गद्यलेखन

'दिल अपना और प्रीत पराई …' - वास्तवी अन आभासीही !

Submitted by अजातशत्रू on 15 June, 2016 - 22:14

हातातील घडयाळाकडे बघत आपल्या खर्जातल्या आवाजात तो आता तिला म्हणेल, "करुणा ! अब बस भी करो ! वक्त का तकाजा करो ! घडी दौडती जा रही हैं और वक्त फिसलता जा रहा हैं l और कितना काम करेंगे ? हमे रुकना चाहिये … कुछ अपने लिये भी जीना चाहिये । "
मग ती ट्रॅजेडी क्वीन हातातले स्कालपेल बाजूला करत तिच्या अनुनासिक स्वरात म्हणेल, "नही, डॉक्टर सुशील हम ये काम निपटाकर ही रहेंगे ! जो हम चाहते हैं वैसा अक्सरही कभी होता हैं."
तो उत्तरेल - "क्या तुम्हे हमारी जजबातोंकी जरा भी कदर नही हैं ?" अन मग ती म्हणेल, " मेरे अपने जजबातही जब मेरे नही रहे है तो औरोंके जज्बोका मुझे कैसे इल्म होगा ?"......

गावाकडची दुपार ....

Submitted by अजातशत्रू on 14 June, 2016 - 09:21

गावाकडे उन्हाळ्यातली रणरणती दुपार झाली की घरोघरी फक्त अशी वृद्ध माणसेच असतात. घरातली गडी माणसे अन धडधाकट बाया बापड्या घराबाहेर असतात. स्वतःचे शेत शिवार आणि तिथं पिकपाणी असेल तर लोक तिथं जातात नाही तर दुसरयाच्या शेतात कामाला जातात.
पाण्याची ओरड वाढलेली असेल तर सरकारी कामावर जातात नाही तर पंचक्रोशीत आसपासच्या शेतशिवारात जातात.

स्फुट १३ - चुकून पुरुषांच्या डब्यात

Submitted by बेफ़िकीर on 13 June, 2016 - 10:55

चुकून पुरुषांच्या डब्यात
'तरी का होईनात'
शिरू शकलेल्या
बाईसारखा जन्म!

काय सांभाळावे
नसलेले पैसे
कवितेचे दागिने
की तिथल्या सगळ्यांसारखेच असलेले अवयव

चुकून बायकांच्या डब्यास
'कसे का होईनात'
लटकलेल्या पुरुषाचे
प्राक्तन

कसले पुरावे द्यावेत
अनभिज्ञतेचे
लिंगाच्या एकपत्नीव्रताचे
की समानतेच्या एक्स्टेंडेड अर्थाचे

आयुष्याची 'लोकल' थांबेल
तेव्हा मला अटकही होईल
आणि माझी सुटकाही

स्टेशनचे नांव असेल मृत्यू

तेव्हा पुरुषांचा आणि बायकांचा
दोन्ही डबे शपथेवर सांगतील
हा नीट वागला

पण हे कोणीही सांगणार नाही

की

कधी ना कधी
आमच्यातला प्रत्येकजण

'गर्दीतील वेगळा चेहरा' : मोहन उर्फ निवांत पाटील

Submitted by अमेय२८०८०७ on 13 June, 2016 - 08:00

भारतातील- नव्हे आशियातील- अनेक विद्यार्थ्यांना स्वप्नवत असणाऱ्या मुंबईतील 'यु डी सी टी' मधून केमिकल इंजिनियरिंगचे पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनही. पुढचे संशोधन अमेरिकेतील 'मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत' आणि तिथेच पाच सहा वर्षे मानाच्या जागेवर अध्यापन. सुखवस्तू जीवनप्रणाली आणि परदेशात स्थायिक होण्याची संधी. असे असताना अचानक कुठला सांगावा आला आणि आमचे मित्र मोहन पाटील भारतात परत आले. नुसते भारतात नव्हे तर चक्क आपल्या मूळगावी कोल्हापूरजवळ कागल इथे. काही दिवस जवळच्या इंजिनियरींग कॉलेजात अध्यापन आणि औद्योगिक सल्लागार म्हणूनही काम केले पण खरी ओढ होती ती स्वतःचा दुग्धव्यवसाय सुरु करण्याची.

गावाकडचे दिवस ....भावार्थ रामायण

Submitted by अजातशत्रू on 13 June, 2016 - 06:01

भावार्थ रामायण......

गावात भावार्थ रामायणाचे पारायण सुरु असले की फोटोत दाखवल्याप्रमाणे दृश्य हमखास नजरेस पडतेच..
गावातले वातावरण या काळात संपूर्णतः भारलेले असे असते… रोज संध्याकाळी शेतातली कामे करून थकून भागून आल्यानंतर वेशीतल्या मारुतीरायाच्या देवळात रामायण ऐकायला जाणे हे एक स्वर्गस्थ सुखच…
बत्तीच्या उजेडात थोड्याशा उशीरपर्यंत चालणारया या श्रवण सोहळ्याचे अनेक क्षण मनावर कोरलेले अगदी जसेच्या तसे आहेत…

रामाचा जन्म झाल्यावर आया बायांना आपल्याच घरात पाळणा हलल्यागत वाटायचे. राम लक्ष्मण जसजसे मोठे होत जायचे तसतसे याना स्फुरण चढायचे…

प्रतिभा (भाग ४था)

Submitted by मिरिंडा on 13 June, 2016 - 05:49

आज पुन्हा मला रात्री घरी जायला उशिर झाला होता . तरीही साडेनऊच झालेले असल्याने मी रिताला म्हंटले, " चल , आपण जेवायला बाहेर जाऊ. " पण ती तयार झाली नाही. थोडी रागातच ,केलेल्या जेवणाकडे बोट दाखवीत ती म्हणाली, " मग याचं काय करू ". माझ्याजवळ उत्तर नव्हतं. न बोलताच जेवणं झाली. साडेदहा अकराच्या सुमारास अंथरूणं घालून ती माझ्या जवळ लवंडली. अर्थातच माझ्याकडे पाठ करून . माझ्या ते लक्षात आलं. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तिने माझा हात बाजूला करून ती म्हणाली, " बस, आता झोपू द्या. मुलांनीही खूप वाट पाहिली. निदान त्यांचा तरी विचार करायचा होतात.

स्फुट १२ - कोलकात्यातील त्या रस्त्यावर

Submitted by बेफ़िकीर on 12 June, 2016 - 23:35

कोलकात्यातील त्या रस्त्यावर
तेवीस टेम्परेचर होते
हवेचे!!
माणसांची तापमाने वेगवेगळी होती!!
फूटपाथ मढले होते
टपर्‍यांवरून पडलेल्या बटाट्याच्या फोडींनी
गाजराच्या सालींनी, पालकाच्या सडलेल्या पानांनी!!
गलेलठ्ठ घुशींचे लोळ चालत, धावत होते
नुकताच परप्रांत जिंकल्याच्या आवेशात!!
कावळे आणि मांजरे ह्यापासून वाचत वाचत
काही उंदीर नाचत होते पडलेल्या अन्नातच
तेच अन्न खात आणि त्यातच घाण करत!!
काही कावळे कर्णकर्कश्श्य ओरडत होते
एखादा जिवंत उंदीर पाहून
जणू उंदीर जिवंत राहणे हा त्यांचा अपमानच!!
कावळ्यांना उडावेच लागत नव्हते चार फुटांहून जास्त उंचीवरून!!

द टाइम गेम...

Submitted by अज्ञातवासी on 11 June, 2016 - 15:17

"सर्वकाही बदलायचंय मला...."
"किंमत द्यावी लागेल."
"कबूल.."
"बरं साल?"
"२०१६"
"तारीख?"
"१२ जून "
"ठीक आहे.."
त्याने हातातील कागदावर तारीख लिहिली. कागद मशीनमध्ये ठेवला.मशीन चालू केलं.
"आज वेळ लागतोय."
"हो मशीन जरा स्लो चाललंय."

श्रीराम कॉलेजमध्ये गर्दी वाढली होती. आज इंजिनियर मंडळी बरीच निवांत होती. पेपर्स संपले होते.
"एक्सक्यूज मी!"
"येस?"
"आज १२ जून ना?"
"हो..."
"थँक्स!"
तो झपझप पाऊले टाकत मेकेनिक हॉल मध्ये गेला.
विराज, शुभ आणि राज तिघेही निवांत बसले होते.
"आज तिला विचारणारच आहे."
"अरे राज पण विचार कर ती नाही म्हणाली तर?"
"मग रात्री रूमवर ओढून नेऊ तिला!"

श्री संतराम (भाग तिसरा)

Submitted by मिरिंडा on 10 June, 2016 - 07:00

स्वेच्छेशी विवाह म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. याची पंडिताला जाणीव होती. प्रथम तिच्या मातापित्यांची निर्मिती करणं भाग होतं. प्रत्यक्षातले मातापिता इथे आणणं परवडणारं नव्हतं. त्यात कालापव्यय झाला असता. तिला त्याने तशी कल्पना दिली आणि अशी सोय तिलाच करण्यास सांगितले. तिच्या लक्षात आले की पंडित आपला चांगलाच वापर करून घेणार आहे. पण कोणत्याही खेळात प्रविण असलेल्या तिला आपला फायदा करून घेऊन त्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याची आता गरज भासू लागली. जरी याचे काम करीत असलो तरी जास्त लाभदायक जर महाराज असतील तर सोमूचा हात धरून काय हरकत आहे त्यांचा डाव खेळायला . असा विचार तिने केला.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन