राधा कान्हा

राधारंग

Submitted by मोरोपंत on 20 November, 2021 - 13:08

कान्हा नभाची निळाई
राधा क्षितिजाची रेघ
कान्हा अथांग अथांग
राधा अव्यक्ताचा वेध

कान्हा मोहक सुंदर
मोरपिशी मोरपिशी
राधा प्रेम हे निस्सीम
सत्वगुणी नी राजसी

कान्हा रंग शाश्वताचा
झळाळते गे सुवर्ण
राधा रंग हो चंदनी
समर्पण ते संपूर्ण

कान्हा रंग कर्तव्याचा
शुभ्र पांढरा पांढरा
राधा निस्वार्थ भावना
स्वच्छ स्फटिकाचा हिरा

कान्हा भगवे निशाण
उभा धर्म संस्थापून
राधा विरक्ती सहज
आली स्वतःस अर्पून

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - राधा कान्हा