गद्यलेखन

डबलक्लिक!!

Submitted by जव्हेरगंज on 20 June, 2016 - 09:42

आधी हे चॉकलेट खाऊन क्लिक! करा

==========================================================

तुडुंब भरलेली गटारं. रस्त्यावर उसळलेलं पाणी. धो धो पाऊस. फवारा उडवत आलेली कार. अन काच खाली करत बाहेर डोकावलेला फ्रेंच कट.

खरंतर अशा चिकचिकीत करायचं काय हा एक जबरदस्त प्रश्न असतो. भिजत फिरणे हा एकमेव पर्याय मी कायम निवडतो. होऊंदे सर्दी खोकला.

"हेलो बॉस, इथर न्यू सेंट्रल किधर है?" काळा गॉगल शोभत होता फ्रेंच कटवर.

क्लिक!

Submitted by जव्हेरगंज on 19 June, 2016 - 08:05

आधी हे चॉकलेट खाल्लं तरी चालेल !

==========================================================

हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय?
मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्.
मग लाल बटन दाबलं

क्लिक

पक्यानं आणि मी ती सुटकेस खोलायची जाम खटपट केली. मग तशीच घेऊन आलो खोलीवर. जिथं ड्रेनेजचं भोक उघडतं तिथंच आमची खोली. गढूळ पाण्याचे झरे वाहतात चोहीकडे. अर्थात गटारे.

दाराला कडी घालून आत बसलो. मांडीवर ब्याग घेतली. पकडीनं लॉक उचकाटलं. पण हे मटरेलंच वेगळं. तोडताच येईना.

स्वावलंबनातून मूल्याधारीत समृद्धीप्रत नेणारा 'स्यमंतक' : ओळख

Submitted by अमेय२८०८०७ on 18 June, 2016 - 06:10

ही उन्हाळी सुट्टी अनेक कारणांनी सत्कारणी लागते आहे. काही नवीन वाटांची ओळख होते आहे. मी त्यांवरून चालेन ही शक्यता धूसर असली तरी आता काहीशी समज आलेल्या लेकाला या सगळ्याबद्दल त्याच्यापरीने विचार करताना पाहणे हा माझा मूळ हेतू आहे, जो बऱ्यापैकी सफल होत आहे.

निमित्त आहे ते 'स्यमंतक' या कोकणच्या अंतरंगातील धामापूर गावी उभारल्या गेलेल्या सचिन व मीनल देसाई या तरुण जोडप्याने उभारलेल्या शिक्षण प्रकल्पाचे.

ठहराव

Submitted by रेनी on 18 June, 2016 - 00:39

आपण एखादे अप्रतिम गाणे ऐकत असतो आणि अचानक त्या गाण्यामध्ये एक ठहराव येतो, गाणे क्षणभर थांबते
आणि शब्द आणि संगीत ह्या मध्ये एक अनामिक शांतता येते. त्या क्षणी डोक्यात एक शुन्य निर्माण होतो अलिप्तेमध्ये
जो आनंद असतो तो जाणवतो. मग तेच गाणे आपल्या लयीने आणि तालाने पुढे निघून जाते
क्रिकेट खेळामध्ये मध्ये विकेट गेल्यावर ती कशी गेली हे slow motionमध्ये पाहण्यात तीच गम्मत असते,

हीच गोष्ट नेमकी सध्या चर्चेत असणाऱ्या मराठी सिनेमा मध्ये वापरली आहे. चित्रपटाच्या गाण्यामध्ये आणि काही भागात
पडद्यावर चित्र slow motion मध्ये जाते आणि चित्रपट पहायला बरा वाटतो, हे प्रसंग हजार वेळा पहिले असतील

प्रतिभा ( भाग ५ वा)

Submitted by मिरिंडा on 17 June, 2016 - 03:30

प्रतिभा आश्चर्याने उत्तमच्या पाठमोऱ्या आणि घाईघाईने जाणाऱ्या आकृतीकडे पाहातच राहिली. तिच्या मनात आलं उत्तम इथे कसा आणि त्याने हा लखोटा का दिला ? हातातला लखोटा पर्समधे ठेवीत तिने खोलीच्या उघड्या दारातून आत डोकावून पाहिले.आत अंधार होता. बाजूच्याच भिंतीवरील लाइटचे बटण दाबल्यावर उजेड झाला. उजेडात तिने आतल्या खोलीतून येणारे रक्ताचे ओघळ पाहिले, आता त्यांचं दाराजवळ डबकं तयार झालं होतं. धडधडत्या छातीने ती आतल्या खोलीच्या उघड्या दरवाज्यातून आत डोकावली. आतले दृष्य पाहून सगळं घर आपल्या भोवती फिरतंय असं तिला वाटू लागलं. आयुष्यात तिने अगदी जवळून खून झालेला देह पाहिलेला नव्हता.

चिंता!!

Submitted by झुलेलाल on 17 June, 2016 - 01:44

लोकांची डोकी बाकी भारी चालतात!
पाऊस लांबल्यानं सारे चिंताग्रस्त आहेत, हे खरंच. आणखी काही दिवस पाऊस पडलाच नाही, समजा उभा हंगामच कोरडा गेला, तर काय होणार या नुसत्या विचारानेही चक्कर येऊ शकते. शरीर शुष्क होऊ शकते, घामही थांबू शकतो...
हे खरंय.
मग आपापल्या परीने, पाऊस यावा म्हणून काय करता येईल याची उत्तरं शोधायचा प्रयत्न सुरू होतो.
काल ट्रेनमधे एक टोळकं गंभीरपणाने याचीच चर्चा करत होतं.

स्फुट १४ - इसिसचा एक निष्ठावान कार्यकर्ता

Submitted by बेफ़िकीर on 16 June, 2016 - 10:54

इसिसचा एक निष्ठावान कार्यकर्ता
धोब्याचे ऐकणारा राजा राम
कर्णाच्या शौर्यामुळे धर्माच्या नावाखाली अधर्माचे समर्थन करणारा कृष्ण
नियतीच्या नावाखाली बायकोला द्युतात लावणारा युधिष्ठिर
मरा मरा म्हणत चुकून भक्त ठरणारा वाल्मीकि
गोष्टींना धक्कादायक वळणे देणारा नारद
जखमांमध्ये मश्गुल असलेला अश्वत्थामा

कधीच शत्रूच्या रक्ताने बायकोची वेणी न घालू शकलेला भीम
कधीच पत्नीची फिकीर न बाळगणारा लक्ष्मण
कधीच भाळलेल्या बायकांना आपलेसे करू न इच्छिणारा भीष्म
कधीच रामासाठी आपण का राबलो हे न कळलेला हनुमान
कधीच बोहल्यावरून न पळालेला रामदास
कधीच पुष्पक विमानावर विश्वास न ठेवणारा तुकाराम

'दिल अपना और प्रीत पराई …' - वास्तवी अन आभासीही !

Submitted by अजातशत्रू on 15 June, 2016 - 22:14

हातातील घडयाळाकडे बघत आपल्या खर्जातल्या आवाजात तो आता तिला म्हणेल, "करुणा ! अब बस भी करो ! वक्त का तकाजा करो ! घडी दौडती जा रही हैं और वक्त फिसलता जा रहा हैं l और कितना काम करेंगे ? हमे रुकना चाहिये … कुछ अपने लिये भी जीना चाहिये । "
मग ती ट्रॅजेडी क्वीन हातातले स्कालपेल बाजूला करत तिच्या अनुनासिक स्वरात म्हणेल, "नही, डॉक्टर सुशील हम ये काम निपटाकर ही रहेंगे ! जो हम चाहते हैं वैसा अक्सरही कभी होता हैं."
तो उत्तरेल - "क्या तुम्हे हमारी जजबातोंकी जरा भी कदर नही हैं ?" अन मग ती म्हणेल, " मेरे अपने जजबातही जब मेरे नही रहे है तो औरोंके जज्बोका मुझे कैसे इल्म होगा ?"......

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन