - 06:10

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

सुचते का कोणाला कविता....?

Submitted by पोलेकर प्रसन्न on 6 March, 2017 - 00:47

आपण आपल्या मस्तीत जगावं.....

ना कोणाची चिंता ...
ना कोणाची याद ...
आपलाच हा रास्ता...
इथे आपल्यालाच ...आपली साथ..

आपण आपल्या मस्तीत जगावं.....

ह्या होता माझ्या चारोळ्या....."आपण आपल्या मस्तीत जगावं....." ह्या शिर्षकावर ..
तुम्हाला सुचते का कोणती कविता/चारोळ्या....?
पाठवा कंमेंट बॉक्स मध्ये ...."आपण आपल्या मस्तीत जगावं.....".....शीर्षक

जागून उठू दे प्रत्येकातील कवीमन...

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा