ऋणी

ऋणी

Submitted by राजेंद्र देवी on 12 May, 2022 - 21:18

ऋणी

देवा मी काय वेगळे मागितले होते
जे जे नको होते ते सारे मिळाले होते

संवाद सारे सुसंवाद होते, टिकले नाते
मग मनाशी का रुजवात करावी लागते

विझल्या निरंजनात तूप शिल्लक होते
फुलवातीस मात्र का अल्प आयुष्य होते

जे का रंजले गांजले, जुळले तयांशी नाते
ऋणी तुझा मी, आयुष्यात तू जे दिले होते

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ऋणी