कथा प्रीती कालेजात

नभसागरी उभी बालिका या ||१||

Submitted by पशुपत on 30 April, 2022 - 05:55

कालेजात वर्गात अगदी नवीन चेहरे , मोकळे वातावरण,प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या महत्त्वाकांक्षा , देहबोलीत उत्साह ; हे सारं घेऊन आलेला पहिलाच दिवस.
विविध तासांत प्राध्यापकांनी घेतलेल्या इंट्रोडक्शनच्या निमित्ताने सहजच छाप मारून  काही मुला-मुलींचे  आपले लोकप्रिय होण्याचे विशेष वेगळेपणाचे पोटेन्शियल दिसून आले.
त्यात अग्रेसर होता हृषिकेश ! तजेलदार चेहेरा , खेळाडू देहयष्टी , संगीत साधनेतून उद्भवत चाललेले तेज..आणि कुठल्याशा जबाबदारीची जाणीव दाखवणारी देहबोली.

विषय: 
Subscribe to RSS - कथा प्रीती कालेजात