गद्यलेखन

ती काळरात्र - भाग ६

Submitted by तुषार विष्णू खांबल on 23 November, 2022 - 10:55

ती काळरात्र - भाग ६
शब्दांकन : तुषार खांबल

https://www.maayboli.com/node/82683 - भाग १

https://www.maayboli.com/node/82689 - भाग २

https://www.maayboli.com/node/82701 - भाग ३

https://www.maayboli.com/node/82706 - भाग ४

सैतान, रोबोट आणि देव. भाग-३

Submitted by केशवकूल on 23 November, 2022 - 10:04

रात्रीचे दहा वाजले असावेत. झोप येणे अवघड होते. कोकाट्यांचा तो बुजगावण्यासारखा सारखा दिसणारा रोबोट सारखा डोळ्यासमोर येत होता. शपथेवर सांगतो, मी आजवर कुणालाही जाणूनबुजून फसवलं नव्हतं. पण आज मी त्या “यंत्र मानवाला” फसवलं होतं. त्याची मनाला चुटपूट लागून राहिली. एका परीने कोकाटेंच्या घरातले वातावरण त्याला कारणीभूत असावे. असं पण असेल की मला कोकाटेंच्या हव्यासातला फोलपणा दाखवून द्यायचा असेल. पहा बघता बघता मी देखील त्या चक्रात ओढला गेलो होतो. एका निर्जीव यंत्राला कळत नकळत सजीव मानायला लागलो होतो. अशा विचारांच्या धुंदीत झोपेतही मला रॉबी दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर ते मिश्कील हसू नव्हते.

“एक” “शून्य” रोबोट!

Submitted by केशवकूल on 19 November, 2022 - 07:37

“एक” “शून्य” रोबोट!
उपोद्घात
Another Universe. Another Time.
फार फार वर्षांपूर्वी- किती वर्षांपूर्वी?- कुणालाच माहित नाही की किती वर्षांपूर्वी- काहीही नव्हते. अवकाश नव्हते आणि काल नव्हता.
ह्या विश्वाची सुरवात व्हायच्या आधी- काहीही नव्हते, होते फक्त अर्थशून्य.

ती काळरात्र - भाग २

Submitted by तुषार विष्णू खांबल on 18 November, 2022 - 14:24

ती काळरात्र - भाग २
शब्दांकन : तुषार खांबल

अतिशय कमी वयातच रुपेशने स्वतःच्या हिंमतीवर अमाप प्रसिद्धी आणि पैसा कमावला. रेवती देखील तिच्या या आयुष्यात आनंदी होती. बंगले, गाड्या, नोकर सर्व काही होत. थोडक्यात काय तर सुख पायाशी लोळण घेत होत. दोघांनाही दुःख फक्त एकाच गोष्टीच होत ते म्हणजे संतती.

शब्दखुणा: 

गोडाचा शिरा

Submitted by Zara Tambe on 13 November, 2022 - 20:06

गोडाचा शिरा
ती आज एव्हडी खूश होती स्वतःवरच की त्या आनंदात, समाधानात बसूनच रहावे असे तिला वाटत होते. सकाळपासून विविध प्रॉब्लेम्स ना तिने यशस्वीरीत्या dodge केले होते आणि ते सुद्धा तिच्या आंतरिक शांततेचा भंग न होता. त्यामुळेच ती खूप आनंदात होती.
कितीतरी वेळा आपण खूप आनंदात असतो,असेच आणि आपला पूर्ण दिवस तसाच सुखाच्या डोहात डुंबत जावा असे वाटत असते पण अचानक काहीतरी होते, कधी कामवाली बुट्टी मारते, तर कधी कामाच्या गडबडीत मुलांचे लास्ट मिनिट काहीतरी आठवते. काही नाही तर अचानक धो धो पाऊस आणि एखादे वेळेस, मानच अवघडते किंवा मायग्रेन चालू होतो. अगदी मिठाचा खडा पडावा तसे.

सैतान, रोबोट आणि देव. भाग-२

Submitted by केशवकूल on 12 November, 2022 - 11:34

सैतान, रोबोट आणि देव. भाग-२
कोकाटेनी माझा दंड पकडून मला पलीकडच्या खोलीत नेले आणि झटकन दरवाज्याची खिट्टी लावून दरवाजा बंद केला. खोलीत अंधार होता. दिव्याचा स्विच ओंन केल्यावर खोली प्रकाशाने उजळली.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन