गद्यलेखन

सैतान, रोबोट आणि देव. भाग १

Submitted by केशवकूल on 10 November, 2022 - 12:41

सैतान, रोबोट आणि देव.
(निवेदक मिस्टर कुलकर्णी)
“सफाया” नावाच्या रोबोचं प्रात्यक्षिक आयआयटी मुंबई मध्ये होणार होते. हा “हॅन्सम रोबोटिक्स” नावाच्या हॉंगकॉंगच्या कंपनीने बनवलेला रोबो होता. आयआयटीमधे “टेक फेस्ट” च्या परिश्रमाने हे प्रात्यक्षिक होणार होते.

अन्नचिंतन

Submitted by अनिंद्य on 9 November, 2022 - 02:40

नबालगन आणि विजयालक्ष्मी - माझ्यासाठी अनबा आणि विजी. माझे चेन्नै बडीज. सदा आनंदी राहणारे जोडपे. दोघेही माझे जिवलग मित्र. विजीच्या हातचे तमिळ पद्धतीचे चविष्ट जेवण जेवणे हा माझा चेन्नैतला नियमित कार्यक्रम. घरी चार-चार मदतनीस असूनही स्वतः पदर खोचून माझ्यासाठी स्वयंपाक करणारी विजी आणि प्रचंड आग्रह करकरून वाढणारा अनबा हे दृश्य नेहमीचेच. दोघांच्या आग्रह करून वाढण्याच्या सवयीला मी हसतो, नावे ठेवतो. दोघे काही बोलत नाहीत, सवय बदलत नाहीत. एकदा खोदून विचारले, इतका आग्रह का?

शोध एका अदृश्य "यन्त्रपुर" चा- १

Submitted by केशवकूल on 6 November, 2022 - 05:15

ही गोष्ट मी जेव्हा ओब्र्याला काम करत होतो त्या काळातली आहे. ओब्र्याच्या जवळपास आमच्या कंपनीच्या चार पाच साईट्स होत्या. रेणूसागर, सागरकता, चुर्क, चुनार, डाला, रापटगंज, चोपन आणि ओब्रा अशी त्या साईट्सची नावं होती. माझी मॅनेजरची पोस्ट होती आणि ह्या सर्व साईट्स माझ्या अखत्यारीत होत्या. ओब्रा साईट त्यातल्या त्यात महत्वाची होती. शिवाय ओब्रा टाऊनशिप मोठी होती. स्पोर्ट्स क्लब होता, तोडकं मोडकं का होईना इंटरनेट मिळत होते, बऱ्यापैकी हॉटेल होतं. मग काय मी ओब्रा हेच माझे एचक्यू केलं.

माहेराची वाट

Submitted by nimita on 5 November, 2022 - 15:30

(साहित्यकलामंच २०२२ या दिवाळी अंकात छापून आलेली माझी कथा)

आज सकाळपासून रेणुका थोडी उदास होती. रोजच्या सारखंच आजही पहाटे बरोब्बर पाच वाजता घड्याळानी तिला उठवायचं काम केलं होतं. खरं म्हणजे रेणुका तर आज घड्याळाच्याही आधी उठली होती. पण तरीही पांघरुणातून बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती तिची. थोडंसं वैतागत तिनी साईड टेबल वरचा मोबाईल उचलला आणि त्याला शांत करून पुन्हा पांघरुणात शिरली.

"आज मॉर्निंग वॉक ला सुट्टी का ?' शेजारी झोपलेल्या तिच्या नवऱ्यानी - सुमीतनी आश्चर्याने विचारलं.

समांतर विश्वात पक्की.

Submitted by केशवकूल on 4 November, 2022 - 04:41

Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
long I stood And be one traveler
-------Robert Frost
"So many worlds, so much to do, so little done, such things to be."
—Alfred Lord Tennyson
Everything that can possibly happen does happen.

बबन बोंडेज दिवाळी - अ लाडू टू किल!

Submitted by सखा on 23 October, 2022 - 02:42

मित्रांनो ऐन दिवाळीतील घटना, सर जॉनी इंग्लिश, सर ऑस्टिन पॉवर्स आणि माननीय जेम्स बाँड यांना दिवाळीच्या फराळाला आपला लाडका भारतीय गुप्तहेर बबन बोंडे यांनी अर्थातच अत्यंत गुप्तपणे बोलावलेलं नसेल तरच नवल होतं. बबनची माजी गर्लफ्रेंड प्रियांका मस्का (जीने जणू काही भारतात श्रीमंत आणि वीर परंतु बुटके पुरूष अजिबात नाहीतच अशा अविर्भावात एका बुटक्या अमेरिकन माणसाशी लग्न केले, अशी माहिती विकिपीडिया वरती उपलब्ध आहे. असो.) तिने आपल्या बबनशी जरी लग्न नाही केलं तरी ती आजही बबनला दिवाळीचे फराळाचे पदार्थ पाठवते याचं कारण म्हणजे तिच्यावर असलेले संस्कार मुख्य म्हणजे ती स्वतःच्या हातांनी करून पाठवते.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन