मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस

राजधानीची सफर (भाग-२)

Submitted by पराग१२२६३ on 29 March, 2022 - 07:00

खेरवाडीला संध्याकाळी 6:48 वाजता तपकिरी रंगातील कल्याणच्या WCAM-2 इंजिनासह संक्रेल गुड्स टर्मिनलकडून आलेली आणि छत्रपती शिवाजी महाराज (ट) कडे निघालेली पार्सल विशेष एक्सप्रेस क्रॉस झाली. 19:05 वाजता लासलगाव आले. स्टेशन ओलांडत असताना तिथे आणखी एक एक्सप्रेस गाडी लूप लाईनवर उभी करून आमच्या ‘राजधानी’ला मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. ती होती लोकमान्य टिळक (ट)हून पाटण्याला निघालेली एक्सप्रेस. लासलगाव स्टेशनमधून ‘राजधानी’ बाहेर पडत असतानाच WAG-7 कार्यअश्वांची एक जोडी गाडीविनाच नाशिक रोडकडे निघून गेली.

Subscribe to RSS - मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस