काव्यलेखन

पावती

Submitted by रसप on 9 May, 2013 - 08:42

ती हसली..
मीही हसलो..
ती हसली म्हणून नाही,
दुसरं काही सुचलंच नाही, म्हणून..
काय करणार ?
माझ्या हातात होती 'बालवाडी'च्या फीची पावती
"रुपये तीस हजार फक्त!"
आणि तिच्या डोळ्यांत होती भूक
अन् रेखाटलेलं रक्त..

"तुम्ही तिला पन्नास रुपये का दिले?"
"ती त्याचं काय करणार?"
"'क्रेयॉन्स' घेणार की 'चॉकलेट' खाणार?"

..... हे प्रश्न मला ऐकूच येत नव्हते..
आणि मला पडलेले प्रश्न
मलाच समजत नव्हते..

घरी जाता जाता सिगरेटचं पाकिट घेण्याचं
आज पहिल्यांदाच विसरलो..

शब्दखुणा: 

एक दुपार

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 May, 2013 - 06:02

सूर्य होता आग ओकत
जणू सुडाने विश्व जाळत
एकच ढग निळ्या नभात
उभा होता अंग चोरत
उष्ण वारा उगा वळवळत
होता वाळली पाने हलवत
दारात अंगणात माजघरात
सुन्न शांतता होती नांदत
झाडाखाली थोड्या सावलीत
कुत्रे होते पडले निपचित
भर पेठेत मोकळ्या रस्त्यात
उन रणरणत सुन्न निवांत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

आपलेच आहेत ते ज्यांनी केलेत वार आजही....

Submitted by अविकुमार on 8 May, 2013 - 15:33

आजही...!

आपलेच आहेत ते ज्यांनी केलेत वार आजही
शब्द जयांचे घुसलेत हृदयात आरपार आजही

काय सांगू बरेवाईट तुझे, आज मी तुजला?
राहिला का तोच माझा अधिकार.... आजही?

समुद्राएवढी आहे की, आभाळाएवढी नक्की?
उमगत नाही मज या वेदनेचा आकार आजही

काय अप्रुप त्या धनाचे वाटणार सांगा?
'तोच' आहे मी तसाच निर्विकार आजही

विरुन गेली सर्व सुखे जरी गोड स्वप्नांपरी
त्या स्वप्नांचा मनात भरला बाजार आजही

सावलीही आज तुझी, 'अवी', साथ सोडू पाहते...
सोबतीला परी, 'तो', निर्गुण निराकार आजही...!

शब्दखुणा: 

रोज आयुष्य वाटे नवे!

Submitted by कर्दनकाळ on 8 May, 2013 - 07:07

गझल
वृत्त: वीरलक्ष्मी
लगावली: गालगा/गालगा/गालगा

**********************************************

रोज आयुष्य वाटे नवे!
रोज इच्छा नवी पालवे!!

जिंदगीलाच मी सांगतो....
हे नको, हे हवे....ते हवे!

व्यर्थ गीता इथे वाचणे!
खानदानी इथे गाढवे!!

सूर्य गेला ढगाआड की,
भाव खाती किती काजवे!

या न गझला अरे, माझिया......
चेतनांचेच हे ताटवे!

एकतारी उरी वाजते!
वेदनांचेच हे पारवे!!

या मनाच्या तरूवर किती......
पाखरांचे स्मृतींच्या थवे!

काल तो एकटा चालला......
आज दिसती किती कारवे!

ऊब साथीस माझ्या, तुझी!
सोसले कैक मी गारवे!!

''काही सुटे शेर''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 8 May, 2013 - 01:14

काही सुटे शेर...

वास मारतो अविरत तिन्हीत्रिकाल आहे
आयुष्याची झोपडपट्टी बकाल आहे

===========================

मलाही खूप धडधडते,कुठे निर्धास्त आहे मी?
उरी उदयातली आशा,जरी सूर्यास्त आहे मी

स्थिती पाहुन बदलतो मी,अमीबासारखा हल्ली
कुणाला भासतो थोडा,कुणाला जास्त आहे मी

============================

मित्र ज्याला मानले तो मित्रही मित्रात नाही
माणसामध्येच आहे देव देव्हा-यात नाही

ठरविल्या जातात जाती येथल्या जन्मावरूनी
जन्म कोठे घ्यायचा हे आपल्या हातात नाही

============================

भागलेली भूक आहे
बोलणारा मूक आहे

फार धडधडणार होती
गोठली बंदूक आहे

एक थेंबुटा...

Submitted by पुरंदरे शशांक on 7 May, 2013 - 23:57

एक थेंबुटा...

एक थेंबुटा उनाड
आभाळात हरवला
पहाटेला पानांवर
दंवरुप झळकला

एक थेंबुटा निवांत
झर्‍याकाठी पहुडला
चोच रान-पाखराची
वेडा करीतसे ओला

एक थेंबुटा गगनी
ढगामधेच दडला
दंगा करुनिया फार
धरेवर विसावला

एक थेंबुटा बिचारा
पापण्यात उमटला
हाक घालूनी मेघांना
उगामुगाच आटला

एक थेंबुटा थेंबुटा
धरतीला लेई लेणं
जाई स्वतः हरपून
देई दुसर्‍याला जिणं

शब्दखुणा: 

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

Submitted by अभय आर्वीकर on 7 May, 2013 - 23:54

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले

वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले

साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले

क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले

नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले

काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले

पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले

सोंग केलेय त्याने ना ऐकले जणू
प्रश्न भाग्यास जेव्हा टाकून पाहिले

एकाच भावार्थावर/भावभूमीवर/प्रतिमेवर आधारीत दोन-दोन/तीन शायरांचे शेर......

Submitted by कर्दनकाळ on 7 May, 2013 - 16:12

एकाच भावार्थावर/भावभूमीवर/प्रतिमेवर आधारीत दोन-दोन/तीन शायरांचे शेर......

यहॉ दरख्तोंके सायेमें धूप लगती है
चलो यहॉसे चले और उम्र-भरके लिए
..........दुष्यंत कुमार
तमाम उंचे दरख्तोंसे बचके चला हूं
मुझे खबर है कि साया किसीके पास नही
..........मुमताज शकेब
झाडे चहूकडे पण, छाया कुठेच नाही!
गर्दीत माणसांच्या माया कुठेच नाही!!
..........कर्दनकाळ

.........................................................................

वो शख्स जिसको खिजॉ ले गई बहारोंसे
कभी चमनमें शिगुफ्ता गुलाब जैसे था
...........नसीम महमूदी
सदियोंमें फैलनेकी तमन्ना लिए हुए

नव्हते मनामध्ये तरी, मज हे करावे लागले!

Submitted by कर्दनकाळ on 7 May, 2013 - 13:34

गझल
वृत्त: मंदाकिनी
लगावली: गागालगा/गागालगा/गागालगा/गागालगा

नव्हते मनामध्ये तरी, मज हे करावे लागले!
हे हात जोडावे....कधी पाया पडावे लागले!!

नांदायला लोकांमधे, हेही करावे लागले.....
पाणावले डोळे तरी, खोटे हसावे लागले!

न्यायालयामध्ये किती मी हेलपाटे घातले!
जो हक्क होता न्याय्य, त्यालाही मुकावे लागले!!

ते सोंग झोपेचेच होते, तोतयांनी घेतले!
त्यांच्याचसाठी रक्त निम्मे आटवावे लागले!!

ते लोक भरती तुंबड्या, ना भूक ज्यांना माहिती!
होते उपाशी जे खरे, त्यांना झुरावे लागले!!

या दगदगीमध्ये कुठे, फुरसत रडायाला तरी?
एकांत जेव्हा लाभला, तेव्हा रडावे लागले!

भारतीय मातीची गझल - दुष्यंतकुमार त्यागी

Submitted by विजय दिनकर पाटील on 7 May, 2013 - 06:23

दुष्यंतकुमार त्यागी(१९३३-१९७५)

अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभलेला हा प्रतिभावान कवी जेव्हां इहलोक सोडून गेला तेव्हां मी कदाचित काही महिन्यांचा बाळ असेन. आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर स्वतःला अत्यंत जवळची वाटू शकेल अशी दुष्यंतकुमारांची गझलही कधीतरी माझ्या आयुष्यात येईल ह्याचा विचार अगदी काल परवापर्यंत माझ्या मनाला शिवलेलासुद्धा नव्हता.

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन