#लित्त्लेमोमेन्त्स

हसू नका ... हं! नमुनेदार शेजारी....

Submitted by छन्दिफन्दि on 8 September, 2022 - 13:58

खरी कमाई
आठवी नववी ला स्काऊट गाईडला खरी कमाई करायची असते. शेजारची मनी माझ्यापुढे एक वर्ष. तिची जोरदार खरी कमाई चालू होती. मस्त गाईडचा युनिफॉर्म घालून बिल्डींगमधे एककांकडे जायचं ते सांगतील ते छोटंसं काही काम करायचं साधारण पाच एक रुपये मिळायचे. त्या दिवशी ती जरा गुश्शातच होती. "काय झालं?" "आज सकाळी वरच्या काकूंकडे गेले तर म्हणाल्या दुपारी ये. दुपारी गेले तर त्यांनी एक मोठा डबा समोर ठेवला आणि म्हणाल्या हे निवडून दे. दोन तास लागले डबाभर तांदूळ निवडायला. निघताना दोन रुपये टेकवले हातावर आणि म्हणाल्या उद्या दुपारी पुन्हा ये."

विषय: 

... आणि सूर्य लाजला!

Submitted by छन्दिफन्दि on 8 September, 2022 - 00:27

मी पहिल्यांदाच जुहू चौपाटी वर गेले होते. चौपाटी वरची भेळ सुप्रसिद्ध. चहुकडून येणाऱ्या भेळेच्या वासाचा आस्वाद घेत आम्ही वाळुवर बसुन समुद्रावरून येणारा खारा वारा खात समोरचा विलोभनीय सूर्यास्त बघत होतो. लाल बूंद तो तेजाचा गोळा, सोनेरी आकाश , त्याने त्या विशाल समुद्रालाही आपल्या रंगात न्हायला घातलं होत जणू! तेवढ्यात तेथे ३-४विशाल महिला आणि त्यांची ४-५ मुलं आली. त्यांनी आपल्या बरोबर आणलेली चटई अंथरली. ते समुद्राकडे पाठ करुन गोल बसले. पटापट बरोबरच्या पुड्या सोडल्या आणि जोर जोराने गप्पा हाणत खायला सुरुवात केली. त्यांची अरसिकता बघुन आम्ही तर अचंबित झालोच पण समुद्रालाही उंचबळून आलं.

विषय: 

पाठवणी

Submitted by छन्दिफन्दि on 1 September, 2022 - 13:01

‘पाठवणी’ म्हटलं की डोळ्यासमोर हमखास उभं रहातं ते लग्नघर(सिरियल किंवा मुव्ही मधील म्हणूया हवं तर)! सासरी निघालेली मुलगी, भावूक झालेले जवळचे नातलगं, ती हुरहुर, भरुन आलेले डोळे! आता अगदी एकाच शहरात आणि आधुनिक काळात असलो तरी पाठवणी शब्दाबरोबर येतेच हुर हुर.

विषय: 

नायगारा फॉल्स !

Submitted by छन्दिफन्दि on 30 August, 2022 - 18:56

संध्याकाळी साडे सहा वाजले होते बफेलो एअरपोर्टवर आमचं विमान लँडिंग करत होतं. काही शेकडो फुट उंचीवरून छोटी छोटी टुमदार घरं, हिरवीगार माळरानं सोनेरी सूर्यप्रकाशात छान न्हाहून निघालेली. इतकं सुंदर दृश्य माझी नायगारा फॉल्स पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढवत होत. एरपोर्टवरून फॉल्स पर्यंतचा रस्ता अगदी नेत्रसुखद. हिरवीगार पोपटी माळरानं, अगदी तुरळक वहान. टॅक्सिवाला सरदारजी जाता जाता इतरही बरीच माहिती देत होता. अर्ध्या एक तासानंतर टॅक्सी थांबली.

विसरभोळे ...अबसेन्ट माईंडेड !

Submitted by छन्दिफन्दि on 28 August, 2022 - 22:19

विसराळू विनूची गोष्ट तर लहानपणापासूनच ऐकलीये. आपल्या आजूबाजूला बरेच लोक आपल्या विसराळूपणाने किंवा अबसेन्ट माईंडेड पणामुळे कधी गमती जमती तर कधी ताप देऊन ठेवतात, अशाच काही गमती!

गिरणीतून पीठ आणायला म्हणून ती आणि आई बाहेर पडल्या. पिशवी घेतली आणि गिरणीतून परत निघाल्या. ५ मिनिट झाली. मोठ्या क्रोससिंगपाशी आल्या तरी चालतेच आहोत बघतल्यावर लेकीने विचारलं, "आई, कुठे जातोय आपण ?"

"कुठे काय? आत्ता रात्रीच कुठे जाणार? घरी आपल्या!"

"अगं पण मग घर तर कधीच मागे गेलंय !!!"

अबसेन्ट माईंडेड आई

*****

बलशाली भारत होवो .... !

Submitted by छन्दिफन्दि on 28 August, 2022 - 10:02

राष्ट्रगीताची धून ऐकू आली कि अंगावर काटा येतो, छाती अभिमानाने भरून येते. वंदे मातरम सुरु होताच कान टवकारतातच , पण तन-मन आर्त होत, कुठेतरी खेचलं जातं. जगाच्या काना कोपऱ्यात कुठेही असलेल्या ( बहुतांशी) सर्व भारतीयांचं असचं होत असावं.
आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यानिमित्ताने खूप सारे कार्यक्रम आयोजित केले जातायत, 'हर घर तिरंगा' ह्या पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन घराघरात तिरंगा फडकतोय, तिरंग्याचे पावित्र्य आणि सन्मान राखला जातोय ना ह्याचीही दक्षता घेतली जाईलच (ही अपेक्षा), सगळंच खूप सुखावणारं आहे.

ती थरारक पाच मिनिटं .... 

Submitted by छन्दिफन्दि on 26 August, 2022 - 23:31

अमेरिकेत यायच्या आधी तिकडच्या गन violence च्या बातम्या क्वचित कधी कानावर यायच्या , पण ते शिकागो, टेक्सास किंवा आणि एखाद स्टेट मध्ये. मग इकडे आल्यावर खूप जवळून अशा घटना, त्यांचे पडसाद , हतबलता, निष्क्रियता बघायला मिळाली . तरी एक आत कुठेतरी असतंचना, तिकडे (दूर कुठेतरी) असं सगळं होतंय आपण तरी एकदम सुरक्षित, चांगल्या वस्तीत रहातोय.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - #लित्त्लेमोमेन्त्स