गद्यलेखन

जिवलग.....

Submitted by अजातशत्रू on 10 June, 2016 - 03:36

भल्या पहाटेच राणूच्या वस्तीत हालचाल चालू होती. रानातला गार वारा अंगावर काटा आणत होता. बांधावरच्या लिंबाच्या पानाची सळसळ चांगलीच ऐकू येत होती. शेजारच्या जालिंदरच्या शेतातला जुनाट वड हेलकावे खातोय असं उगाच वाटत होतं. टिटव्यांचा टीटीविटीटीव आवाज दुरून येत होता पण अगदी स्पष्ट होता. लांब अंतराहून पिंगळा देखील त्याचे अस्तित्व जाणवून देत होता. रातकिड्यांचा किर्र आवाज एक तालात येत होता. आठवड्यापासून चालू झालेला पाऊस मातीने अधाशासारखा पिऊन टाकला होता. जागोजागी ढेकळात चिखलात आलेलं तण त्या पहाटवारयावर डुलत होतं. नांगरट केलेली बुजून गेली होती, सगळी जमीन दबून गेली होती.

जुन्या रहस्यकथांचे सँपल

Submitted by बेफ़िकीर on 9 June, 2016 - 08:09

जुन्या काळी रहस्यकथांचा भडिमार झाल्याचे काही भग्नावशेष काही उदासपणे उघडलेल्या वाचनालयांमध्ये दिसून येतात. हा एक मोठाच ठेवा काळाच्या ओघात नष्ट झाला व होतही आहे. त्या रहस्यकथा असायच्या की विनोदी कथा असाप्रश्न पडत असे.

तुला माती भेटली तर... माझ्यासाठी गंध आण...

Submitted by ह.बा. on 9 June, 2016 - 07:48

चुकून अर्धेच पोस्ट झालेले.
निग्लेक्ट प्लीज. नंतर पुर्ण पोस्त करतो.
धन्यवाद!

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो - भाग ४

Submitted by अस्मि_ता on 9 June, 2016 - 07:45

मनुने खूप विचार केला पण अनि ला भेटल्याशिवाय काही कळणे अशक्यच होते. मनुने अनिकेतला फोन केला. काहीही झाल तरी आपण आता परत अनिकेतचा विचार करायचा नाही असे मनुने ठरवले होते. त्याला भेटण्याचे एकंच कारण होते... तिला जाणून घ्यायचे होते, असं काय झालं की तो आपल्याशी असं वागला... आज सगळ्या गोष्टींचा खुलासा करायचाच होता.
ठरल्याप्रमाणे ती अनिकेतला भेटायला गेली.

शब्दखुणा: 

रस्त्याचे ऋण ...

Submitted by अजातशत्रू on 8 June, 2016 - 21:33

पूर्वी आमचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग हा असा दिसायचा. दोन्ही बाजूनी दाट झाडी अन त्या झाडांच्या अर्धवर्तुळाकार कमानी सारया रस्त्याने स्वागताला उभ्या असत. झाडांच्या या कमानी इतक्या दाटीवाटीने उभ्या असत की आपण झाडांच्या कंच हिरव्यागार पानांच्या हिरवाईतल्या गुंफातून प्रवास करतो आहोत की काय असे वाटायचे. रस्त्याच्या दुतर्फा असणारया या झाडांच्या भाऊगर्दीत प्रामुख्याने लिंब, बाभूळ, चिंच, वड, पिंपळ, पळस, सुबाभूळ आणि निलगिरी यांची झाडे जास्त करून असत. त्यातही कडूलिंबाची मेजोरिटी मोठी होती. एकमेकाच्या गळ्यात हात घालून रेलून बसावं तसे या झाडांच्या फांद्या एकमेकाच्या फांदयात अडकून गेलेल्या असत.

गोष्टी बुधवारपेठेतल्या - : वर्तुळ .......

Submitted by अजातशत्रू on 8 June, 2016 - 06:38

पुण्यातल्या बुधवार पेठेत श्रीनाथ थिएटरच्या उजव्या बाजूने पुढे गेले की 'आफताब मंजिल' इमारत आहे. सारया बुधवार पेठेत अशा अनेक बहुमजली इमारती आहेत, ज्यात कोंबडयांच्या खुराडयासारख्या खोल्या आहेत. इथं बायकांचा बाजार चोवीस तास भरलेला असतो अन उष्ट्या तोंडाची लाळ गाळत फिरणारी आशाळभूत पुरुषी गिधाडं सदोदित पाहायला मिळतात. या आफताब मंजिलच्या जिन्याच्या तिसरया मजल्यावरील पायरयांवर म्हातारा झालेला विलास अंगाचे मुटकुळे करून पडून असायचा.

सरिता

Submitted by बेफ़िकीर on 7 June, 2016 - 08:54

बेढब शरीर, गोरा रंग, वय चाळीसच्या आसपास, चेहरा सतत थकलेला, अंग सतत घामाने भिजलेले, 'झालं बाई हे एक काम' अश्या अर्थाचे थकलेले स्मितहास्य सतत चेहर्‍यावर, 'चला, आता पुढचं काम' अश्या अर्थाचा ताण सतत चेहर्‍यावर!

सरिताला पाहिले की रागच येतो. कोणालाही! मला तर त्या बत्तीस सेकंदांचे फार टेन्शन असते. लिफ्टमध्ये ती आणि मी तळमजल्यापासून आपापल्या मजल्यावर जाताना जे बत्तीस सेकंद एकत्र घालवतो त्या सेकंदांचे! फक्त त्याच सेकंदांचे टेन्शन येते कारण एरवी असे कोणतेच सेकंद जबरदस्तीने तिच्यासोबत घालवावे लागत नाहीत.

अव्याहत बडबडत असते.

शब्दखुणा: 

'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग २

Submitted by मंजूताई on 6 June, 2016 - 12:19

प्रश्न: राजस्थानातलाच मुलींच्या बाबतीतला अनुभव सांग.

शब्दखुणा: 

स्फुट ११ - ह्या असल्या भयानक प्रस्तावना नकोत

Submitted by बेफ़िकीर on 6 June, 2016 - 12:05

जमवलेल्या माणसांची संख्या
गमवलेल्या माणसांच्या संख्येपेक्षा
जास्त असते
तोवर जगण्यात मजा असते

गमवलेल्या पैश्यांची मजा
जमवलेल्या पैश्यांपेक्षा
जास्त असते
तोवर जगण्याची मजा असते

जगण्याच्या दु:खापेक्षा
मरण्याचे दु:ख जोवर
जास्त असते
तोवर जगण्याची मजा असते

मरण्याच्या मजेपेक्षा
जगण्याची मजा जोवर
जास्त असते
तोवर जगण्याची मजा असते

फक्त आजचाच दिवस
असा निघाला
की जमवलेल्या माणसांची संख्या
गमवलेल्यांशी माणसांच्या संख्येशी जुळली
जगण्याचे दु:ख
आणि मरण्याचे दु:ख
समान होते

आणि तरीही मी
जिवंतच होतो काही तास

ते काही तास
मला जे शिकवून गेले

ते हादरवणारे होते

'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग १

Submitted by मंजूताई on 6 June, 2016 - 11:57

निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्‍या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्‍या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन